(फोटो सौजन्य: istock)
शरीरातील प्रत्येक अवयव जसा आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा असतो तितकीच महत्त्वाची आपल्या शरीरातील हाडे असतात. हाडांचे मजबूत असणे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांपासून दूर ठेवण्याचे काम करते. हाडांना मजबूत करण्यासाठी दुधाचे सेवन करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो पण आपण हे विसरतो की, आपल्या आहारातील काही पदार्थच हाडांना ठिसून आणि कमकुवत बनवण्याचे काम करत असतात. वाढत्या वयानुसार, हाडांची घनता कमी होऊ लागते आणि फ्रॅक्चर, सांधेदुखी यासारख्या समस्या उद्भवू लागतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, आपल्या रोजच्या आहारातील अनेक घटक हे आपल्या शरीरातील कॅल्शियम शोषण्यास अडथळा निर्माण करत असतात, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. निरोगी हाडांसाठी या पदार्थांना वेळीच आपल्या आहारातून काढून टाकणे फायद्याचे ठरू शकते. चला यात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.
अतिमिठाचे सेवन
मिठाचे जास्त सेवन हाडांसाठी चांगले नाही. जेव्हा आपण सोडियम असलेले पदार्थ खातो जसे की, चिप्स, चिवडा, लोणचे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ तेव्हा शरीर अतिरिक्त सोडियम मूत्राद्वारे बाहेर पडते. असे होत असतानाच या प्रक्रियेत सोडियमसोबतच शरीरातील कॅल्शियम देखील बाहेर पडते ज्यामुळे हाड कमकुवत होऊ लागतात.
कॅफिनयुक्त ड्रिंक्स
अनेकांना सकाळी उठताच चहा, कॉफी अशा ड्रिंक्सचे सेवन करण्याची सवय आहे मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुमची ही सवय तुमच्या हाडांना हानी पोहचवत असते. कॅफिनमुळे शरीरातील कॅल्शियमचे शोषण कमी होते आणि लघवीद्वारे कॅल्शियमचे नुकसान होते. तथापि, दिवसातून एक किंवा दोन कप चहा किंवा कॉफी पिण्यात कोणतेही विशेष नुकसान नाही, परंतु जास्त प्रमाणात याचे सेवन होत असेल तर ते वेळीच रोखले पाहिजे.
मद्यपान
अल्कोहोल आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे हे सर्वांना ठाऊक आहेच पण याचा आपल्या हाडांवरही वाईट परिणाम होत असतो हे अनेकांना ठाऊक नाही. अल्कोहोलचे सेवन शरीरातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी शोषण्यास अडथळा आणते, जे हाडांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. अल्कोहोलचे अधिक सेवन हाडांना हळूहळू कमकुवत करण्याचे काम करतात.
जास्त गोड खाणे
केक, चॉकलेट, तृणधान्ये यांसारखे साखरेचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ शरीरात आम्लता आणि जळजळ वाढवतात. यामुळे, शरीर हाडांमधून कॅल्शियम आणि इतर खनिजे खेचून घेतो ज्यामुळे हाडांची घनता कमी होऊ शकते.
प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन
फ्रोझन मील्स, इन्स्टंट नूडल्स, चिप्स आणि रेडी-टू-ईट स्नॅक्स सारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये केवळ मीठ जास्त प्रमाणात नसते तर प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि इतर रसायने देखील असतात. या सर्व गोष्टी शरीराच्या नॅचरल मिनरल्स बॅलन्सला बिघडवू शकतात आणि हाडांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.
निरोगी हाडांसाठी काय करावे?
FAQs (संबंधित प्रश्न)
कमकुवत हाडांमुळे वेदना होतात का?
ऑस्टियोपोरोसिस आजार असलेल्या लोकांना कोणतीही लक्षणे नसतील. काहींना हाडे आणि स्नायूंमध्ये, विशेषतः पाठीत वेदना होऊ शकतात.
कोणत्या वयात हाडे मजबूत होणे थांबतात?
बहुतेक लोक २५ ते ३० वयोगटातील त्यांच्या हाडांच्या वस्तुमानाच्या शिखरावर पोहोचतात . वयाच्या ४० व्या वर्षी पोहोचल्यावर, आपण हळूहळू हाडांच्या वस्तुमानाचे प्रमाण कमी करू लागतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.