Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तुमचं पोषण आहे अपूरं, मग नका करू उशीर”; जाणून घ्या शरीरातील लक्षणं अन् खाण्यात करा ‘असे’ सुधार

जर तुमच्या शरीरात यापैकी कुठलेही लक्षण दिसत असेल, तर आहारात ताज्या फळभाज्या, हिरव्या पालेभाज्या, कडधान्यं, दूध-तुपाचे योग्य प्रमाणात सेवन करावं. गरज असल्यास डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 04, 2025 | 09:04 PM
फोटो सौजन्य - Social media

फोटो सौजन्य - Social media

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या दैनंदिन आहारातूनच शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळतात. पण अनेकदा आपल्याला वाटतं आपण सकस आणि पौष्टिक जेवण घेत आहोत, तरीही शरीरात काही पोषणतत्त्वांची कमतरता राहते. हे जाणवण्याचं काम शरीर आपल्याला काही खास लक्षणांच्या माध्यमातून सांगत असतं. खाली दिलेली ६ लक्षणं लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या आहारात योग्य बदल करू शकता.

भाजल्यानंतर हातांवर पडलेले डाग एका रात्रीतच करा दूर; डॉक्टरांनी सांगितला आयुर्वेदिक उपाय

तोंडाच्या कोपऱ्यांवर भाजल्यासारखी भेग (Angular Cheilitis):

जर तोंडाच्या कोपऱ्यांवर भेगा दिसत असतील, त्वचा लालसर होत असेल, तर हे एंग्युलर चाइलायटिस असू शकते. ही स्थिती व्हिटॅमिन B12, फोलेट, रायबोफ्लेविन (B2), लोह (Iron) आणि झिंकच्या कमतरतेमुळे होते.

हात-पाय सुन्न होणे किंवा सुई टोचल्यासारखं वाटणं:

असं वाटणं म्हणजे ‘पेरीफेरल न्यूरोपथी’चे लक्षण असू शकतं. विशेषतः व्हिटॅमिन B6, B12, थायमिन (B1), रायबोफ्लेविन यांच्या कमतरतेमुळे ही समस्या होऊ शकते.

जीभ लालसर आणि सुजलेली दिसणे (Glossitis):

शरीरात जर B व्हिटॅमिन्स आणि लोह कमी असेल, तर जीभ लालसर, गुळगुळीत व सुजलेली होऊ शकते. हे विशेषतः व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचं लक्षण आहे.

कायमची थकवा जाणवणे:

जर तुम्ही भरपूर झोपूनही थकलेलेच वाटत असाल, तर त्यामागे व्हिटॅमिन C, B ग्रुप व्हिटॅमिन्स, झिंक, मॅग्नेशियम आणि आयर्नची कमतरता असू शकते. शरीरात ऊर्जा येण्यासाठी ही पोषणतत्त्वे अत्यंत आवश्यक आहेत.

डेंग्यू-मलेरियापासून बचावासाठी, आरोग्य संरक्षणाचे महत्त्व सोप्या टिप्स

जखमा लवकर न भरल्यास:

जखमा भरताना शरीराला कोलेजनची आवश्यकता असते. कोलेजन तयार करण्यासाठी व्हिटॅमिन C आणि झिंक गरजेचे असतात. तसेच, B व्हिटॅमिन्स, झिंक आणि आयर्न नव्या पेशी तयार करण्यात आणि टिशू रिपेअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

वारंवार सर्दी, त्वचा कोरडी पडणे:

हे सुद्धा पोषणतत्त्वांच्या कमतरतेचे संकेत आहेत. व्हिटॅमिन A, C आणि झिंकची कमतरता असेल तर रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि त्वचेवरही परिणाम होतो.

Web Title: Know the symptoms of nutritional deficiency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 09:04 PM

Topics:  

  • Nutrition

संबंधित बातम्या

सकाळची पौष्टीक सुरुवात! मटकीचे घावन कधी खाल्ले आहेत का? चवीला अप्रतिम, घरचेही होतील खुश
1

सकाळची पौष्टीक सुरुवात! मटकीचे घावन कधी खाल्ले आहेत का? चवीला अप्रतिम, घरचेही होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.