Karisma Kapoor Fitness Secrets: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
वय वाढलं की चेहऱ्यावर सुरकुत्या येणार, शरीरात बदल होणार हे सगळं आपण मानतोच. पण काही लोक असे असतात की त्यांना पाहून वयाचा अंदाजच येत नाही. करिश्मा कपूर हे त्याचं बेस्ट उदाहरण आहे. 52 व्या वर्षी पण ती इतकी फिट आणि सुंदर दिसते की लोक तोंडात बोटं घालतात. Fitness Tips:
नुकतीच ती करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ च्या 9 व्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये आली होती. तिथला तिचा लूक पाहून सगळेच शॉक झाले. इतक्या वर्षांनंतरही ती तेवढीच यंग आणि एनर्जेटिक दिसत होती. मग सगळ्यांना प्रश्न पडला, बाबा हिचं फिटनेसचं सिक्रेट काय आहे?याचं उत्तर सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिलंय. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून करिश्माच्या फिटनेसचं खरं रहस्य काय आहे ते सांगितलंय. Karisma Kapoor Fitness Secrets:
बरेच जण म्हणतात करिश्मा रोज दही-भात खाते म्हणून फिट आहे. पण ऋजुता म्हणतात हे पूर्ण खरं नाही. फक्त एका पदार्थामुळे कोणी फिट राहत नाही. करिश्माने गेली कित्येक वर्षे चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत, त्याचं हे फळ आहे. एका रात्रीत कोणी फिट होत नाही, त्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत लागते.तिशीनंतर शरीरात बदल होतात, लक्ष द्या..
ऋजुता सांगतात, वयाच्या 20 व्या वर्षी फिट राहणं सोपं असतं. खाल्लेलं पचतं, वजन पटकन वाढत नाही. पण 30 नंतर गेम बदलतो. महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल व्हायला लागतात. वजन वाढायला लागतं, खासकरून पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होते. शरीराचा शेप बदलतो. तिशीपासूनच काळजी घ्यायला हवी, चाळीशीची वाट पाहू नये.
आजकाल बायका काय करतात, फक्त वजन काट्यावर किती आहे याच्यामागे लागतात. ऋजुता म्हणतात, हे चुकीचं आहे. वजन कमी करण्याचा विचार करायचा नाही. शरीर मजबूत आणि अॅक्टिव्ह कसं राहील याचा विचार करा.
त्यासाठी त्या एक सोपी गोष्ट सांगतात – आठवड्यातून किमान 3 तास व्यायाम कराच. तुम्हाला जे जमतं ते करा. वेगाने चालणे, थोडं वजन उचलण्याचे व्यायाम, योगा, स्ट्रेंथ ट्रेनिंग काहीही चालेल. पण शरीराला हालचाल करा. हाडं मजबूत होतात, शरीराला पोषण मिळते तसेच वय वाढले की, तुम्ही थकत नाही.
निरोगी राहण्याचं असेल अनेक स्त्रिया भात खाणं बंद करतात. पोळी खायची बंद करतात, साखर बंद पूर्णपणे बंद करतात. रात्रीचे जेवण करत नाहीत. ऋजुता म्हणतात हे सगळ्यात मोठं चुकतंय.
उगाच डाएटच्या नावाखाली स्वतःला त्रास देऊ नका. भात, पोळी, कार्बोहायड्रेट्स हे आपल्या शरीराला लागतंच. ते पूर्णपणे बंद केलं तर शरीरात व्हिटॅमिन D, B12, लोह, कॅल्शियम कमी होतं. मग थकवा येतो, केस गळतात, चिडचिड होते.त्यापेक्षा संतुलित आहार घ्या. घरचं साधं जेवण जसे वरण-भात, भाजी-पोळी, दही हे सगळं खा, पण प्रमाणात खा. जेवणाचा आनंद पण घ्या आणि शरीराची काळजी पण घ्या.
करिश्मा कपूरने हेच केलंय. तिने कधीच उपाशी राहून डाएट केलं नाही. चांगलं खाणं, रोज थोडी कसरत आणि चांगली लाईफस्टाईल, हेच तिच्या फिटनेसचं खरं सिक्रेट आहे. तुम्हाला पण 50 नंतर फिट दिसायचं असेल तर आतापासूनच या सवयी लावून घ्या.
Ans: करिश्मा कपूरच्या फिटनेसचं रहस्य म्हणजे अनेक वर्षांपासून जपलेल्या चांगल्या खाण्याच्या सवयी, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली.
Ans: ऋजुता दिवेकर यांच्या मते, केवळ एका पदार्थामुळे फिट राहता येत नाही. चांगल्या सवयी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे आहेत.
Ans: फक्त वजन कमी करण्यावर लक्ष न देता शरीर मजबूत, निरोगी आणि सक्रिय कसं राहील यावर लक्ष केंद्रित करावं.






