Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Politics breaking- सिल्लोड शहराला एक नवी ओळख मिळवून देण्यात आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे सिल्लोडच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 17, 2026 | 11:10 AM
LIVE
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • 17 Feb 2026 11:10 AM (IST)

    17 Feb 2026 11:10 AM (IST)

    अमेरिकेत १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी भारतीय नागरिकाला अटक

    अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी एका भारतीय नागरिकाला अटक केली आहे. त्याच्यावर १३ वर्षाखालील मुलीवर लैंगिक अत्याचारा आणि चोरीचे आरोप आहेत. सध्या त्याच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरु असून ICE विभागाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. निवेदनानुसार, आरोपीची ओळख यशस्वी कोट्टापल्ली अलून तो अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत होता. ट्रम्प प्रशासानाच्या अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर नागरिकांना हद्दपार करण्याची प्रक्रिया तीव्र झाली आहे. लैंगिक शोषण, चोरी, खून यांसारख्या भीर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या ताब्यात घेऊन हद्दपार केले जात आहे. २०२५ मध्ये ३००० हून अधिक भारतीयांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहे.

  • 17 Feb 2026 11:05 AM (IST)

    17 Feb 2026 11:05 AM (IST)

    बांगलादेशच्या नवनिर्वाचित खासदारांनी घेतली शपथ; समारंभापूर्वी कुराणचे पठण

    अलीकडचे भारताच्या १३ व्या संसदीय निवडणुक पार पडस्या आहे. या निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) चा प्रचंड बुहमतांवनी विजय झाला असून आज नवे सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु आहे. याअंतर्त मंगळावीर नवनिर्वाचित सदस्यांनी ढाका येथील राष्ट्रीय संसंदेत दक्षिण प्लाझा येथे शपथ घेतील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कडक सुरक्षा व्यवस्थेत शपथविधी समारंभ पार पडला आहे. या समारंभाला १००० हून स्थानिक आणि परदेशी पाहुणे उपस्थित होते. समारंभापूर्वी कुराणचे पठण करण्यात आले.

  • 17 Feb 2026 11:00 AM (IST)

    17 Feb 2026 11:00 AM (IST)

    PM मोदी आणि फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉन आज मुंबईत; महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा

    आज भारतासाठी एक ऐतिहासिक आणि निर्णायक दिवस आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले  असून आज ते मुंबईत दुपारी २.१५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा भवन येथे भेट घेणार आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीसंबंधासह, संरक्षण सहकार्य, तंत्रज्ञान सहकार्यावर महत्वाची चर्चा होणार आहे. दोन्ही देशात अनेक महत्वाच्या संरक्षण करारांवर स्वाक्षरीही होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

  • 17 Feb 2026 10:43 AM (IST)

    17 Feb 2026 10:43 AM (IST)

    देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव

    भारतातील ९६ टक्क्यांहून अधिक शाळांमध्ये मुलीसाठी शौचालये आहेत. भारतातील शालेय स्वच्छता पायाभूत सुविधा कागदोपत्री दिसतात. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडीलच्या निर्णयाने, मासिक पाळीचे आरोग्य आणि स्वच्छता अनुच्छेद २१ अंतर्गत सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकाराचा भाग म्हणून मान्यता दिली, त्या पायाभूत सुविधा आणि मुलींच्या जीवनातील कायमची तफावत अधोरेखित केली आहे. तसेच २०२१ मध्ये हात धुण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या सुविधा ९२ टक्क्यांवरून ९६ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

  • 17 Feb 2026 10:36 AM (IST)

    17 Feb 2026 10:36 AM (IST)

    रहमान यांच्या शपथविधीपूर्वी BNP चा इशारा

    अलीकडचे बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुक पार पडली. या निवडणुकीत बांगलादेश नॅशनर पार्टी बीएनपीने प्रचंड विजय मिळवला असून नव्या सरकारची स्थापना सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी (१७ फेब्रुवारी) बीएनपीचे लीडर तारिक रहमान (Tarique Rahman) बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. पण या शपथविधीच्या आधीच बीएनपी पक्षाने भारतासोबतच्या संबंधाबद्दल मोठे विधान केले आहे. तसेच बांगलादेशच्या माजी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या प्रत्यार्पणाचीही मागणी केली आहे.

  • 17 Feb 2026 10:27 AM (IST)

    17 Feb 2026 10:27 AM (IST)

    वैभव सूर्यवंशीला मुख्याध्यापकांनी इशारा देऊनही बोर्डाच्या परीक्षेला बसला नाही…

    सूर्यवंशीने शेवटच्या क्षणी परीक्षा न देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. यामागील आश्चर्यकारक कारण आता उघड झाले आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाच्या असतात, परंतु वैभव सूर्यवंशीने त्याच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्या वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी अलीकडेच इंडिया टुडेशी बोलताना सांगितले. त्यांनी खुलासा केला की सूर्यवंशी राजस्थान रॉयल्स कॅम्पमध्ये सामील झाला आहे. तो आयपीएल २०२६ वर लक्ष केंद्रित करू इच्छितो, म्हणूनच त्याने परीक्षा वगळण्याचा निर्णय घेतला.

