heat stroke
नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. भर उन्हात बसल्याने उन्हाने 13 जणांचा बळी घेतला. सुमारे 120 नागरिकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तसेच 300 लोकांनी डिहायड्रेशन, उच्च रक्तदाब आणि थकवा या तक्रारी केल्या आहेत. त्यावेळी तेथील तापमान 38 अंश सेल्सिअस असल्याची माहिती मिळाली आहे. वाढत्या उन्हामुळे, आपण प्रवास करत असाल, अशा सभेचा किंवा कार्यक्रमात जाणार असाल किंवा कोणाच्या लग्न समारंभाला जाणार असाल तर आज आपण आपली काळजी घ्यायला हवी. उष्माघातापासून स्वत:चं संरक्षण कसं करावं ते आज आपण जाणून घेणार आहोत.
उष्णतेचा सर्वाधिक फटका रक्तदाबाचे रुग्ण, वृद्ध, लहान मुले, थायरॉईड रुग्ण, हार्ट पेशंट, मूत्रपिंडाचे रुग्ण, गर्भवती स्त्रीया आणि मधुमेहाचे रुग्ण यांना होतो.काही लोक म्हणतात की महाराष्ट्राचे प्रकरण उष्माघाताचे नाही तर हीट एग्जॉशन आहे, दोन्ही एकच आहेत की वेगळे? उष्माघात किंवा सन स्ट्रोक याला सामान्य भाषेत ‘लू’ असे म्हणतात. जेव्हा शरीर तापमान नियंत्रित करू शकत नाही तेव्हा असे होते. यामध्ये शरीराचे तापमान झपाट्याने वाढते आणि कमी होत नाही.
[read_also content=”अतिक अहमदच्या हत्येने सपा आमदार इरफान सोलंकी यांच्या कुटुंबीयांना धक्का, पत्नीची सुरक्षेची मागणी; काय आहे प्रकरण? https://www.navarashtra.com/india/atiq-ahmeds-murder-shocks-sp-mla-irfan-solankis-family-wife-demands-security-what-is-the-matter-nrdm-386696.html”]
जेव्हा एखाद्याला उष्माघाताचा झटका जाणवतो तेव्हा शरीरातील घामाची यंत्रणा निकामी होते. शरीराचे तापमान 10 ते 15 मिनिटांत 106°F किंवा त्याहून अधिक वाढू शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास मृत्यू किंवा अवयव निकामी होऊ शकतात. दुसरीकडे, हीट एग्जॉशन म्हणजे घामाद्वारे शरीरातील पाणी आणि मीठ दोन्ही नष्ट होणे. सोप्या भाषेत सांगायचे तर या स्थितीत शरीरातून खूप घाम येतो. ही एक गंभीर समस्या आहे, त्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत.
उष्माघाताची कारणे
हीट एग्जॉशनची लक्षणे-भरपूर घाम येणे, हात पाय थंड होणे, डोकेदुखी, मळमळ आणि उलटी,थकवा, पल्स रेट वाढणेहृदयाची गती वाढणे, स्नायू दुखणे
उष्णतेपासून संरक्षण- उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी पाणी आणि नारळ पाणी प्या. टरबूज, लिंबूपाणी, टोमॅटो यांचे पाणी आणि हंगामी फळांचे रस प्यावे. अचानक थंड ठिकाणाहून गरम ठिकाणी जाऊ नका. त्याचप्रमाणे गरम ठिकाणावरून थंड ठिकाणी जाऊ नका.घरातून बाहेर पडण्यापूर्वी छत्री, टोपी, हेल्मेट सोबत घ्या. सनस्क्रीन लावूनच उन्हात बाहेर जा. सनग्लासेस घातल्याची खात्री करा. चांगले सनग्लासेस वापरा जे कमीतकमी 99% UVB किरण आणि 50% पर्यंत UVA किरणांना अवरोधित करतात.
उष्माघात झाल्यास काय कराल ?
एखाद्याला उष्माघात झाला असेल तर सनस्ट्रोक झालेल्या व्यक्तीला उन्हात राहू देवू नका.कपड्यांचे जाड थर काढा आणि हवा लागू द्या.शरीर थंड होण्यासाठी कूलर किंवा पंख्यामध्ये बसा.थंड पाण्याने स्वच्छ धुवा.थंड पाण्याच्या कपड्याने शरीर पुसून काढा.डोक्यावर बर्फाचा पॅक किंवा थंड पाण्याने ओले केलेले कापड ठेवा.थंड पाण्यात भिजवलेला टॉवेल डोके, मान, बगल आणि मांडीवर ठेवा.या उपायांनंतरही शरीराचे तापमान कमी होत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.