Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Live news Updates- गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,४४८ च्या आसपास व्यवहार करत होता,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 16, 2026 | 06:52 PM
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:

India Share Market Update:  १६ फेब्रुवारी रोजी, सोमवारी आज भारतीय शेअर बाजार लाल रंगात उघडू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. यामुळे आज कोणतेही शेअर्स खरेदी करताना गुंतवणूकदारांनी सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. जागतिक बाजारात आज मिश्र संकेत पाहायला मिळाले आहेत. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होणार असून, सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, लाल रंगात उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

The liveblog has ended.
  • 16 Feb 2026 06:51 PM (IST)

    16 Feb 2026 06:51 PM (IST)

    IMD Alert: ऐन उन्हाळ्यात छत्र्या, स्वेटर घेण्याची वेळ येणार? कुठे पाऊस तर कुठे…; धावपळ होणार

    देशातील हवामानात सध्या बदल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आयएमडीने याबाबत इशारा दिला आहे. हिंद महासागर आणि आणि बंगालच्या उपसागरात मध्यभागी हवेचा चक्रवर्ती प्रभाव वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे देशातील अनेक भागात हवामान बदलणार असल्याचे सांगितले गेले आहे. दरम्यान आयएमडीने काय इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात.

  • 16 Feb 2026 06:45 PM (IST)

    16 Feb 2026 06:45 PM (IST)

    Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

    अमरावती : अमरावती जिल्हाने देशव्यापी बालविवाहमुक्त भारत’ ऑनलाइन प्रतिज्ञा मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात टॉप २० मध्ये स्थान मिळवले आहे. आतापर्यंत ३८ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रतिज्ञा घेत अमरावतीला राज्यात ७ वा क्रमांक मिळवून दिला असून, बालविवाहविरोधी लढ्‌यात जिल्ह्याचा सक्रिय सहभाग अधोरेखित झाला आहे जिल्ह्यातून आतापर्यंत ३८६९६, नागरिकांनी ‘मी बालविवाह करणार नाही…’ अशी ऑनलाइन प्रतिज्ञा घेतली असून, अमरावतीचा राज्यात ७ वा क्रमांक मिळविला. मात्र, राज्यात आघाडीवर असलेल्या अकोला ३९ हजार ८४४ आणि वाशिम १४ हजार ३८३ नागरिकांनी ही शपथ घेतली आहे.

  • 16 Feb 2026 06:36 PM (IST)

    16 Feb 2026 06:36 PM (IST)

    Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

    कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यात जमिनीची खरेदी विक्री करण्याचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात.त्यामुळे कर्जत येथे असलेली दुय्यम निबंधक यांचे दुसरे कार्यालय नेरळ येथे सुरू करण्यात आले.आठ वर्षाचा कालावधी लोटला तरी या कार्यालयाला सरकारी जागा मिळाली नाही आणि आर्थिक व्यवहार होत असल्याने महत्वाचे अशा सरकारी कार्यालयाला भाड्याचे जागेचा सहारा घ्यावा लागत आहे. दरम्यान,एका भाड्याच्या जागेतून दुसऱ्या भाड्याच्या जागेत हे कार्यालय हलवले असून पूर्वी रस्त्याच्या अगदी बाजूला असलेले कार्यालय आता आडबाजूला नेण्यात आले आहे.त्यामुळे लोकांची गैरसोय होणार असून येथील दुय्यम निबंधक यांची मनमानी असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

  • 16 Feb 2026 06:19 PM (IST)

    16 Feb 2026 06:19 PM (IST)

    मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

    मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) आज सन 2026–27 या आर्थिक वर्षासाठी 48,072.57 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. 2017–18 नंतर प्रथमच हा अर्थसंकल्प शिल्कीचा असून १७ लाखांचा अधिशेष साध्य करण्यास प्राधिकरणास यश आले आहे. ४८,०७२.५७ कोटींचा अपेक्षित आर्थिक प्राप्ती आणि ४८,०७२.४० कोटींच्या प्रस्तावित खर्चामुळे अर्थसंकल्पात १७ लाखांचा अधिशेष दर्शविण्यात आला आहे. जमिनीच्या वापरातून संरचित निधी उभारणी, अर्बन ट्रान्सपोर्ट फंड (यूटीएफ) बळकटीकरण, प्रकल्पांशी संबंधित महसूलात झालेली सुधारणा, तसेच आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि संस्थात्मक वित्तपुरवठ्याच्या माध्यमातून उभारलेले भांडवल यामुळे हा अधिशेष साध्य झाल्याचे दिसून येते.