  • 17 Feb 2026 10:23 AM (IST)

    17 Feb 2026 10:23 AM (IST)

    Actor Robert Duvall Passes away: हॉलीवूड अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

    हॉलिवूडच्या सुवर्णकाळातील आणखी एक महान अध्याय संपला आहे. "द गॉडफादर" सारख्या कालातीत चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची सिद्धता करणारे दिग्गज ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल आता आपल्यात नाहीत. त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. रॉबर्ट डुव्हल यांच्या निधनाची त्यांच्या पत्नी लुसियाना डुव्हल यांनी पुष्टी केली. त्यांच्या पीआर एजन्सीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की त्यांचे रविवारी व्हर्जिनियातील मिडलबर्ग येथील त्यांच्या घरी शांततेत निधन झाले.

  • 17 Feb 2026 10:19 AM (IST)

    17 Feb 2026 10:19 AM (IST)

    अकोलामार्गे धावणार मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे

    मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्यातच प्रवाशांच्या मागणीनुसार, अकोला मार्गे मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अकोल्याहून मुंबई, पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

  • 17 Feb 2026 10:09 AM (IST)

    17 Feb 2026 10:09 AM (IST)

    बीडमध्ये 30 जणांचा कुटुंबावर हल्ला

    बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराईच्या चोपड्याचीवाडी येथ चार घरांवर 30 जणांकडून हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. घरात राहणाऱ्या कुटुंबियांवर काठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तीन महिला गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकरण दहशत माजवण्याचा असल्याचे दिसून येत आहे.

  • 17 Feb 2026 09:52 AM (IST)

    17 Feb 2026 09:52 AM (IST)

    भारत बनणार जगाचे AI केंद्र, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

    एआयवर चर्चा करण्यासाठी जगाला एकत्र आणणे ही काळाची गरज आहे. भारत एआयच्या बाबतीत जगाचे केंद्र बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एआय इम्पॅक्ट समिटचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, मी जगभरातील सर्व नेते, उद्योग प्रतिनिधी, नवोन्मेषक, धोरणकर्ते, संशोधक आणि तंत्रज्ञान प्रेमींचे या समिटमध्ये स्वागत करतो. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शी संबंधित परिवर्तनात आघाडीवर आहे. एआयच्या क्षेत्रात भारताची प्रगती महत्वाकांक्षा आणि जबाबदारी दोन्ही प्रतिबिंबित करते.

  • 17 Feb 2026 09:40 AM (IST)

    17 Feb 2026 09:40 AM (IST)

    रोहित शेट्टीच्या घरावरील हल्ल्याचे 'बिश्नोई कनेक्शन' उघड

     मुंबई: प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. या हल्ल्यामागे कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा (Lawrence Bishnoi Gang) हात असल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या (Crime Branch) तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कारागृहात असलेल्या टोळीच्या सदस्यानेच या संपूर्ण हल्ल्याचे नियोजन केल्याचे समोर आले आहे.

  • 17 Feb 2026 09:35 AM (IST)

    17 Feb 2026 09:35 AM (IST)

    अजित पवारांच्या निधनानंतर मंत्रालयात संशयास्पद हालचाली?  

    मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालेले असताना, मंत्रालयातून राज्यातील ७५ शिक्षण संस्थांना 'अल्पसंख्यांक दर्जा' बहाल करण्यात आला. ही बाब उघडकीस आल्यावर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या संशयास्पद हालचालींची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या चौकशीच्या स्वरूपावरून आता नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • 17 Feb 2026 09:30 AM (IST)

    17 Feb 2026 09:30 AM (IST)

    नरहरी झिरवळांच्या अडचणीत वाढ! पीएच्या 'लाच' प्रकरणामुळे सुनेत्रा पवार संतापल्या 

    मुंबई: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात घडलेल्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी झिरवळ यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणामुळे सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची मोठी बदनामी झाल्याचे मानले जात आहे.

    नेमके प्रकरण काय? काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंग याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. या घटनेमुळे मंत्रालयातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. आपल्याच मंत्र्यांच्या कार्यालयात अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असल्याचा ठपका ठेवत विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले होते.

  • 17 Feb 2026 09:20 AM (IST)

    17 Feb 2026 09:20 AM (IST)

    चीन आणि रशियाची जवळीक भारतासाठी चिंतेची बाब 

    बीजिंग/मॉस्को: अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे रशिया सध्या जागतिक स्तरावर अडचणीत सापडला असला, तरी चीन त्याच्या मदतीला धावून आला आहे. रशियाकडून कच्च्या तेलाची विक्रमी खरेदी करून चीनने रशियाला मोठा आर्थिक आधार दिला आहे. मात्र, चीन आणि रशियामधील हे वाढते समीकरण भारतासाठी भविष्यात एक मोठे धोरणात्मक आव्हान आणि धोका ठरू शकते, अशी चिन्हे दिसत आहेत.

