PCOS झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या पिण्याच्या सवयींमध्ये सतत होणाऱ्या बदलनाचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर शारीरिक आणि मानसिक अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे महिलांचे आरोग्य बिघडून जाते. महिलांमध्ये सामन्यात पीसीओस आणि पीसीओडीचा त्रास दिसून येतो. ही समस्या उद्भवल्यानंतर अनियमित मासिक पाळी, वजन वाढणे, पुरळ येणे, चेहऱ्यावर नको असलेले केस वाढणे, गर्भधारणा होण्यात अडचण होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवल्यानंतर वेळीच लक्ष नाही दिले तर आरोग्यसंबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता असते.पीसीओसचा त्रास जाणवू लागल्यानंतर महिलांमध्ये तणाव, चिंता वाढू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पीसीओसचा त्रास जाणवू लागल्यानंतर महिलांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
पीसीओसचा त्रास जाणवू लागल्यानंतर प्रामुख्याने दिसून येणारी समस्या म्हणजे अचानक वजन वाढणे. वजन वाढल्यानंतर लठ्ठपणा आणि शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. यासाठी आहारात सफरचंद सायडर व्हिनेगरचे सेवन करावे. ज्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. सफरचंद सायडर व्हिनेगरचे सेवन केल्यामुळे चयापचय सुधारण्यास मदत होते.
हे देखील वाचा: महिनाभर भात न खाल्यास आरोग्यावर दिसून येतात ‘हे’ सकारात्मक परिणाम
महिलांमध्ये पीसीओसची समस्या उदभल्यानंतर सतत मूड स्विंग्स होऊ लागतात. कोणत्याही कारणांवरून चिडचिड करणे, काम न करण्याची इच्छा निर्माण होते. मग्नेशियम ग्लाइसीनेट तणाव आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. शरीरातील हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी आहारात बदल करून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
काही वेळा महिलांच्या तोंडावर नको असलेले अतिरिक्त केस येण्यास सुरुवात होते. हे केस वाढल्यानंतर त्वचा खराब होऊन जाते. त्यामुळे पुदिन्याच्या चहाचे सेवन करावे. पुदिन्याच्या चहा प्यायल्यामुळे चेहऱ्यावर नको असलेल्या केसांची वाढ होत नाही. केसांची वाढ नियंत्रणात राहण्यास मदत होते.
महिलांचे केस गळणे ही एक सामान्य समस्या असून सर्वच महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.पीसीओसचा त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर केस गळू लागतात. केस पूर्णपणे पातळ आणि कोरडे होतात. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी झिंक, सेलेनियम आणि लोह इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.
हे देखील वाचा: सकाळी उठल्यानंतर नियमित करा तुळशीच्या पाण्याचे सेवन, शरीरासह त्वचेला होतील अनेक फायदे
केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर त्वचेवर पुरळ येऊ लागते. त्वचेवर आलेली पुरळ कमी करण्यासाठी आहारात पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. पुरळमुळे होणारी जळजळ कमी करण्यासाठी कॉड लिव्हर ऑइलचा वापर करावा.