  • 16 Feb 2026 06:08 PM (IST)

    16 Feb 2026 06:08 PM (IST)

    सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार

    हरियाणा राज्यात मोठी घटना घडली आहे. दूषित पाण्याचे (Polluted Water) सेवन केल्याने हरियाणामध्ये तब्बल 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा जिल्ह्यातील पलवल जिल्ह्यातील छायसा गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. काही दिवस आधी मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये देखील असाच प्रकार समोर आला होता. छायसा गावात 15 दिवसांच्या आतमध्ये तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 16 Feb 2026 05:45 PM (IST)

    16 Feb 2026 05:45 PM (IST)

    Yeh Jawaani Hai Deewani 2 बद्दल एक मोठी अपडेट,

    काही बॉलिवूड चित्रपट वर्षानुवर्षे आपल्या मनात कोरले जातात. असाच एक चित्रपट होता करण जोहरचा ‘ये जवानी है दिवानी’, जो अजूनही लोक त्याच आवडीने पाहतात. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात सुपरस्टार रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणची जोडी खूप आवडली होती. कबीरा आणि इलाही सारखी गाणी अजूनही लोकांच्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट आहेत. सुपरस्टार रणबीर कपूरने एआरकेएसच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाईव्ह जाऊन त्याच्या सिक्वेलबद्दल मोठी अपडेट दिली आहे. त्याने त्याची पत्नी आलियासोबत ‘ब्रह्मास्त्र २’ चित्रपटाबद्दलही बोलले आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 16 Feb 2026 05:32 PM (IST)

    16 Feb 2026 05:32 PM (IST)

    गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी

    गुहागर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीने आपले वर्चस्व निर्माण केले. १० पैकी ९ पंचायत समिती जागांवर भाजपा शिवसेना युतीने सत्ता काबीज केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत युतीने ५ पैकी तीन जागांवर विजय मिळवला. विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना शह देण्यात भाजपा यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.

  • 16 Feb 2026 05:19 PM (IST)

    16 Feb 2026 05:19 PM (IST)

    सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?

    बारामती शहरातील रुई परिसरात राहणाऱ्या तरुणाने प्रेम संबंधातून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली, आत्महत्या पूर्वी आई मला माफ कर, मला ब्लॅकमेल करून मानसिक त्रास दिला जात आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेत असल्याचे त्या युवकाने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. याप्रकरणी दोन सख्ख्या बहिणींसह , त्या युवतींच्या वडिलांवर बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर बातमासाठी येथे क्लिक करा

  • 16 Feb 2026 04:50 PM (IST)

    16 Feb 2026 04:50 PM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत, मग त्यांचा अनादर कशासाठी ?

    दगडफेक व्हायला नको होती..आंदोलने नेहमी लोकशाही मार्गाने होतात पण कोणी सुरुवात केली..दोन्ही बाजूने कार्यकर्ते होते का समाजकंटक होते? याची चौकशी झाली पाहिजे..त्यांना शिक्षाही झाली पाहिजे, कारण समाजकंटकही फायदा घेतात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे.ज्यावेळी सर्वांचे महापुरुष आणि मातृभूमी काॅमन असेल , जे राष्ट्रगीत आणि वंदे मातरमला सन्मान देतील टिपू सुलतान हा आमचा आदर्श असू शकत नाही.छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत.. मग त्यांचा अनादर कशासाठी.अपुऱ्या माहितीच्या आधारे मी बोलत नाही..उगच नाही ती झेंझड कशाला, काय झालं बघतो आणि बोलतो.आरएसएस ला संपवण्याचा प्रयत्न या देशात अनेकांनी केला ,ज्या ज्या वेळी आरएसएस संपवण्याचा प्रयत्न होता..तेव्हा तेव्हा ती फार वाढते.देशासह संपूर्ण जगात हिंदूवरील अन्याया वेळी आरएसएस आणि# त्याची प्रेरणा घेवून काम करणाऱ्या संघटनाच पुढे येतात.

  • 16 Feb 2026 04:40 PM (IST)

    16 Feb 2026 04:40 PM (IST)

    विरारमध्ये जबरी चोरीचा पर्दाफाश; ३ आरोपी अटकेत, २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

    विरार पोलीस ठाणे यांच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.१३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास विरार पूर्व परिसरात फिर्यादीकडील मोबाईल आणि रोकड जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली होती. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला.सापळा रचून तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल आणि रोकड हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास विरार पोलीस करत आहेत.

  • 16 Feb 2026 04:30 PM (IST)

    16 Feb 2026 04:30 PM (IST)

    डहाणू–पालघर मार्गाच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल 165 कोटी 69 लाख

    डहाणू–पालघर मार्गाच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल 165 कोटी 69 लाख रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत पार पडले. सुमारे 54 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर रुंदीकरण, नूतनीकरण आणि मजबूत डांबरीकरणाची कामे केली जाणार आहेत. साडेपाच मीटर रुंदीचे रस्ते सात मीटरपर्यंत रुंद करण्यात येणार असून, काही ठिकाणी नवीन डांबराचा लेयर देण्यात येणार आहे. प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन वर्षे बांधकाम आणि पुढील दहा वर्षे देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराकडे राहणार आहे. तसेच पानेरी आणि सफाळे परिसरात दोन नवीन 12 मीटर रुंदीचे पूल उभारण्यात येणार आहेत. या मार्गाच्या उन्नतीकरणामुळे डहाणू, बोर्डी, केळवे, माहीम आदी किनारपट्टी भागातील पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिक नागरिक, शेतकरी आणि औद्योगिक वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. एकूणच, डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी देणारा हा प्रकल्प जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

  • 16 Feb 2026 04:25 PM (IST)

    16 Feb 2026 04:25 PM (IST)

    वाहने भाडयाने लावून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या भुरट्याला अटक

    वाहने भाडयाने लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणुक करणा-या इसमाकडून रु. २,४४,१५,०००/- रू. किंमतीची ३२ विविध चारचाकी वाहने गुन्हे शाखा, वागळे युनिट क्र. ५ कडून जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात आज वागळे एस्टेट, यूनिट ५ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण, परभणी या ठिकाणांहून ही वाहने पकडण्यात आली आहेत.

