
kissing
गेल्या दोन वर्षांपासून आपण आजारांची विचित्र नावं ऐकली आहेत. सर्दी, ताप अशी लक्षणे सुद्धा व्हायरसच्या रूपात आपल्यासमोर आली आहेत. सध्या असाच एक विचित्र नावाचा आजार वेगाने सगळीकडे पसरत असल्याचं दिसत आहे. या आजाराचं नाव आहे किसिंग डिसीज (Kissing Disease). हा आजार संसर्गजन्य मोनोन्यूक्लिओसिस (मोनो नावाने ओळखला जातो) नावानेही ओळखला जातो. लाळेद्वारे पसरणारा एपस्टाईन-बॅर विषाणू या आजारामागचं मुख्य कारण आहे. मुख्यतः चुंबनामुळे हा संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे या आजाराचं नाव किसिंग डिसीज असं ठेवण्यात आलं आहे. मोनो असलेल्या एखाद्या व्यक्तीसह ग्लास किंवा जेवणाची भांडी शेअर करूनही तुम्हाला विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. तथापि, मोनोन्यूक्लिओसिस सामान्य सर्दीसारखा संसर्गजन्य नसल्याचं सांगितलं जातं.
योग्य वेळी उपचार होण्याची गरज
डॉक्टरांच्या मते किसिंग डिसीज हा काही गंभीर आजार नाही. पण काही वेळा याची लक्षणं खूप गंभीर असतात. तसंच या संक्रमणामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जर योग्य वेळी उपचार केले नाही तर संक्रमित व्यक्ती अनेक आठवडे रोजची कामंदेखील करू शकत नाही. संसर्गाची लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये गळ्याला प्रचंड सूज येऊन वेदना होऊ शकतात. यासह मोनोची म्हणजेच किसिंग डिसीजची इतर काय लक्षणे आहेत ते आपण जाणून घेऊयात.
मोनोन्यूक्लिओसिसची लक्षणे (Kissing Disease Symptoms)