Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pregnancy Tips: धूम्रपानाचे व्यसन आई आणि बाळासाठी जीवघेणे, त्वरीत व्हा दूर

गर्भपात, अकाली प्रसूती, मृत बाळ जन्माला येण्याचा धोका हा वाढत चालला आहे. निरोगी गर्भधारणेसाठी व्यसन टाळण्याचा तज्ज्ञांचा सल्ला आहे. ज्या महिला धुम्रपान करतात आणि बाळाला जन्म द्यायचा असेल तर वाचाच

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 02, 2025 | 11:36 AM
गरोदरपणात धुम्रपान करणे किती धोकादायक (फोटो सौजन्य - iStock)

गरोदरपणात धुम्रपान करणे किती धोकादायक (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

धुम्रपानामुळे फुफ्फुसांना हानी पोहोचते हे अनेकांना माहिती असले तरी, कमी लोकांना हे माहीत आहे की ते स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर, गर्भधारणेवर आणि बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतरही दुष्परिणाम करू शकते. हल्ली प्रजनन वयाच्या महिलांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढत चालले आहे. धूम्रपानाचा फुफ्फुसांवर परिणाम होतो, परंतु अनेकांना हे माहित नाही की ते प्रजनन आरोग्यावर आणि गर्भधारणेवर देखील परिणाम करते.

विविध अभ्यासांनुसार, प्रजनन वयोगटातील महिलांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढले आहे, विशेषतः २५ ते ३५ या वयोगटातील महिलामध्ये ही समस्या आढळते. धुम्रपान हे प्रजनन क्षमतेवरही परिणाम करते, गर्भधारणेच्या गुंतागुंतीची शक्यता वाढवते आणि गर्भाशयात आणि जन्मानंतर बाळाच्या विकासातदेखील अडचणी निर्माण करते. गर्भवती महिला धुम्रपान करत नसली तरी, सेकंड हँड स्मोकिंग अर्थात जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्य धुम्रपान करत असतील तर तितकेच हानिकारक ठरु शकते. गर्भधारणेची योजना आखणाऱ्या महिलांनी त्यांच्या आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी धुम्रपान टाळणे गरजेचे आहे (फोटो सौजन्य – iStock) 

काय सांगतात तज्ज्ञ

डॉ. पद्मा श्रीवास्तव, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी सांगितले की, गरोदरपणात धूम्रपान केल्याने आई आणि बाळाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. सिगारेटमध्ये असलेले विषारी रसायने जसे की निकोटीन, कार्बन मोनोक्साइड आणि टार हे प्लेसेंटा आणि गर्भाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी करतात. यामुळे गर्भाच्या वाढीत अडथळे येऊ शकतात, गर्भपात होऊ शकतो, अकाली जन्म होऊ शकतो आणि अगदी मृत बाळ जन्माला येऊ शकते. यामुळे आईला गर्भनाळेसंबंधी समस्या (जिथे प्लेसेंटा खूप लवकर गर्भाशयातून वेगळे होते) होण्याचा धोका देखील वाढतो, जी एक जीवघेणा परिस्थिती आहे. 

शिवाय, निकोटीन गर्भाशयातील रक्तप्रवाहावर देखील परिणाम करते, ज्यामुळे गर्भाचा विकास मर्यादित होतो. निकोटीन आईच्या दुधात जाऊ शकते,ज्यामुळे बाळाची झोप, आहारातील पोषकता आणि दीर्घकालीन न्यूरोडेव्हलपमेंटमध्येही व्यत्यय येऊ शकतो. इतकेच नाही तर, धूम्रपान करणाऱ्यांना एक्टोपिक गर्भधारणा होण्याची आणि प्रसूती आणि प्रसूतीदरम्यान समस्या येण्याची शक्यता अधिक असते. इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारख्या प्रजनन उपचार घेणाऱ्या महिलांनीही धुम्रपान केल्यास त्यांच्या यशाचे प्रमाण कमी होते.

मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास महिला गरोदर राहू शकतात का? काय सांगतात तज्ज्ञ

धुम्रपानाचा बाळावर कसा परिणाम?

