couple with infertility
महिला आणि पुरुष दोघांमध्ये वंध्यत्व अथवा गर्भधारणेसंबंधित दोष असू शकतात. ही समस्या केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही जाणवत आहे. याच संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. जगभरातील सुमारे 17.5 टक्के प्रौढ लोकसंख्येतील दर सहा व्यक्तींपैकी एक व्यक्ती (One in Six People Affected By Infertility) वंध्यत्वाने ग्रस्त आहे, असं WHO च्या अहवालात म्हटलं आहे. या नव्या अहवालानुसार, जगभरातील सुमारे 17.5 टक्के लोकसंख्या वंध्यत्वाने (Infertility) ग्रस्त आहेत. श्रीमंत देशांमध्ये ही संख्या 17.8 टक्के आहे तर गरीब देशांमध्ये 16.5 टक्के लोकांना वंध्यत्वाची समस्या जाणवत आहे.
जेव्हा एखादं जोडपं एक वर्षाहून अधिक काळ नैसर्गिकरीत्या प्रयत्न करूनही गर्भधारणा करू शकत नाही, तेव्हा ते जोडपं इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्वाच्या समस्येनी ग्रस्त असल्याचं मानलं जातं. नियमित असुरक्षित लैंगिक संभोगानंतरही त्यांना गर्भधारणा होत नसते.
या समस्येमुळे अनेकांना सामाजिक, आर्थिक त्रास भोगावा लागत आहे. ज्यामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनी नमूद केलं आहे. दरम्यान जगभरातील सुमारे 12.6 टक्के लोक काही काळ वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार, गर्भनिरोधकाशिवाय बाळासाठी वर्षभर प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने एखादी व्यक्ती वंध्यत्वाची शिकार होऊ शकते.
[read_also content=”“अरे बापरे काही तरी झ्यांगाट झालेले दिसतंय…”, जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनं राजकीय वर्तुळात चर्चा; असं काय आहे ट्विटमध्ये? एकदा वाचाच… https://www.navarashtra.com/maharashtra/o-my-god-something-seems-to-have-gone-awry-jitendra-awhad-tweet-discussion-in-the-political-circle-what-that-in-a-tweet-read-it-once-381170.html”]
जागतिक आरोग्य संघटनेच्या 1990 ते 2021 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या 133 वेगवेगळ्या अभ्यासांच्या अहवालाच्या विश्लेषणाच्या आधारे अहवालातली आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात 66 संशोधने ही विवाहित पती- पत्नींच्या (जोडप्यांच्या) अभ्यासातून करण्यात आली तर 53 अहवालात अविवाहित पण एकमेकांसोबत राहणाऱ्या लोकांचाही अभ्यास करण्यात आला, याशिवाय 11 अभ्यास असे अभ्यास होते ज्यात वैवाहिक स्थितीबद्दलची माहिती उघड झाली नाही.
या अभ्यासात, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या अधिक होती, पण अभ्यासात सहभागी लोकांमध्ये महिलांची संख्याही जास्त होती. यात 35 टक्के लोक युरोपीयन होतो. तर 9 टक्के लोक दक्षिण आशियातील होते ज्यात भारताचाही समावेश होता.
भारतात वंध्यत्वाचा सामना करणारे अनेक जण आपल्या खिश्यातून पैसे खर्च करत आहेत. अनेक लोक खाजगी आरोग्य केंद्रावर आयव्हीएफ उपचारांसाठी जातात, पण आयव्हीएफ सायकलची किंमत खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत सरकारी रुग्णालयांमध्ये आयव्हीएफसारखी प्रक्रिया फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. यात भारतात सर्वाधिक लोक मूल- बाळ होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वाधिक खर्च केला जातो, असंही जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे.
भारतातील एक व्यक्ती एआरटी सायकलसाठी सरासरी वार्षिक उत्पन्नापेक्षा 166 पट जास्त खर्च करते. यात भारतात एका एआरटी सायकलसाठी 15 लाख 30 हजार रुपये इतका खर्च करावा लागतो. यासाठी भारतात होणार खर्च सर्वाधिक आहे. जगभरातील अनेक जोडपी बाळ होण्याच्या उपचारांसाठी किमान 1 लाख 73 हजार रुपये खर्च करतात, तर काही ठिकाणी हा खर्च 15 लाखांच्या पुढे आहे.