  • 16 Feb 2026 04:20 PM (IST)

    16 Feb 2026 04:20 PM (IST)

    भाजप- काँग्रेस आंदोलनात दगडफेक का झाली?

    पुण्यातील काँग्रेस भवन परिसरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आल्याचा प्रकार काल घडला आहे. काँग्रेस भवन येथे झालेल्या दगडफेक आणि हिंसक आंदोलनानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजकीय आंदोलनादरम्यान निर्माण झालेला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि त्यानंतर झालेली कारवाई यावर त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.यावेळी बोलताना ते म्हणाले की, राजकीय आंदोलनादरम्यान झालेली दगडफेक ही अत्यंत दुर्दैवी आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. “आंदोलन हिंसक होईल किंवा दगडफेक होईल, अशी कोणतीही पूर्वकल्पना पोलिसांकडे नव्हती. जर अशी माहिती असती, तर आंदोलनाला परवानगी दिली नसती,” असे आयुक्तांनी स्पष्ट केले. यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यालय किंवा नेत्याच्या निवासस्थानी आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.महापौरांवर गुन्हा दाखल करण्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, फिर्यादीच्या जबाबावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. पोलिसांनी केवळ सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप फेटाळून लावत, पोलीस नियमानुसार आणि कायद्यानुसारच काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 16 Feb 2026 04:15 PM (IST)

    16 Feb 2026 04:15 PM (IST)

    केंद्र सरकारची रस्ते अपघातग्रस्तांसाठी नवी पीएम राहत योजना लाँच

    पीएम राहत म्हणजे रोड अॅक्सिडेंट व्हिक्टिम हॉस्पिटलायझेशन अँड अ‍ॅश्युअर्ड ट्रीटमेंट स्कीम. (PM RAHAT Scheme) या योजनेअंतर्गत, रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना अपघाताच्या तारखेपासून सात दिवसांसाठी कॅशलेस उपचार मिळतील. सरकार जास्तीत जास्त ₹१.५ लाखांपर्यंतचा उपचार खर्च भागवेल. रुग्णाच्या खिशातून एकही रुपया आकारला जाणार नाही.आरोग्यविषयक आकडेवारीवरून असे दिसून येते की, जर जखमींना पहिल्या तासात रुग्णालयात नेले तर रस्ते अपघातातील जवळजवळ अर्धे मृत्यू टाळता येतात. हा काळ सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. पैसे आणि देयकांबाबत गोंधळामुळे रुग्णालयात दाखल होण्यास अनेकदा विलंब होतो. पीएम राहत योजना या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करते. ही योजना आणखी एका मोठ्या समस्येचे निराकरण करते: अपघातानंतर कायदेशीर गुंतागुंतीच्या भीतीमुळे मदत करण्यास जवळचे लोक कचरतात. पीएम राहात अशा मदतनीसांना “राहवीर” किंवा “गुड समरिटन” असे संबोधतात. याचा अर्थ असा की जखमींना मदत करणाऱ्या कोणालाही कायदेशीर अडचणींची भीती बाळगण्याची गरज नाही. त्यांना कायदेशीर गुंतागुंतीचा सामना करावा लागणार नाही किंवा कोणताही खर्चही सहन करावा लागणार नाही.

  • 16 Feb 2026 04:10 PM (IST)

    16 Feb 2026 04:10 PM (IST)

    विरारमध्ये जबरी चोरीचा पर्दाफाश; ३ आरोपी अटकेत, २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

    विरार पोलीस ठाणे यांच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.१३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास विरार पूर्व परिसरात फिर्यादीकडील मोबाईल आणि रोकड जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली होती. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला.सापळा रचून तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल आणि रोकड हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास विरार पोलीस करत आहेत.

  • 16 Feb 2026 04:03 PM (IST)

    16 Feb 2026 04:03 PM (IST)

    रस्त्यावरचा स्वस्त समोसा तब्येतीसाठी पडला महागात

    नालासोपाऱ्यात रस्त्याच्या कडेला मिळणारा स्वस्त समोसा खिशाला परवडणारा असला, तरी तो आरोग्यासाठी महागात पडू शकतो.अनेक ठिकाणी कोणतीही स्वच्छता किंवा हायजीनची व्यवस्था नसताना उघड्यावर खाद्यपदार्थ तयार केले जातात.समोसाच्या गाड्यांच्या आजूबाजूला कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि साचलेले घाण पाणी दिसून येते. धूळ, माशा आणि अस्वच्छ वातावरणात तयार होणारे हे अन्न नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करत आहे.अशा परिस्थितीत तयार झालेले पदार्थ खाल्ल्याने फूड पॉइझनिंग, पोटाचे विकार आणि इतर गंभीर आजार उद्भवू शकतात.फक्त स्वस्त असल्यामुळे आपण आपले आरोग्य धोक्यात घालणार का?संबंधित प्रशासन आणि आरोग्य विभागाने अशा स्टॉल्सवर कठोर तपासणी व कारवाई करणे गरजेचे नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • 16 Feb 2026 04:00 PM (IST)