धुम्रपानाचा दुष्परिणाम

धुम्रपान करणाऱ्या मातांच्या पोटी जन्मलेल्या बाळांचे वजन कमी असण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे भविष्यात त्या बाळाला विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अशा बाळाला सडन इन्फंट डेथ सिंड्रोम (SIDS), श्वसन संक्रमण, दमा आणि l वर्तणुकीशी संबंधित समस्यांचा धोका देखील जास्त असतो. गर्भधारणेदरम्यान धूम्रपान केल्याने बाळाच्या मेंदूच्या विकासावरही परिणाम होऊ शकतो आणि विकासात्मक अडचणींचा धोका वाढतो. 

गर्भधारणेदरम्यान धुम्रपान केल्याने एपिजेनेटिक बदलांद्वारे बाळाच्या डीएनएमध्ये देखील बदल होतो, ज्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. गर्भवती मातांनी धूम्रपानाची सोडणे आणि निरोगी जीवन जगणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच विलंब न करता धूम्रपानची सवय सोडा असा सल्ला डॉ. पद्मा यांनी दिला.

धुम्रपानाचा धोकादायक परिणाम 

डॉ. निशा पानसरे(फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, खराडी, पुणे) सांगतात की, गर्भधारणेदरम्यान धूम्रपान करणे अजिबात योग्य नाही कारण त्यामुळे बाळाला पहिला श्वास घेण्यापूर्वीच हानिकारक विषारी पदार्थांचा सामना करावा लागतो. धुम्रपान बाळाच्या मेंदूच्या विकासावर, फुफ्फुसांच्या कार्यावर आणि दीर्घकालीन आरोग्यावरही परिणाम करू शकते.

ज्या महिला आधीच गर्भवती आहेत त्यांच्यासाठी, धुम्रपान हा गर्भपात, एक्टोपिक प्रेग्नन्सीची शक्यता वाढवते आणि बाळाच्या वाढीवर परिणाम करते. धुम्रपान सोडणे हे आई आणि बाळ अशा दोघांचेही जीवन सुरक्षित ठेवते. महिलांनी गर्भधारणेदरम्यान निरोगी राहण्याची खात्री केली पाहिजे. गर्भवती महिलांनी यशस्वी गर्भधारणा आणि प्रसूतीसाठी प्रजनन सल्लागाराने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.”

गरोदर महिलांसाठी किती फायदेशीर ठरतो योग? गायनॅकने सांगितले महत्त्व

या टिप्सचे पालन करा

  • गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भवती असल्याचे कळताच धुम्रपानाचे व्यसन टाळा. असे केल्याने यशस्वी गर्भधारणेस मदत होईल
  • कसलीही लाज न बाळगता व न घाबरता डॉक्टरांशी समुपदेशनाबद्दल चर्चा करा. समुपदेशनाचा आधार घेण्यास अजिबात संकोच करू नकाॉ
  • धुम्रपानाची इच्छा निर्माण करणाऱ्या परिस्थिती ओळखा आणि त्या टाळण्यासाठी योग्य पर्याय शोधा
  • श्वासोच्छवासाचे व्यायाम, योगासने किंवा ध्यानधारणा यासारख्या तंत्रांमुळे धुम्रपानाची इच्छा कमी होण्यास मदत होते
  • तुमच्या बाळासाठी, तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी धुम्रपान सोडण्याचा निर्णय घ्या व यासाठी स्वतःला दररोज प्रोत्साहन द्या. धुम्रपानाची सवय सोडणे हे तुमच्या प्रजनन आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि बाळाला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Pregnancy tips smoking addiction is fatal for mother and baby quit immediately expert advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • during pregnancy
  • pregnancy tips
  • smoking

संबंधित बातम्या

नोकरदार महिलांमध्ये वाढतेय धूम्रपानाचे प्रमाण; ताण कमी करण्यासाठी घेतला जातोय आधार
1

नोकरदार महिलांमध्ये वाढतेय धूम्रपानाचे प्रमाण; ताण कमी करण्यासाठी घेतला जातोय आधार

धूम्रपान न करताही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
2

धूम्रपान न करताही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

पावसाळ्यातील Hepatitis संसर्ग आणि गर्भधारणा; कोणता आहे धोका, तज्ज्ञांचे मत
3

पावसाळ्यातील Hepatitis संसर्ग आणि गर्भधारणा; कोणता आहे धोका, तज्ज्ञांचे मत

Premature Ovarian Insufficiency महिलांकरिता ओव्हेरियन रिजुवेनेशन थेरपी ठरतेय आशेचा किरण
4

Premature Ovarian Insufficiency महिलांकरिता ओव्हेरियन रिजुवेनेशन थेरपी ठरतेय आशेचा किरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.