Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गुलाबी साडी आणि..’ नीता अंबानींनी नेसली पारंपरिक गुजराती बांधणी साडी, रॉयल अंदाजात वेधले लक्ष

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा जल्लोष सुरू झाला आहे. ही जोडी 12 जुलै 2024 रोजी लग्नगाठ बांधणार आहे आणि हा तीन दिवसांचा कार्यक्रम असेल. तत्पूर्वी, अनंता-राधिकाचा मामेरू समारंभ 3 जुलै 2024 रोजी अंबानी निवासस्थान 'अँटिलिया' येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी आई नीता अंबानीच्या साडीने वेधले लक्ष.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 05, 2024 | 10:39 AM
ममेरू सोहळ्यात नीता अंबांनींचा लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

ममेरू सोहळ्यात नीता अंबांनींचा लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

नीता अंबानी आणि त्यांची स्टाईल म्हणजे एखाद्याचे डोळे दिपतील अशी आहे. नीता अंबानी नेहमीच क्लासी आणि एलिगंट साड्यांमध्ये दिसून येतात. सध्या अंबानी कुटुंबातील सर्वात लहान असणाऱ्या अनंत अंबानीच्या लग्नाची धुमधाम सुरू आहे. राधिका मर्चंटसह अनंत 12 जुलै रोजी विवाहबद्ध होणार आहे. 

या विवाहाच्या पूर्वी होणाऱ्या विधींना सुरूवात झाली असून नुकताच ममेरू सोहळा संपन्न झाला. यावेळी सर्वांनीच बांधणी साड्यांना प्राधान्य दिले होते. मात्र 60 व्या वर्षीही नीता अंबानी यांच्या सौंदर्याने सर्वांवर मात केली. नीता अंबानी यांनी यावेळी सब्यासाचीने डिझाईन केलेली बांधणी साडी नेसली होती. कसा होता नीता अंबानी यांचा लुक पाहूया (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम) 

रॉयल बांधणी साडी 

पारंपरिक गुजराती बांधणी साडी

नीता कोणत्याही कार्यक्रमात आपल्या लुक्सने लोकांचे लक्ष वेधून घेण्यात कधीही अपयशी ठरत नाही आणि यावेळीही त्यांच्या लुकमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. अनंत आणि राधिकाच्या मामेरू सोहळ्यातही नीता अंबांनींचा सुंदर लुक पाहायला मिळाला होता. या फंक्शनसाठी सोनेरी जरी वर्क असलेली गुलाबी रंगाची बांधणी साडी त्यांनी नेसली होती.

पारंपरिक पद्धतीने नेसली साडी 

काय आहेत साडीची वैशिष्ट्ये

नीता अंबानी यांनी गुजराती पारंपारिक शैलीत साडीचा पदर पुढच्या बाजूला स्टाईल केला होता. गुलाबी आणि गोल्डन जरी वर्क असणारी ही साडी खूपच सुंदर आणि आकर्षक दिसून येत होती. गुलाबी, सोनेरी आणि केशरी रंगाचा ओम्ब्रे ब्लाउज घातला होता. हा लुक परफेक्ट गुजराती लुक देत होता. 

डायमंड पाचूचा नेकलेस 

हिऱ्यांमध्ये जडलेल्या पाचूचा नेकपिस

लुक पूर्ण करण्यासाठी नीता अंबानी यांनी मोठे पाचू जडवलेला डायमंड नेकपीस घातला होता. शिवाय, त्यांनी यासह मॅचिंग कानातले आणि दोन डायमंडच्या बांगड्या घातल्या होत्या. नेहमीप्रमाणेच हिरे आणि पाचूंनी सजूनधजून नीता अंबानी यांनी आपला हा लुक पूर्ण केला होता. 

वेव्ही हेअरस्टाईल 

साडीवरील परफेक्ट हेअरस्टाईल

या संपूर्ण लुकसह हेअरस्टाईल करताना केस मोकळे ठेवले होते. तर नीता अंबानींची ही हेअरस्टाईल वेव्ही केल्यामुळे अधिक आकर्षक दिसत होती आणि त्यांच्या बांधणी साडीसह परफेक्ट मॅचदेखील होताना दिसत आहे. 

सटल मेकअप 

सुंदर आणि आकर्षक मेकअप

नीता अंबानी यांचा मेकअप नेहमीच प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टर करतात आणि यावेळीदेखील अत्यंत सटल आणि आकर्षक असा मेकअप करण्यात आला होता. दाट भुवया, आयलायनर, काजळ, मेकअप बेस, हायलायटर, डार्क आयशॅडो आणि गुलाबी रंगाची हलकीशी लिपस्टिक लावत हा लुक पूर्ण केलाय.

Web Title: Nita ambani wore sabyasachi traditional bandhani saree for mameru ceremony looks stunning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 10:39 AM

Topics:  

  • fashion tips
  • Nita Ambani
  • nita ambani saree

संबंधित बातम्या

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध
1

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला खरेदी करा ‘या’ मराठमोळ्या डिझाईनच्या सुंदर नथ, चारचौघांमध्ये होईल गोड कौतुक
2

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला खरेदी करा ‘या’ मराठमोळ्या डिझाईनच्या सुंदर नथ, चारचौघांमध्ये होईल गोड कौतुक

Vat Purnima 2026: वटपौर्णिमा सणाला नेसा ‘या’ आकर्षक रंगांच्या साड्या! सौभाग्याच्या सणासाठी परफेक्ट लुक
3

Vat Purnima 2026: वटपौर्णिमा सणाला नेसा ‘या’ आकर्षक रंगांच्या साड्या! सौभाग्याच्या सणासाठी परफेक्ट लुक

History Of Clothes Size: कपड्यांची M, L, XL साईज नक्की कधी सुरू झाली, मनोरंजक इतिहास
4

History Of Clothes Size: कपड्यांची M, L, XL साईज नक्की कधी सुरू झाली, मनोरंजक इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.