
अनेकांचे परदेशी जाण्याचे स्वप्न असते. मात्र दुसऱ्या देशांत जायचे असले की त्यासाठी आपल्याला पासपोर्ट आणि विजा बनवण्याची आवश्यकता असते. सुट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत परदेशी फिरायला जायचे असले आणि पासपोर्ट आणि विसा बनवलेला नसला की, अनेकांचीया ऐनवेळी गोची होऊन बसते. कारण अनेकदा पासपोर्ट आणि विसा बनवायला टाकला की तो बनवून हातात येईपर्यंत तुमच्या सुट्ट्याचं संपून जातात. मात्र आता यावेळी असं काहीच होणार नाही. आता तुमच्याकडे वीज नसला तरीही तुम्ही जगातील काही देशांना बिनधास्तपणे भेट देऊ शकता.
जगभरात असेही काही देश आहेत जिथे भारतीय व्हिसाशिवाय जाऊन फिरू शकतात. तसेच काही देशांत व्हिसा ऑन अरायव्हल उपलब्ध आहेत. फक्त तिकीट खरीदी करून तुम्ही या देश्न्न भेट द्यायला जाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही देशांविषयीची माहिती सांगणार आहोत, जिथे तुम्ही व्हिसाशिवाय निन्दास्त फिरायला जाऊ शकता आणि तुमची सुट्टी एन्जॉय करू शकता.
[read_also content=”जीवनात एकदा तरी भारतातील या ठिकाणांना भेट दिलीच पाहिजे, काय आहे खासियत वाचा https://www.navarashtra.com/lifestyle/must-visit-places-of-india-read-what-is-special-about-it-538672.html”]
भूतान
भूतान हा देश भारताच्या बाजूलाच असून आपण याला आपला शेजारी देश असेही म्हणू शकतो. हा देश हिमालयीन सौंदर्याने नटलेले आहे. इथे भारतीयांना व्हिसाशिवाय फिरण्याची परवानगी आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि शांततेपासून ते ट्रेकिंगपर्यंत तुम्हाला इथे अनेक गोष्टींचा अनुभव घेता येईल. इथे बौद्ध धर्माची लोकं अधिक आहेत, त्यामुळे इथे तुम्हाला बौद्ध मंदिरे आणि त्यांची सुंदर दृश्ये पाहायला मिळतील.
नेपाळ
नेपाळ हा देखील भारताच्या शेजारील दक्षिण आशियाई देश आहे. या देशातही भारतीयांना व्हिसाशिवाय फिरण्यास कोणतीही पाबंदी नाही. हिमालयावर वसलेला देश म्हणून याची ओळख आहे. जगातील सर्वात उंच पर्वत, जिथे सर्व ट्रेकर्सना एकदा तरी जाण्याची इच्छा असते तोदेखील याच देशात स्थित आहे. जगातील सर्वात उंच पर्वत शिखरांपैकी १२ नेपाळमध्ये आहेत. हे बुद्धाचे जन्मस्थान देखील आहे. हिंदूंचे प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिरही येथे आहे.
मालदीव्ज
व्हेकेशन प्लॅन म्हटला की, अनेकांच्या मनात मालदीव्ज नाव येते. फिरण्यासाठीच्या प्रसिद्ध स्थळांपैकी हे एक आहे. मालदीव्ज हे एक बेत असून, भारतीय नागरिकांना इथे व्हिसाशिवाय ऐकू ९० दिवस राहण्याचे सावतंत्र्य आहे. येथे तुम्हाला स्वच्छ समुद्र किनारा, निळे आकाश आणि स्वच्छ पाणी मिळेल. सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी हे एक परफेक्ट स्पॉट आहे.
फिजी
फिजी या देशांत एकूण 300 बेट असून, द्वीपांचा समूह द्वीपसमूह म्हणून याला ओळखले जाते. या देशांत भारतीय पर्यटक एकूण 120 व्हिसाशिवाय राहू शकतात. सर्वात विकसित देशांपैकी एक फिजी हा देश आहे. इथे तुम्हाला अनेक समुद्र किनारे पाहायला मिळतील आणि यातील पाणी इतके स्वछ असते, पाण्याच्या खालील खडकदेखील तुम्हाला स्पष्टपणे दिसू शकतात.