    16 Feb 2026 04:00 PM (IST)

    Chhatrapati Sambhajinagar जिल्ह्यात पारा ३३ अंशांच्या पार

    Chhatrapati Sambhajinagar Weather: उन्हाळा सुरु होण्यासाठी अद्याप एक महिना शिलकी असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चालून लागली आहे. फेब्रुवारीच्या १५ तारखेला उन्हाचा पारा ३३ अंशाच्या पार गेला आहे. या हंगामातील आतापर्यंतची ही सर्वोच्च नोंद आहे. परिणामी दिवसाही ऊन चांगलेच चटकू लागले आहे. वाचा सविस्तर

  • 16 Feb 2026 03:55 PM (IST)

    16 Feb 2026 03:55 PM (IST)

    बँकिंगमध्ये करिअरची सुवर्णसंधी! RBI ६५० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

    बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याच्या इच्छुक उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एकूण ६५० पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. ही भरती देशभरातील विविध कार्यलयांमध्ये सहाय्यक पदासाठी घेण्यात येत आहे. चला जाणून घ्या या भरतीसाठी निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि निवड प्रकिया, इत्यादी काय? वाचा सविस्तर

  • 16 Feb 2026 03:50 PM (IST)

    16 Feb 2026 03:50 PM (IST)

    Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…

    गुहागर: गुहागरमध्ये २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर गतवैभव गमावून बसलेल्या भाजपा-शिवसेना युतीला अखेर विजयाचा सूर गवसला आहे. परिणामी गुहागर नगरपंचायतीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यश संपादन करून शिमग्याआधीच युतीच्या कार्यकत्यांनी डोल वाजविले. २०१२ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे नंदकिशोर पवार यांनी पंचायत समितीचे सभापतीपद खेचून आणले होते. वाचा सविस्तर

     

  • 16 Feb 2026 03:45 PM (IST)

    16 Feb 2026 03:45 PM (IST)

    मुलुंड मेट्रो अपघातावर Hrithik Roshanचा संताप

    14 फेब्रुवारीला मुंबईत एका दुःखद अपघाताची बातमी घडली. मुलुंड परिसरात मेट्रोचा खांब कोसळला, या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेची बातमी आल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये संतापाची लाट उसळली. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने या घटनेवर दुःख व्यक्त केले, यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि प्रशासनाकडे मागणी केली. वाचा सविस्तर

  • 16 Feb 2026 03:40 PM (IST)

    16 Feb 2026 03:40 PM (IST)

    टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज इंग्लंड आणि इटली हे संघ आमनेसामने

    ENG vs ITA, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज २९ वा सामना इंग्लंड आणि इटली यांच्यात खेळला जात आहे.कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर इटली संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे. सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर इंग्लंड संघाला विजय मिळवणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर

     

  • 16 Feb 2026 03:35 PM (IST)

    16 Feb 2026 03:35 PM (IST)

    पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोलिस स्टेशनवर हल्ला

    पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मोठा हल्ला झाला आहे. खैबर पख्तूनख्वातील बन्नू जिल्ह्ल्यात एका पोलिस स्टेशनमध्ये मोठा स्फोट करण्यात आला आहे. यामध्ये दोन जण ठार झाले असून १४ जण जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे. मृतांमध्ये लहान मुलाचाही समावेश आहे. स्फोटाकांनी भरलेली एक बाईक पोलिस्ट स्टेशनमध्ये घुसवण्यात आली. सध्या या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात होता हे स्पष्ट नाही. आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 16 Feb 2026 03:30 PM (IST)

    16 Feb 2026 03:30 PM (IST)

    भारत-फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक

    भारत आणि फ्रान्सचे संरक्षण मंत्री १७ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे भेट घेणार आहेत. या भेटीत दोन्ही देशातील संरक्षण वाढवण्यावर आणि नवीन करारावंर सविस्तर चर्चा होईल. या बैठीत भारत-फ्रान्समधील एक महत्वाचा संरक्षण करार १० वर्षांसाठी वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच भारतात हॅमर क्षेपणास्त्र संयुक्तपण तयार करण्याच्या करारावर देखील फ्रान्ससोबत चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थित हा करार होणार आहे.

  • 16 Feb 2026 03:25 PM (IST)

    16 Feb 2026 03:25 PM (IST)

    भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा

    सध्या भारताच्या रशियाकडून तेल खरेदीवरुन जागतिक स्तरावर जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दावा केला आहे ती, भारत रशियाकडून कच्च तेल खरेदी करणार नाही. यासाठी वाटाघाटी चर्चेत भारताने आश्वासनही दिले आहे असे रुबियो यांनी म्हटले. शनिवारी(१४ फेब्रुवारी) म्युनिकमध्ये झालेल्या परिषदेत त्यांना भारताच्या रशियाकडून तेल खेरदीवर प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी हे उत्तर दिले. यापूर्वी देखील ट्रम्प यांनी भारतावरील कर रद्द करत व्यापार कराराची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचा दावा केला होता.

  • 16 Feb 2026 03:20 PM (IST)

    16 Feb 2026 03:20 PM (IST)

    हिंदी महासागरात व्हेनेझुएलाशी संबंधित तेल टँकर अमेरिकेकडून जप्त

    व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतरही अमेरिकेची व्हेनेझुएलावर कारवाई सुरुच आहे. अमेरिकेने आतापर्यंत व्हेनेझुएलच्या समुद्रात अनेक तेल टॅंकर जप्त केले आहे. नुकताच्या एका कारवाई हिंद महासागरात व्हेनेझुएलाच्या मालकीच्या एका मोठ्या तेल टँकरला जप्त करण्यात आले आहे. पेंटागॉनने याची पुष्टी केली असून व्हेरोनिका - ३ नावाच्या जहाजाला कॅरिबियन समुद्रात अडवण्यात आले आङे. अमेरिकेच्या मते हे जहाज व्हेनेझुएलावरील तेल निर्बंधाचे उल्लंघन करत होते. पेंटागॉनच्या माहितीनुसार, या टँकरवर अंदाजे २० लाख बॅरल कच्चे तेल आणि इंधन होते.

  • 16 Feb 2026 03:15 PM (IST)

    16 Feb 2026 03:15 PM (IST)

    इराणचे परराष्ट्र मंत्री स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर; अमेरिकेशी अणु करारावर चर्चा

    मंगळवारी (१७ फेब्रुवारी) इराण आणि अमेरिकेत अप्रत्यक्षपण अणु करारावर चर्चा होणार आहे. ही अणु कारावरील दुसरी चर्चा अणु यासाठी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा येथे पोहचले आहे. ओमानच्या मध्यस्थीने सध्या दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी चर्चा सुरु आहे. याच वेळी दुसरीकडे अमेरिके्या इराणजवळ लष्करी हालचाली वाढल्या आहेत. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव सुरु आहे. इराणच्या युरेनियम समृद्धकरणावर मर्यादा आणणे, देखरेख व्यवस्था आणि अमेरिकेच्या निर्बंधापासून मुक्ततात यांसारख्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.

  • 16 Feb 2026 03:10 PM (IST)

    16 Feb 2026 03:10 PM (IST)

    चीनमध्ये लूनार न्यू ईयरच्या आधी फटाक्यांच्या दुकानात स्फोट; 8 जणांचा मृत्यू, २ जखमी

    चीनमध्ये एक दुर्वैवी घटना घडली आहे. लूनार न्यू ईयरच्या एख आधीच एक फटक्यांच्या दुकानात भीषण स्फोट झाला आहे. या आगीत आठ जणांचा मृत्यूची नोंद आहे. तर दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत. रविवारी (१५ फेब्रुवारी) दुपारी चीनच्या जिआंग्सु प्रांतात डोंगाई काउंटीनमध्ये ही घटना घडली. एका रहिवाशाने फटकांच्या दुकानाजवळच फटाके जाळल्याने हा स्फोट झाला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरि आहे. या घटनेमुळे सुरक्षेच्या कारणास्तव चीनमध्ये अनेक शहरांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सरकाने सुरक्षितपणे लोकांना उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

  • 16 Feb 2026 03:05 PM (IST)

    16 Feb 2026 03:05 PM (IST)

    पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात इस्रायलला भेट देणार

    PM Modi to Visit Israel : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात इस्रायलला भेट देऊ शकतात. स्वत: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी याची पुष्टी केली आहे. २४-२५ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त मिळाले आहे. परंतु अद्याप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यावर कोणतेही अधिकृत निवेदन मिळालेले नाही.  या भेटीत भारत आणि इस्रायलमधील मुक्त व्यापार करारवर वाटाघाटी चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • 16 Feb 2026 03:00 PM (IST)

    16 Feb 2026 03:00 PM (IST)

    Tarique Rahman यांच्या शपथविधीसाठी भारताला आमंत्रणाने पाकिस्तानचा जळफळाट

    बांगलादेशमध्ये सध्या १३ व्या संसदीय निवडणुका पार पडल्या असून नव्या सरकारची स्थापन सुरु आहे. उद्या १७ फेब्रुवारी २०२६ रोजी तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. या सोहळ्यासाठी भारतासाह १३ देशांना आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र भारताला आमंत्रणाने पाकिस्तानचा मात्र जळफळाट होत आहे. पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चिमा यांनी यावर टीका केली असून बांगलादेशने मोठी चूक केली असल्याचे म्हटले आहे. वाचा सविस्तर

  • 16 Feb 2026 02:55 PM (IST)

    16 Feb 2026 02:55 PM (IST)

    सिंधुदुर्गातील ७० ग्रामपंचायतींवर प्रशासकराज; ‘या’ तालुक्यात संख्या जास्त

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० व ११ फेब्रुवारी रोजी मुदत संपलेल्या ७० ग्रामपंचायतींचर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या आदेशानुसार संबंधित ग्रामपंचायतींसाठी प्रशासकोची नियुक्ती करण्यात आली आहे. यात सर्वाधिक २३ ग्रामपंचायती देवगड तालुक्यात आहेत. लवकरच या मुदत संपणाऱ्या ७० गग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक 23 ग्रामपंचयाती देवगड तालुक्यात आहेत.

  • 16 Feb 2026 02:50 PM (IST)

    16 Feb 2026 02:50 PM (IST)

    धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली

    नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर धाराशिव जिल्ह्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेना (शिंदे)चे आमदार, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यातील वाढत्या वितुष्टामुळे महायुतीतील एकोप्याला तडा गेल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

  • 16 Feb 2026 02:45 PM (IST)

    16 Feb 2026 02:45 PM (IST)

    महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी! कोयना धरणाच्या १,२ टप्प्यांमधून ‘या’ दिवसापासून होणार वीजनिर्मिती

    कोयना प्रकल्पाच्या पोफळीतील बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोयना प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोनमधून वीज निर्मिती सुरू होईल, त्यानंतर पोफळी परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे. कोयनेसह महाराष्ट्रात गतवर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असला तरी सद्यःस्थितीत धरणात मुबलक पाणी आहे.

  • 16 Feb 2026 02:40 PM (IST)

    16 Feb 2026 02:40 PM (IST)

    वणवा रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक; शासन स्तरावर ‘वणवामुक्त गाव’ करण्याची होतेय मागणी

    गारगोटी, (वा.) ग्रामीण भागात वणवे रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असून शासनस्तरावर वणवामुक्त गाव ही संकल्पना राबवावी, अशी मागणी म्हसवे येथील राजनंदिनी फाउंडेशनच्यावतीने करण्यात आली आहे. सध्या डोंगर-दऱ्यामध्ये वणवे लागल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अज्ञातांकडून खोडसाळपणे वणवे लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. याला चाप बसण्यासाठी शासनस्तरावर कायद्याची कडक अमलबजावणी होणे गरजेचे आहे. तरच याला आळा बसेल आणि पर्यावरणाचा समतोल योग्य प्रकारे राहण्यास मदत होईल. त्यामळे जैवविविधता जपली जाईल.

  • 16 Feb 2026 02:30 PM (IST)

    16 Feb 2026 02:30 PM (IST)

    दोन सदस्य घराबाहेर! आता घरातून राखी सावंतला हाकललं? बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट

    बिग बॉसच्या सहाव्या सिझनचा आजपासून सहावा आठवडा सुरू झाला आहे. घरात पहिल्या दिवसापासून रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत असतात. गेल्या आठवड्यात वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धकांचा या घरातील प्रवास इथेच थांबला. त्यामुळे आता घरात राखीला वगळून फक्त 11 स्पर्धक आहेत. आयुष संजीवची तब्येत ठिक नसल्यामुळे तो दोन आठवड्यांपासून खेळात सक्रिय नव्हता. त्यामुळे वींकेडला आयुष घराबाहेर जाणार असा अंदाज सगळ्यांनी वर्तवला होता. पण, याच्यासोबत सोशल मीडिया स्टार करण सोनावणेचं अनपेक्षिक एव्हिक्शन झालं आहे.

  • 16 Feb 2026 02:20 PM (IST)

    16 Feb 2026 02:20 PM (IST)

    सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral

    सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, सौदीतील एका शाही लग्नात पाहुण्यांना परत भेट म्हणून २४ कॅरेट सोन्याची बिस्किट वाटली गेली. हा व्हिडिओ व्हायरल होत असून अनेकांचे डोळे विस्फारले आहे. खरेच अशी मोठी भेट देण्यात आली असेल का असा प्रश्न लोकांना पडला आहे.

  • 16 Feb 2026 02:10 PM (IST)

    16 Feb 2026 02:10 PM (IST)

    T20 World Cup मध्ये वेगवान गोलंदाजाची स्टीव्ह स्मिथने घेतली जागा! ऑस्ट्रेलियन संघात सामील, आयसीसीने केली पुष्टी

    २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाजाच्या जागी फलंदाज स्टीव्ह स्मिथचा संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीसीनेच याची पुष्टी केली आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या दुखापतीमुळे स्टीव्ह स्मिथचा संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने हेझलवूडच्या दुखापतीमुळे स्टीव्ह स्मिथला पर्याय म्हणून मान्यता दिली आहे. जोश हेझलवूड ऑस्ट्रेलियाच्या मुख्य संघाचा भाग होता, परंतु तो तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने त्याच्या बदलीची घोषणा केली आहे.

  • 16 Feb 2026 02:05 PM (IST)

    16 Feb 2026 02:05 PM (IST)

    केमिकल फॅक्टरीला भीषण आग: सात कामगारांचा जळून दुर्दैवी मृत्यू

    राजस्थानच्या औद्योगिक जिल्ह्यातील भिवाडी येथे आज (दि.16) सकाळी भीषण आग लागली. खुसखेडा करौली औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यात अचानक आग लागली. आगीचा भडका इतका मोठा होता की तेथील कामगारांना सावरण्याची संधी मिळाली नाही. या हृदयद्रावक अपघातात सात कामगार जिवंत जाळले गेले, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे

  • 16 Feb 2026 02:00 PM (IST)

    16 Feb 2026 02:00 PM (IST)

    मुलुंड मेट्रो अपघातावर Hrithik Roshanचा संताप; प्रशासनाकडे केली ‘ही’ मागणी

    14 फेब्रुवारीला मुंबईत एका दुःखद अपघाताची बातमी घडली. मुलुंड परिसरात मेट्रोचा खांब कोसळला, या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेची बातमी आल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये संतापाची लाट उसळली. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने या घटनेवर दुःख व्यक्त केले, यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि प्रशासनाकडे मागणी केली.

