मकर संक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमात घ्या हटके उखाणे
देशभरात सगळीकडे 14 जानेवारीला मोठ्या उत्साहात सगळीकडे मकर संक्रांत साजरी केली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये सर्वच सणांना विशेष महत्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. तसेच या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होते. मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वच घरांमध्ये महिला हळदी-कुंकू , बोरन्हाण इत्यादी कार्यक्रम साजरा केला जातात. शिवाय एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या जातात. मकर संक्रातीच्या दिवशी महिला काळ्या रंगाची साडी नेसतात. तसेच घरी हळदीकुंकूचे आयोजन केले जाते. हळदीकुंकू कार्यक्रमात महिला वेगवेगळे गमतीशीर उखाणे सुद्धा घेतात.(फोटो सौजन्य – iStock)
मकर संक्रांतीला महिला काळ्या रंगाची साडी नेसून छान हलव्याचे दागिने परिधान करून सुंदर तयार होतात. हलव्याचे दागिने प्रामुख्याने मकर संक्रांतीच्या दिवशी घातले जातात. अशी परंपरा मागील अनेक वर्षांपासून चालू आहे. मकर संक्रांतीच्या हळदीकुंकूमध्ये महिलांना हळद कुंकू देऊन छानसे वाण दिले जाते. तसेच यादिवशी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मकर संक्रांतीच्या हळदीकुंकूमध्ये घेण्यासाठी काही हटके उखाणे सांगणार आहोत. वाचा गंमतीशीर उखाण्यांची लिस्ट.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
चांदीच्या दिव्यात लावली
तुपाची वात
…रावांचे नाव घेत करते
हळदी कुंकवाला सुरुवात.
मकर संक्रांतीला,
काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड,
….राव माझे पती नाहीत,
तर आहेत बेस्ट फ्रेंड.
लग्नानंतर मकर संक्रांतचा
पहिला सण करते साजरा,
…. रावांचा स्वभाव,
आहे फार लाजरा.
देवाने दिला असा जोडीदार,
….[पतीचे नाव] नाव घेतल्यावर
भरतो मनात आनंदाचा भार.
फेसबुकवर फ्रेंड्स अन्
इंस्टाग्रामवर फॅन्स,
…[पतीचे नाव]च आहेत
माझ्या आयुष्यातले
बेस्ट फ्रेंड!
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये
जसा असतो फन,
….[पतीचे नाव]च आहेत
माझ्या आयुष्याचा
मुख्य पिलर अन् रन!
झाडाला लागते फळ,
.. [पतीचे नाव]च आहेत
माझे संसाराचे बल.
तीळगुळ घ्या,
गोड गोड बोला,
… रावांचे नाव घेण्याचं
भाग्य मिळालं मला…
चांदीच्या दिव्यात लावली
तुपाची वात
…रावांचे नाव घेत करते
हळदी कुंकवाला सुरुवात…
ते उडवत होते पतंग,
आणि मी पकडली होती फिरकी,
..रावांच्या मागे,
सात जन्म अशीच
घेईन मी गिरकी…
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
जाई जुईच्या फुलांपेक्षा
शोभून दिसते शेवंती,
…रावांना सुखी ठेवा
हीच देवाला विनंती
माहेर माझे बागायती, बागेत पिकल्या केळी सासरी नांदत ….. रावांचे नाव घेत मकरसंक्रांतीच्या वेळी
मकरसंक्राती निमित्त जमल्या सख्या हळदी कुंकवाला ……. रावांचे नाव घेत आली मी तुमच्या स्वागताला
हळदी कुंकवानिमित्त दरवळला अत्तराचा सुगंध …… रावांचे आणि माझे आहेत जन्मोजन्मींचे दृढ बंध
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला ……. रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला