Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शहरी भागात वाढतोय प्रायव्हेट पार्टचा कॅन्सर, 50 पेक्षा कमी पुरुषांना धोका; 5 लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे पळा

प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांच्या जननेंद्रियामध्ये होणारा एक घातक आजार आहे. मात्र वेळेवर उपचार सुरू करून तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. याची सुरुवातीची लक्षणे जाणून घेणे महत्वाचे आहे, जे या लेखात दिले आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 10, 2025 | 10:37 AM
प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे काय आहेत (फोटो सौजन्य - iStock)

प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे काय आहेत (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

प्रोस्टेट कॅन्सर हा पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये होणारा एक गंभीर आजार आहे. हा कॅन्सरचा एक प्रकार असून अक्रोडाच्या आकाराचे प्रोस्टेट ग्लँडमध्ये आढळतात. वास्तविक गेल्या काही वर्षांपूर्वी वयाच्या 50 व्या वर्षानंतर हा प्रोस्टेट कॅन्सर पुरुषांना झालेला आढळून येत असे. पण नुकत्यात आलेल्या एका अहवालानुसार, दावा कऱण्यात आला आहे की, कमी वयाच्या पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. दिल्लीतील युनिक हॉस्पिटल कॅन्सर मेडिकल सेंटरच्या मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आशिष गुप्ता यांनी एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत अधिक माहिती दिली असून प्रोस्टेट कॅन्सर वाढत असल्याचे सांगितले आहे. 

प्रोस्टेट कर्करोग म्हणजे काय आणि कशी करावी तपासणी? प्रत्येक पुरूषाला माहीत असायलाच हवे

WHO चा अहवाल

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने दिलेल्या अहवालात सिद्ध झालेल्या आकडेवाडीनुसार, 2022 मध्ये भारतात 37,948 प्रोस्टेट कॅन्सरच्या केस समोर आल्या होत्या. तर ही आकडेवारी वाढून साधारण 14 लाख प्रोस्टेट कॅन्सरच्या नव्या केस यावर्षी समोर आल्या आहेत आणि ज्या गेल्या तीन वर्षात तीन पट असल्याचे दिसून आले आहे. डॉ. गुप्ता यांच्या सांगण्यानुसार, सुरूवातीलाच जर प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे ओळखता आली तर त्यावर लवकर उपाय करता येऊ शकतात. 

भारतात प्रोस्टेट कॅन्सरबाबत कळणे ही मोठी समस्या आहे. डॉ. गुप्ता यांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेत प्रोस्टेट कॅन्सरबाबत 80 टक्के रूग्णांना सुरूवातीलाच याबाबत माहिती मिळते, पण भारतात मात्र याचा आकडा अगदी विरूद्ध आहे. 

जीवनशैली बदल ठरतोय प्रोस्टेट कर्करोगासाठी कारणीभूत – कर्करोग तज्ज्ञांचा इशारा

प्रोस्टेट कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे

  • लघवी करण्यास त्रास होणे 
  • सतत लघवी होणे, विशेषतः रात्रीच्या वेळी सतत उठून लघवीला जावे लागणे 
  • लघवी वा सिमेनमधून रक्त येणे 
  • कुल्ले, पाठ वा पेल्विकमध्ये सतत दुखणे 

तज्ज्ञांच्या मते अनेकदा प्रोस्टेट कॅन्सर हा सुरूवातीच्या स्टेजवर कळूनच येत नाही आणि याची कोणतीही खास लक्षणे दिसून येत नाही. यापासून बचावासाठी नियमित प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन (PSA) टेस्ट करावी आणि तपासणीच्या माध्यमातून पुरुष आपल्या आरोग्यावर नियंत्रण ठेऊ शकतात आणि प्रोस्टेट कॅन्सर वाढण्याचा त्रास कमी करू शकतात. 

वाढत्या प्रोस्टेट कर्करोगाची चिन्हे आणि लक्षणे यात समाविष्ट असू शकतात:

  • मूत्रमार्गातून अचानक रक्तस्राव
  • पाठदुखी
  • हाडांचे दुखणे
  • इरेक्शन होण्यास अडचण, ज्याला इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणतात
  • खूप थकवा जाणवणे
  • प्रयत्न न करता वजन कमी होणे
  • हात किंवा पाय कमकुवत होणे

डॉक्टरांना कधी भेटावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जर तुम्हाला कोणतीही लक्षणे आढळली तर डॉक्टर किंवा इतर आरोग्य सेवा व्यावसायिकांशी संपर्क साधा.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Prostate cancer known as private part cancer in men increasing under 50 age do not ignore 5 symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 10:37 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.