  • 16 Feb 2026 01:55 PM (IST)

    16 Feb 2026 01:55 PM (IST)

    रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील फायरिंग प्रकरणात मोठी कारवाई

    दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या जुहू येथील घराबाहेर १ फेब्रुवारी रोजी गोळीबार करण्यात आला होता. यानंतर आरोपींची घटनास्थळावरून पळ काढला. आता या प्रकरणात एक मोठा अपडेट समोर आला आहे. पोलिसांनी हरियाणा येथून शुटर आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी एकूण ९ आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या विशेष कार्य दल (एसटीएफ) सोबत मिळून केली आहे.

  • 16 Feb 2026 01:50 PM (IST)

    16 Feb 2026 01:50 PM (IST)

    केमिकल फॅक्टरीला भीषण आग: सात कामगारांचा जळून दुर्दैवी मृत्यू

    राजस्थानच्या औद्योगिक जिल्ह्यातील भिवाडी येथे आज (दि.16) सकाळी भीषण आग लागली. खुसखेडा करौली औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यात अचानक आग लागली. आगीचा भडका इतका मोठा होता की तेथील कामगारांना सावरण्याची संधी मिळाली नाही. या हृदयद्रावक अपघातात सात कामगार जिवंत जाळले गेले, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.

  • 16 Feb 2026 01:45 PM (IST)

    16 Feb 2026 01:45 PM (IST)

    T20 World Cup मध्ये वेगवान गोलंदाजाची स्टीव्ह स्मिथने घेतली जागा!

    २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाजाच्या जागी फलंदाज स्टीव्ह स्मिथचा संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीसीनेच याची पुष्टी केली आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या दुखापतीमुळे स्टीव्ह स्मिथचा संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने हेझलवूडच्या दुखापतीमुळे स्टीव्ह स्मिथला पर्याय म्हणून मान्यता दिली आहे. जोश हेझलवूड ऑस्ट्रेलियाच्या मुख्य संघाचा भाग होता, परंतु तो तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने त्याच्या बदलीची घोषणा केली आहे.

  • 16 Feb 2026 01:35 PM (IST)

    16 Feb 2026 01:35 PM (IST)

    शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ?

    भूसंपादनातील दीरंगाई , निधीचा अभाव आणि तांत्रिक अडचणी यामुळे मागील काही वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मागाला यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. १०७किलोमीटर रुंदीचा हा प्रकल्प माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५ साली मंजूर केला होता. पुढील वर्षी या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. त्यामुळे नजीकच्या काही वर्षात पश्चिम महाराष्ट्र हा थेट कोकणला जोडणार आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून केंद्र व राज्य सरकारने यासाठी २०१७ च्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यामुळे हा रेल्वे मार्ग पुर्णत्वास येईल, अशी आशा कोकणवासियांसह पश्चिम महाराष्ट्राला असतानाच मागील काही वर्षांपासून या मार्गाची फाईल शासन दिरंगाईमुळे लाल फितीत अडकून पडली.

  • 16 Feb 2026 01:30 PM (IST)

    16 Feb 2026 01:30 PM (IST)

    ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    “सौर ऊर्जा ही केवळ पर्यावरणपूरक पर्याय राहिलेली नसून महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची, ऊर्जा सुरक्षिततेची आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी मास्टर की ठरली आहे,” असा ठाम संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पुण्यात आयोजित सातव्या ‘मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्स्पो २०२६’चे उद्घाटन त्यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. यावेळी त्यांचा संदेश ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपात प्रदर्शनस्थळी प्रसारित करण्यात आला.

  • 16 Feb 2026 01:25 PM (IST)

    16 Feb 2026 01:25 PM (IST)

    तैवानसाठी चीनची मोठी तयारी? डोंगराखाली काय लपवत आहे बिजींग

    भारताचा शेजारी चीन पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आहे. अलिकडच्या उपग्रह प्रतिमांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की चीन नैऋत्य सिचुआन प्रांतातील पर्वतीय भागात आपल्या अण्वस्त्रांच्या पायाभूत सुविधांचा वेगाने विस्तार करत आहे. जिनटोंग आणि पिंगटोंग नावाच्या भागात नवीन बंकर, इमारती आणि संवेदनशील सुविधा बांधल्या जात असल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, या ठिकाणी अण्वस्त्रांशी संबंधित कामांसाठी वापरता येतील अशा संरचना बांधण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी, नवीन इमारती पाइपलाइनने जोडल्या आहेत, ज्यामुळे असे सूचित होते की धोकादायक किंवा संवेदनशील पदार्थांसह काम केले जात आहे.

  • 16 Feb 2026 01:20 PM (IST)

    16 Feb 2026 01:20 PM (IST)

    दोन सदस्य घराबाहेर! आता घरातून राखी सावंतला हाकललं?