    फेब्रुवारी महिन्यात विक्रमी आयात उपलब्ध आकडेवारीनुसार, चीनने रशियाकडून कच्च्या तेलाची इतकी मोठी मागणी (Orders) नोंदवली आहे की, चालू फेब्रुवारी २०२६ महिन्यात रशियन तेलाची आयात एक नवा उच्चांक प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यांपासून चीन सातत्याने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल आयात करत असून, पाश्चात्य देशांच्या निर्बंधांना चीनने एक प्रकारे केराची टोपली दाखवली आहे.

  • 17 Feb 2026 09:15 AM (IST)

    17 Feb 2026 09:15 AM (IST)

    मैदानातील वादानंतर सूर्यकुमार आणि कुलदीप पुन्हा भिडले 

    कोलंबो: टी-२० विश्वचषकात पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवून भारताने 'सुपर-८' मध्ये धडाक्यात प्रवेश केला. या विजयानंतर इशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांच्या कामगिरीचे कौतुक होत असतानाच, दुसरीकडे सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांच्यातील वादाची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीये. १५ फेब्रुवारीच्या सामन्यानंतर झालेली शाब्दिक चकमक आता सराव सत्रापर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.

    मैदानातील वादाची पार्श्वभूमी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान झालेल्या एका चुकीमुळे हार्दिक पांड्या आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे कुलदीप यादववर प्रचंड नाराज झाले होते. सामना संपल्यानंतरही त्यांच्यात मैदानावरच शाब्दिक बाचाबाची झाली होती, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. या घटनेमुळे संघात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

  • 17 Feb 2026 09:10 AM (IST)

    17 Feb 2026 09:10 AM (IST)

    मुंढवा जमीन गैरव्यवहार: पार्थ पवारांना 'क्लीन चिट'?  

    पुणे: पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विकास खरगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आला असून, यामध्ये पार्थ पवार यांचा या व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

    पार्थ पवारांना दिलासा मिळण्याचे कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा येथील जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर पार्थ पवार यांची स्वाक्षरी नाही. ते 'अमेडिया' (Amedia) कंपनीचे भागीदार असले, तरी या विशिष्ट व्यवहाराच्या प्रक्रियेत किंवा दस्तऐवजांवर त्यांची सही नसल्याने त्यांचा थेट संबंध जोडता येत नाही, असे समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. यामुळे पार्थ पवार यांना या घोटाळ्यातून एक प्रकारे 'अभय' मिळाले असल्याचे मानले जात आहे

  • 17 Feb 2026 09:05 AM (IST)

    17 Feb 2026 09:05 AM (IST)

    पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती; महापौर मंजूषा नागपुरेंनी घेतला   कामांचा आढावा

    पुणे: पुणे महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी 'मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा'च्या (Mula-Mutha River Rejuvenation Project) सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शिवाजीनगर येथील घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

    प्रकल्पाचे सादरीकरण आणि नियोजन यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची मूळ संकल्पना, आतापर्यंत झालेले काम आणि भविष्यातील नियोजनाचे सादरीकरण केले. नदीकाठचा विकास, सांडपाणी प्रक्रिया आणि नदीच्या सौंदर्यीकरणावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. कामाचा दर्जा राखून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी महापौरांनी दिल्या.

  • 17 Feb 2026 09:01 AM (IST)

    17 Feb 2026 09:01 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज मुंबई दौऱ्यावर

    मुंबई: भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज मुंबई दौऱ्यावर असून, या ऐतिहासिक भेटीसाठी आर्थिक राजधानी पूर्णपणे सज्ज झाली आहे. या भेटीदरम्यान संरक्षण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी होण्याची दाट शक्यता आहे.

    भव्य स्वागत आणि दौऱ्याचे नियोजन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे आज सकाळी त्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह मुंबईत दाखल झाले. विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी २:१५ वाजता मुंबईत पोहोचणार असून, त्यानंतर दोन्ही नेते 'लोकभवन' येथे द्विपक्षीय चर्चेसाठी एकत्र येतील.

Maharashtra to World Breaking News:

 आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन 

छत्रपती संभाजीनगर: राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे दुःखद निधन झाले आहे. नफिसा बेगम या केवळ एका बड्या राजकीय नेत्याच्या पत्नी म्हणून मर्यादित न राहता, त्यांनी सिल्लोडच्या राजकारणात आणि समाजकारणात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे सत्तार कुटुंबासह संपूर्ण सिल्लोड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराचा कायापालट नफिसा बेगम यांनी सिल्लोड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष म्हणून प्रभावीपणे काम केले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या विकासासाठी अनेक धाडसी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सिल्लोड शहराला एक नवी ओळख मिळवून देण्यात आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे सिल्लोडच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

 

 

Web Title: Maharashtra breaking news todays live udates in marathi 17th february maharashtra national international politics war sports crime entertainment share market gold sliver rates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…
1

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…

Minority status to 75 schools: त्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला? दुखवट्याच्या काळात घेतलेल्या निर्णयावर संशय बळावला
2

Minority status to 75 schools: त्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला? दुखवट्याच्या काळात घेतलेल्या निर्णयावर संशय बळावला

Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली
3

Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.