
सध्या राज्यभरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर उन्हाळा वाढला आहे. या वाढत्या उन्हाळ्यात त्वचेसंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. तसेच बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या त्वचेवर लगेच दिसून येतो. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळ जमा होतात. यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागते. तसेच उन्हाळ्यात उन्हात बाहेर जाणून आल्यानंतर त्वचेवर तेज कमी होऊन त्वचा काळवंडते. त्वचा तेलकट झाल्यानंतर पिंपल्स किंवा मुरूम येण्याची शक्यता असते. पण उन्हामुळे त्वचेवरील हरवलेला ग्लो आणि नवरीसारखीचमकदार त्वचा पुन्हा मिळवायचा असेल तर आम्ही आज तुम्हाला घरच्या घरी केशरचा वापर करून क्रीम कशी बनवायची याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
केशरचा वापर जसा जेवणातील पदार्थांमध्ये केला जातो तसाच वापर त्वचेसाठी सुद्धा केला जातो. केशरमध्ये असलेले गुणधर्म त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामुळे त्वचा चमकदार आणि मऊ होण्यास मदत होते. केशर त्वचेवर नैसर्गिक ग्लो आणतो. त्वचेतील उत्पादनांमध्ये केशर असलेली उत्पादने अनेक महिला वापरतात. बाजारात मिळणाऱ्या बहुतेक प्रॉडक्टमध्ये केमिकल वापरले जाते. अशावेळी तुम्ही तुमच्या त्वचेसाठी घरच्या घरी केशराचा वापर करून घरगुती क्रिम बनवू शकता.
साहित्य:
असे तयार करा क्रीम
केशर क्रीम बनवण्याची कृती:
केशरपासून बनवलेली क्रीम तुम्ही रात्री झोपताना किंवा सकाळी लावू शकता. यामुळे त्वचेवर नवरीसारखा नैसर्गिक ग्लो दिसून येईल. तसेच उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होईल. त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपण बाजारात मिळणारे अनेक नवनवीन क्रीम लावतो. पण त्याचा फार काळ त्वचेवर प्रभाव दिसून येत नाही. पण बनवलेल्या केशरयुक्त क्रीममुळे त्वचा चमकदार होऊन सुंदर दिसेल.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.