Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यातील हवामानाचा तुमच्या मणक्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

पावसाळा हा जरी उष्णतेपासून आराम देत असला, तरी बदलत्या वातरणामुळे हवेचा दाब वाढून पाठदुखी आणि स्नायुंमधील कडकपणा वाढू शकतो. म्हणूनच मणक्यांची कशी काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 24, 2025 | 04:30 AM
पावसाळ्यातील हवामानाचा तुमच्या मणक्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Follow Us
Close
Follow Us:

पावसाळा हा जरी उष्णतेपासून आराम देत असला, तरी बदलत्या वातरणामुळे हवेचा दाब वाढून पाठदुखी आणि स्नायुंमधील कडकपणा वाढू शकतो. पाठदुखी आणि हवामानातील बदल यांचा परस्परसंबंध या लेखाच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे. लक्षात ठेवा, हवामानातील बदल तुमच्या मणक्यावर परिणाम करू शकतात. वेदनामुक्त आयुष्य जगण्यासाठी ऑर्थोपेडिक आणि स्पाइन सर्जन डॉ. धीरज सोनवणे यांनीकाही टिप्स दिल्या आहेत.

पावसाळ्यातील बदलत्या वातावरणामुळे पाठदुखी आणि सांधे कडक होणे यासारख्या तक्रारींमध्येही वाढ होते. अनेक लोकांना असे लक्षात येते की, पावसाळ्याच्या दिवसात, विशेषतः पहाटे किंवा रात्रीच्या वेळी पाठदुखीची तीव्रता वाढते. नको असलेल्या पाठदुखीमुळे दैनंदिन दिनचर्येवरही त्याचा परिणाम होतो . पावसाळ्यात आर्द्रता वाढून वातावरणाचा दाब कमी होतो आणि मणक्यासंबंधी तक्रारी डोकं वर काढू लागतात. पाठीच्या समस्या, दुखापती, संधिवात असलेल्यांनी या दिवसात विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे असा सल्ला दिला जातो.

हवेतील आर्द्रतेचा तुमच्या मणक्यावर कसा परिणाम होतो?

हवेतील आर्द्रतेमुळे शरीरातील स्नायू आणि अस्थिबंधनांसह मऊ ऊतींना सुज येते. यामुळे पाठीचा कणा आणि पाठीच्या खालच्या भागात कडकपणा येऊन हलचाली मंदावू शकतात. स्लिप डिस्क, सायटिका किंवा ऑस्टियोआर्थरायटिस सारख्या पाठीच्या आजार असलेल्या लोकांना पावसाळ्यात वातावरणातील दाबात बदल झाल्याने तसेच स्नायू ताठरणाऱ्या थंड हवामानामुळे तीव्र वेदना होऊ शकतात ज्यामुळे पाठदुखीचा त्रास होतो. त्याचप्रमाणे जी लोकं शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय असतात आणि घरात जास्त वेळ घालवतात त्यांना याचा त्रास अधित जाणवतो. जास्त वेळ बसणे, घरून काम करताना चुकीची शारीरीक स्थिती बाळगणे आणि स्ट्रेचिंग किंवा हालचाल न करणे यामुळे पाठीचा कणा आणि पाठीच्या खालच्या भागात ताण येतो, ज्यामुळे वेदना आणि गतिहीनता निर्माण होते. दमट वातावरण आणि निसरडे रस्ते यामुळे पडणे किंवा पाठीला दुखापत होण्याचा धोका देखील वाढतो.

पावसाळ्यात तुमच्या पाठीचे संरक्षण करण्यासाठी ‘या’ टिप्स लक्षात ठेवा

पाठीचा कणा लवचिक ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करा, स्ट्रेचिंग करा आणि चालायला विसरु नका. तुमची पाठ सरळ आणि खांदे आरामदायी स्थितीत ठेवून बसण्याची योग्य पध्दत वापरा. योग्य शारीरीक स्थिती राखण्याची खात्री करा. जास्त वेळ काम करत असल्यास पाठीला योग्य आधार देणारी खुर्ची वापरा. स्नायुंचा कडकपणा आणि वेदना कमी करण्यासाठी दुखणाऱ्या जागी हीटिंग पॅड किंवा हॅाट कॉम्प्रेस वापरा. थंड किंवा ओल्या हवामानात वावरताना, उठताना, वाकताना किंवा एखादी जड वस्तू उचलताना काळजी घ्या.

Web Title: Monsoon weather can have serious effects on your spine know the advice of experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 04:30 AM

Topics:  

  • Health Article
  • Health News
  • latest news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला
2

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
3

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
4

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.