आवळ्याचे केसांना असलेले फायदे
केसांचे सौदंर्य वाढवण्यासाठी आवळा हे फळ अतिशय गुणकारी आहे. चवीला तुरट असलेल्या आवळ्याचे सेवन केल्यामुळे केसांसह आरोग्यालासुद्धा फायदे होतात. केसांच्या लांबलचक वाढीसाठी अनेक महिला केसांना बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स आणि केमिकल ट्रीटमेंट करतात. पण केसांवर हानिकारक रसायन लावल्यामुळे केसांची वाढ पूर्णपणे थांबते आणि केस खराब होतात. खराब झालेले केस पुन्हा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आज माही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी घरगुती पदार्थांचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. घरगुती पदार्थ वापरल्यामुळे केसांची वाढ होऊन केसांचे नुकसान होत नाही.
केसांच्या मजबूत वाढीसाठी अनेक लोक नियमित एका आवळ्याचे सेवन करतात. आवळ्यामध्ये असलेले गुणधर्म केसांच्या वाढीस प्रभावी आहेत. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किंवा रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन करावे. आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आणि इतर जीवनसत्वे आढळून येतात. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे टाळूवरील कोंडा आणि इन्फेक्शन कमी होते. त्यामुळे केसांच्या घनदाट वाढीसाठी आवळ्यामध्ये हे पदार्थ मिक्स करून लावा.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: पिगमेंटेशनमुळे खराब झालेले त्वचेचे सौदंर्य पुन्हा उजळ्वण्यासाठी ‘हे’ पदार्थ वापरा, त्वचा दिसेल आकर्षक
आवळ्याचे केसांना असलेले फायदे
केसांच्या वाढीसाठी आवळा आणि कढीपत्ता दोन्ही पदार्थ प्रभावी आहेत. यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात कढीपत्त्याची पाने आणि आवळ्याचे तुकडे टाकून पेस्ट तयार करून घ्या. आवळे उपलब्ध नसल्यास तुम्ही त्यात आवळ्याची पावडर सुद्धा टाकू शकता. तयार केलेली पेस्ट टाळूवर आणि केसांच्या टोकांपर्यंत लावून कोरडी होण्यासाठी ठेवा. 30 मिनिटं झाल्यानंतर शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवा. यामुळे टाळूवरील कोंडा निघून जाईल. कढीपत्यामध्ये भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे केसांची वाढ होते.
आवळ्याचे केसांना असलेले फायदे
स्वयंपाक घरात जेवणाची चव वाढवणारा कांदा केसांसाठी अतिशय प्रभावी आहे. कांद्याचा रस केसांना लावल्यामुळे केस गळणे पूर्णपणे थांबते. यासाठी अर्धावाटी कांद्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात आवळ्याचे तुकडे टाका. त्यानंतर त्यात केलेली पेस्ट गाळून त्यातील पाणी केसांच्या मुळांना आणि टोकांना व्यवस्थित लावून घ्या. नंतर 30 मिनिटं केस कोरडे होण्यासाठी ठेवा. केस धुवण्यासाठी शॅम्पूचा वापर करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता.
हे देखील वाचा: मोहरीच्या तेलात मिक्स करा 1 पदार्थ, लांबसडक केसांची कमाल
आवळ्याचे केसांना असलेले फायदे
आवळ्यामध्ये विटामिन सी, ई मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी सकाळी उठल्यावर नियमित आवळ्याच्या सरबताचे सेवन करावे. आवळ्याचे सेवन केल्यामुळे केसांच्या कूपांमध्ये ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होऊन केसांची वाढ होते. व्हिटॅमिन सी कोलेजनची निर्मिती वाढतो. यामुळे केसांचे बॅक्टरीयापासून होणारे नुकसान टाळता येते. आवळ्याच्या रसामध्ये असलेले टॅनिन घटक सूर्यकिरणांपासून केसांचे संरक्षण करतो.