फोटो सौजन्य: iStock
सध्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे आपल्या सवयी सुद्धा बदलत आहेत. तसेच वाढत्या तंत्रज्ञानामुळे आज आपले आयुष्य अधिकच सोपे झाले आहे. पूर्वी ज्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला बाहेर पडावे लागत होते. आज त्याचा गोष्टी आपल्याला घरपोच मिळत आहे. याचे उत्तम आणि सर्वाना पटणारे उदाहरण म्हणजे स्वीगी आणि झोमॅटो. आज आपल्याला कोणताही पदार्थ खायचा असल्यास तो स्वीगी किंवा झोमॅटोच्या माध्यमातून आपण ऑर्डर करतो. या आणि अश्या कितीतरी गोष्टींमुळे अनेकांची शारीरिक हालचाली कमी होतात. परिणामी लठ्ठपणा येऊ लागतो.
घर, ऑफिस किंवा शॉपिंग मॉलमध्ये जेव्हाही संधी मिळेल तेव्हा नेहमी लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. हे सांगण्याचे कारण म्हणजे पायऱ्या चढणे आणि उतरणे हा एक प्रकारचा कार्डिओ व्यायाम आहे जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो.
हे देखील वाचा: 30 मिनिटे चालणे ठेवते अनेक आजारांना दूर, जाणून घ्या रोज चालण्याचे फायदे
एवढेच नाही तर, नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, पायऱ्या चढल्याने फिटनेस तर वाढतोच, पण त्यामुळे आयुष्यही वाढू शकते. जवळपास 500,000 लोकांच्या डेटाचे विश्लेषण करणाऱ्या या अभ्यासात, पायऱ्या चढणे आणि कोणत्याही कारणामुळे मृत्यूचा कमी धोका, यामध्ये संबंध आढळला आहे.
अभ्यासानुसार, जे लोक पायऱ्या चढतात त्यांना सर्व कारणांमुळे मृत्यूचा धोका 24% कमी होता. यासह, हृदयविकारामुळे मृत्यूची शक्यता 39% कमी झाली आहे.
जिना चढण्याचे फायदे
तज्ज्ञांच्या मते, जिना चढताना शरीर गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात जाते, ज्यामुळे इतर शारीरिक व्यायामांपेक्षा ते अधिक कठीण होते. अशा परिस्थितीत, पायऱ्या चढण्यामुळे हृदयाची तंदुरुस्ती सुधारते आणि स्नायू देखील मजबूत होतात. हे खालच्या पाठीच्या आणि हॅमस्ट्रिंगचे स्नायू विकसित करते, ज्यामुळे एकूण गतिशीलता वाढते.
दररोज किती पायऱ्या चढल्या पाहिजेत?
किती पायऱ्या चढणे फायदेशीर आहे हे ठरवण्यासाठी सध्या पुरेसे संशोधन झालेले नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की दिवसातून 50 पायऱ्या चढल्याने एथेरोस्क्लेरोसिसचा धोका 20% कमी होतो.