    बिग बॉसच्या सहाव्या सिझनचा आजपासून सहावा आठवडा सुरू झाला आहे. घरात पहिल्या दिवसापासून रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत असतात. गेल्या आठवड्यात वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धकांचा या घरातील प्रवास इथेच थांबला. त्यामुळे आता घरात राखीला वगळून फक्त 11 स्पर्धक आहेत. आयुष संजीवची तब्येत ठिक नसल्यामुळे तो दोन आठवड्यांपासून खेळात सक्रिय नव्हता. त्यामुळे वींकेडला आयुष घराबाहेर जाणार असा अंदाज सगळ्यांनी वर्तवला होता. पण, याच्यासोबत सोशल मीडिया स्टार करण सोनावणेचं अनपेक्षिक एव्हिक्शन झालं आहे.

  • 16 Feb 2026 01:15 PM (IST)

    16 Feb 2026 01:15 PM (IST)

    मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच विमान अपघातामध्ये निधन झाले. यामुळे राजकीय नेत्यांच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामध्ये आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव (Mohan Yadav) हे थोडक्यात बचावले आहेत. डॉ. मोहन यादव यांचे हेलिकॉप्टर हे हवेमध्ये असंतुलित झाले. याचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल (Viral News) झाला आहे.

  • 16 Feb 2026 01:06 PM (IST)

    16 Feb 2026 01:06 PM (IST)

    भारतीय तरुणीही पडली Epstein च्या छळाला बळी?

    अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) त्याच्या मृत्यूनंतरही चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या लैंगिक तस्करीच्या काळ्या कृत्यांनी संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. सध्या या कागपत्रांमधून एक नवा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या नव्या कागदपत्रांनुसार, एक भारतीय तरुणी देखील जेफ्रीच्या छळाला बळी पडली आहे. या खुलाशाने जगभरात खळबळ उडाली आहे.

  • 16 Feb 2026 12:55 PM (IST)

    16 Feb 2026 12:55 PM (IST)

    वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

    पुणे : पुण्यातील एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मुलीच्या हिताचा सर्वांगीण विचार करत तिचा ताबा आईकडेच राहणे योग्य आहे, असे नमूद करत ६ वर्षांच्या मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास नकार दिला आहे. तसेच कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वडिलांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शमिना व समीर (नावे बदललेली) यांचा विवाह २०१८ मध्ये झाला. त्यांना मुलगी झाली. राजेश हे नोकरीनिमित्त वारंवार दुबई येथे जात. दरम्यान, सासऱ्यांकडून शारीरिक छळाचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत शमिनाने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणानंतर पतीकडून मानसिक व शारीरिक त्रास सुरू झाल्याचा दावा तिने केला.

  • 16 Feb 2026 12:50 PM (IST)

    16 Feb 2026 12:50 PM (IST)

    Priyank Kharge Critiziced RSS: ‘आरएसएस हा सैतान, भाजप त्याची सावली…’ प्रियांक खरगेंचा घणाघात

    Priyank Kharge Critiziced RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सैतान आहे आणि भाजप त्याची सावली आहे. अशी घणाघाती टीका कर्नाटक काँग्रेसचे (Congress)  मंत्री प्रियांक खर्गे यांनी  केली  आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना  प्रियांक खर्गे यांनी  भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. “आपण सावलीशी लढत आहोत. जर आपण या सैतानाशी लढलो तर देश सुधारेल, आरएसएसशिवाय भाजपची स्थिती जनता दल (सेक्युलर)पेक्षा वाईट होईल आणि ती एका प्रादेशिक पक्षापेक्षाही खालच्या पातळीवर जाईल. जनता दलाने त्यांच्या नावातून धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकावा,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

  • 16 Feb 2026 12:44 PM (IST)

    16 Feb 2026 12:44 PM (IST)

    Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

    मुंबई : राज्यामध्ये सध्या टीपू सुलतान याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj) केल्यामुळे राज्यामध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही तुलना केल्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरुन पुण्यामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक देखील झाली. यामुळे महिला पोलीस, पत्रकार देखील जखमी झाले. यावर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

Web Title: Maharashtra breaking news todays live marathi 16th february entertainment share market gold sliver ratesmaharashtra national international politics war sports crime breaking updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Anjali Damania on Kharat: भोंदू खरातचे राजकीय सिंडिकेट? चाकणकर, शिंदे, तटकरे अन् पाटील; अंजली दमानियांची धक्कादायक यादी!
2

Anjali Damania on Kharat: भोंदू खरातचे राजकीय सिंडिकेट? चाकणकर, शिंदे, तटकरे अन् पाटील; अंजली दमानियांची धक्कादायक यादी!

Global Politics : 2 अब्ज डॉलर्ससाठी पाकिस्तान आपली ‘अण्वस्त्रे’ गहाण ठेवणार? UAEने दिला ‘या’ कारणासाठी अल्टिमेटम
3

Global Politics : 2 अब्ज डॉलर्ससाठी पाकिस्तान आपली ‘अण्वस्त्रे’ गहाण ठेवणार? UAEने दिला ‘या’ कारणासाठी अल्टिमेटम

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर
4

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.