फोटो सौजन्य - Social Media
आजच्या डिजिटल युगात संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईलसमोर तासन्तास बसून राहणे आपल्यासाठी अगदी रोजचं झालं आहे. या सवयीचा थेट परिणाम आपल्या पोस्चरवर म्हणजेच बसण्याच्या-उभे राहण्याच्या पद्धतीवर होतो. चुकीचा पोस्चर हा फक्त व्यक्तिमत्त्व बिघडवत नाही तर त्यातून पाठदुखी, मान आखडणे, डोकेदुखी, थकवा यांसारख्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात. पण या समस्येवर सोपे आणि प्रभावी उपाय म्हणजे काही नियमित व्यायाम. दररोज काही मिनिटे हे व्यायाम केले, तर पाठ, खांदे आणि कोर मसल्स मजबूत होऊन पोस्चर सुधारते.
चेस्ट स्ट्रेच
सतत पुढे वाकून काम केल्याने छातीच्या स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो. दरवाजाच्या चौकटीला हात ठेवून पुढे झुकल्याने हे स्नायू सैल होतात आणि खांदे पुन्हा सरळ होतात.
प्लँक
कोर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी उत्तम व्यायाम. शरीर डोक्यापासून टाचा पर्यंत सरळ ठेवून २०-३० सेकंद होल्ड करणे गरजेचे. हा व्यायाम रीढ़ मजबूत करून पोस्चर सुधारतो.
कॅट-काऊ स्ट्रेच
योगातील हा आसन रीढ़ लवचिक बनवतो. हात-पायावर आधार घेऊन कधी पाठीचा कणा वाकवणे तर कधी झुकवणे असे आलटून-पालटून करणे उपयुक्त ठरते.
स्कॅप्युलर रिट्रॅक्शन
खांद्याच्या ब्लेडना मागे आणून काही सेकंद धरण्याचा हा व्यायाम. यामुळे खांदे नेहमी मागे राहतात आणि बसण्याची सवय सुधारते.
ब्रिज एक्सरसाइज
पाठ टेकून झोपून गुडघे मोडून कंबरेला वर उचलणे. यामुळे पाठीचा खालचा भाग, ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग मजबूत होतात आणि श्रोणि योग्य स्थितीत राहते.
नियमितपणे हे पाच व्यायाम केले, तर ऑफिसमध्ये बसूनही पाठीची काळजी घेता येते. फक्त १०-१५ मिनिटे दिली तरी पाठदुखी, थकवा आणि चुकीच्या पोस्चरपासून मुक्ती मिळू शकते. हे व्यायाम कुठेही करता येतात आणि साध्या पद्धतीने आरोग्य सुधारण्यात मोठा हातभार लावतात.