ब्ल्यूबेरी, डाळींब, चेरी आणि बीट यांसारख्या अॅटीऑक्सिडंट क्षमतेसाठी ओळखल्या जाणार्या अनेक खाद्यपदार्थांच्या संशोधनात नोंदवलेल्या मूल्यांच्या तुलनेत पिस्त्याची अॅटीऑक्सिडंट क्षमता खूप जास्त असल्याचं कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी अलीकडील अभ्यासात पिस्त्यांशी संबंधित संशोधनात स्पष्ट केले आहे. संशोधकांनी पिस्त्याची अॅटीऑक्सिडंट क्षमता मोजण्यासाठी ऑक्सिजन रॅडिकल अँब्सॉर्बन्स कॅपॅसिटी आणि सेल्युलर अॅटीऑक्सिडंट अँक्टिव्हिटी अशी पद्धत अवलंबिली आहे.
पिस्त्यांमध्ये अॅटीऑक्सिडंट क्षमता अत्यधिक असल्याचं आमच्या अभ्यासातून समोर आल्याने आम्ही उत्साही आहोत असे कॉर्नेल युनिव्हर्सिटी’चे फूड सायन्स अभ्यासाचे प्रोफेसर डॉ. रुई हाय लिऊ म्हणाले. ते पुढे म्हणाले की,, “समान पद्धतीचा वापर करून इतर सामान्य, उच्च-अँटीऑक्सिडंट खाद्यपदार्थांच्या संशोधनात नोंदवलेल्या मूल्यांशी तुलना केली असता, आम्हाला आढळून आले की पिस्त्याची अँटीऑक्सिडंट क्रिया ही ब्लूबेरी, चेरी आणि बीटसह अॅटीऑक्सिडंट पॉवरहाऊस म्हणून विचारात घेतलेल्या पदार्थांपेक्षा जास्त आहे. पिस्त्याची उच्च अँटीऑक्सिडंट क्रिया पिस्त्यातील ई जीवनसत्व, कॅरोटीनोइड, फिनोलिक्स आणि फ्लेव्होनॉइडसह अद्वितीय संयुगांमुळे असू शकते यावर आमचा विश्वास आहे. पिस्त्यामधील इतर पोषक घटकांसह या फायदेशीर अॅटीऑक्सिडंट, बायोअॅक्टीव्ह मिश्रणांचे संयोजन किंवा परस्परसंवाद, अलिकडच्या वर्षांत पिस्त्याच्या अभ्यासात आपण पाहिलेल्या अनेक आरोग्य फायद्यांमध्ये योगदान देऊ शकते.” असेही त्यांनी सांगितले.
निरोगी जीवनशैलीचा एक भाग म्हणून अॅटीऑक्सिडंट युक्त पदार्थांना नियमितपणे प्रोत्साहन देण्यात येते. अॅटीऑक्सिडंटयुक्त आहारामुळे मृत्यूचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. काही फळं आणि भाज्यांना अनेकदा उच्च -अॅटीऑक्सिडंट पदार्थ मानलं जात असताना, कॉर्नेल युनिव्हर्सिटीने आयोजित आणि प्रकाशित केलेल्या न्यूट्रीएंट्स या जर्नलमध्ये नवीन अभ्यासाने आश्चर्यकारक परिणाम सादर केले आहेत.[read_also content=”घरच्या घरी बनवा KFC स्टाईल चिकन पॉपकॉर्न https://www.navarashtra.com/lifestyle/make-kfc-style-chicken-popcorn-at-home-343164″]