Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळनंतर महाराष्ट्राचा माता मृत्यू दर सर्वात कमी ३६; एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान ४४ माता मृत्यूची नोंद

गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीनंतर ४२ दिवसांच्या आत उद्भवणाऱ्या गुंतागुंतींमुळे होणाऱ्या मृत्यूला मातामृत्यू म्हणतात. यात अपघात किंवा इतर आकस्मिक मृत्यूंचा समावेश होत नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 19, 2025 | 03:23 PM
Womens helath

Womens helath

Follow Us
Close
Follow Us:
  • एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत जिल्ह्यात एकूण १०३ मातामृत्यूंची नोंद
  • गुंतागुंती किंवा प्रसूतीनंतर ४२ दिवसांच्या आत होणारी मृत्यु म्हणजे मातामृत्यू
  • महाराष्ट्र सरकारकडून मातामृत्यू रोखण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण योजना
महेश बदने। नवराष्ट्र : पुणे जिल्ह्यातील मातामृत्यूचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत जिल्ह्यात एकूण १०३ मातामृत्यूंची नोंद झाली होती. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ६७, पिंपरी-चिंचवड महापालिकेत २८, दौंडमध्ये ३, बारामतीमध्ये १. जुन्नरमध्ये १, आंबेगावमध्ये १, खेडमध्ये १ आणि इंदापूरमध्ये १ असा समावेश होता.

या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या सात महिन्यांत ४४ मातामृत्यू नोंदले गेले आहेत. ही संख्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी असली तरी काही भागांतील वाढ चिंताजनक आहे. यापैकी पुन्हा सर्वाधिक २७ मृत्यू पुणे महापालिका क्षेत्रात झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२, बारामतीत २, आंबेगावमध्ये २ आणि दौंडमध्ये १ मातामृत्यूची नोंद झाली आहे. या वर्षी इतर कोणत्याही तालुक्यात एकही मातामृत्यू झाला नाही.

Trains Cancelled: प्रवाशांनो लक्ष द्या! १ डिसेंबर ते ३ मार्च दरम्यान २४ गाड्या रद्द; जाणून घ्या काय आहे कारण

मातामृत्यूची प्रमुख कारणे
गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीनंतर ४२ दिवसांच्या आत उद्भवणाऱ्या गुंतागुंतींमुळे होणाऱ्या मृत्यूला मातामृत्यू म्हणतात. यात अपघात किंवा इतर आकस्मिक मृत्यूंचा समावेश होत नाही.

  • प्रसवपूर्व व प्रसवोत्तर रक्तस्राव
  • गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब / प्रीक्लॅम्पसिया-एक्लॅम्पसिया
  • संसर्ग (सेप्सिस)
  • गर्भपातानंतरची गुंतागुंत
  • अम्नियोटिक फ्लुइड एम्बोलिझम
  • फुफ्फुसीय अंतःशल्यता (पल्मनरी एम्बोलिझम)
  • सिकल सेलशी संबंधित गुंतागुंत
  • हृदयरोग किंवा हृदयविकाराशी संबंधित समस्या

मातामृत्यू रोखण्यासाठी सरकारी उपाययोजना

महाराष्ट्र सरकारकडून मातामृत्यू रोखण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. यामध्ये जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, मातृत्व अनुदान, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, अॅनिमिया मुक्त भारत, सुरक्षित मातृत्व आश्वासन (SUMAN) आणि वात्सल्य कार्यक्रमांचा समावेश आहे. या योजनांतर्गत गर्भवती व प्रसूत माताना मोफत उपचार, लंब तपासण्या, आर्थिक मदत, मोफत रुग्णवाहिका, औषधे आणि संस्थात्मक प्रसूतीसाठी प्रोत्साहन दिले जाते.

Navi Mumbai Crime : “ऐरोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी

राज्य कृती समिती आखणार पुढची रणनीती

सध्या राज्यातील मातामृत्यू दर प्रति एक लाख जिवंत जन्मांमागे ३६ आहे आणि ती आणखी कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, त्यासाठी दर महिन्याला जिल्हा, महापालिका आणि प्रादेशिक स्तरावर बैठकांचे आयोजन कैले जाते, राज्यस्तरीय पुनरावलोकनही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले जाते. प्रत्येक मातामृत्यूची सखोल चौकशी करून लाईन लिस्ट, अन्वेषण अहवाल तयार केला जातो आणि MCDSR सॉफ्टवेअरमध्ये नौद केली जाते. प्रत्येक प्रकरणाची तपासणी समितीकडून चौकशी करून अहवाल शासनाकडे पाठवला जातो. ज्यानुसार राज्य कृती दल समिती पुढील धोरण आखते.

 

 

Web Title: Maharashtras maternal mortality rate is lowest after kerala at 36 44 maternal deaths recorded between april and october

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • Womens Health

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.