नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती. या दिवशी महिला काळ्या रंगाची साडी परिधान करतात. शिवाय अनेक घरांमध्ये हळदीकुंकू सुद्धा ठेवले जाते. मकरसंक्रांती हा सण संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी तीळ गूळ वाटण्याची परंपरा आहे. तर काही भागांमध्ये सुगडं पूजन केले जाते. सणाच्या दिवशी सर्वच महिला अंगणात किंवा घराच्या दरवाज्यात सुंदर सुंदर रांगोळी काढतात. रांगोळी काढल्यानंतर अंगणाचे सौंदर्य वाढते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी अंगणात काढण्यासाठी काही सुंदर रांगोळी डिझाइन्स सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
मकरसंक्रांतीला अंगणात काढा 'या' डिझाइन्सची सुंदर रांगोळी
फुलांची रांगोळी अंगणात खूप सुंदर दिसते. त्यामुळे वेगवेगळ्या रंगाचा वापर करून तुम्ही या डिझाइन्सची रांगोळी काढू शकता.
संस्कारभारती रांगोळी काढण्यासाठी अतिशय सोपी आहे. त्यामध्ये तुम्ही या पद्धतीची डिझाईन काढून अंगणाची शोभा वाढू शकता.
रांगोळीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पतंग काढू शकता. कमीत कमी वेळात झटपट रांगोळी काढायची असेल तर तुम्ही या डिझाइन्सची रांगोळी काढू शकता.
अनेकदा हळदीकुंकूच्या दिवशी काय रांगोळी काढावी समजत नाही. अशावेळी तुम्ही रांगोळीमध्ये मंगळसूत्र, बांगड्या, हळद कुंकू काढता येईल.
संक्रांतीच्या दिवशी वेगवेगळ्या रंगाची सुंदर रांगोळी तुम्ही काढू शकता. रांगोळीमध्ये छोटे छोटे तिळगुळ काढून मकर संक्रांतीचे महत्व सांगणारी सुंदर रांगोळी तुम्ही काढू शकता.