प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांसाठी, विशेषतः त्यांच्या वाढत्या वयानुसार आरोग्यासाठी एक महत्त्वाचा चिंतेचा विषय आहे. नियमित तपासणी करून घेणे प्रोस्टेटच्या आरोग्याची काळजी घेणे वेळीच निदान आणि यशस्वी उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
प्रोस्टेट कॅन्सर स्क्रिनिंग काय आहे याची माहिती घेणे पुरुषांना त्यांच्या आरोग्याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकते. डॉ. अजय शाह, व्यवस्थापकीय संचालक, न्यूबर्ग अजय शाह प्रयोगशाळा यांनी याबाबत अधिक माहिती या लेखातून दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
प्रोस्टेट कॅन्सर स्क्रिनिंगचे महत्व
प्रोस्टेट कॅन्सर बऱ्याचदा हळू हळू विकसित होतो आणि जोपर्यंत तो प्रगत होत नाही तोपर्यंत त्याची लक्षणे दिसत नाहीत. स्क्रिनिंग केल्याने उपचार करण्यायोग्य टप्प्यावर कर्करोग असल्याचे लक्षात येऊन परिणाम आणि जगण्याचे प्रमाण यामध्ये सुधारणा होऊ शकते. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांसाठी किंवा आणि विशेषतः ज्यांच्या कुटुंबात याआधी कुणाला प्रोस्टेट कॅन्सर झालेला असल्यास स्क्रिनिंग खूप महत्वाचे आहे कारण त्यांना जास्त धोका असतो.
महत्वाच्या स्क्रिनिंग पद्धत
2. डिजिटल रेक्टल एक्झॅम (डीआरई)
डीआरई दरम्यान, डॉक्टर गुदद्वारात ग्लोव्हड ल्युब्रीकेटेड फिंगर घालून प्रोस्टेट ग्रंथी कडक झाली आहे का किंवा त्यामध्ये गाठी आहेत का हे तपासतात. पीएसए चाचणी इतकी विशिष्ट माहिती देणारी नसली तरी, डीआरई चाचणी मध्ये इतर माहिती मिळते आणि पीएसए पातळी न वाढविणाऱ्या त्रासांबद्दल समजते.
[read_also content=”तरूणांमध्ये का होतेय कॅन्सरची झपाट्याने वाढ https://www.navarashtra.com/lifestyle/why-is-cancer-increasing-rapidly-among-young-people-546661.html”]
स्क्रिनिंगचे फायदे
लवकर निदान: लक्षणे दिसण्यापूर्वी कर्करोग झाला आहे का हे समजते, यशस्वी उपचारांची शक्यता वाढवते.
देखरेख: वेळोवेळी प्रोस्टेटचे आरोग्य कसे आहे हे पाहता येते, विशेषतः जास्त धोका असलेल्यांसाठी.
मनाची शांतीः नियमित तपासणी पुरुषांना त्यांच्या प्रोस्टेटच्या आरोग्याविषयी आश्वस्त करू शकते.
स्क्रिनिंगची जोखीम
चुकीचे निदान: पीएसए पातळी वाढल्यामुळे अनावश्यक चिंता आणि अतिरिक्त चाचण्या करायला लागू शकतात, जसे की बायोप्सी, ज्याचा स्वतःचा धोका असतो.
ओव्हरडायग्नोसिसः माणसाच्या आयुष्यावर फारसा परिणाम नसणारे आणि हळूहळू वाढणारे कॅन्सर्स लक्षात आल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया किंवा रेडीएशन सारखे उपचार केले जातात त्याचे गंभीर दुष्परिणाम संभवतात.
चुकीचे निदान: पीएसए पातळी सामान्य असली तरी प्रोस्टेट कॅन्सर असू शकतो, अशा परिस्थितिमध्ये चुकीच्या माहितीने माणूस कॅन्सर नाही असे समज करून घेतो.
माहितीपूर्ण निर्णय घेणे
पुरुषांनी वैयक्तिक जोखीम घटक आणि प्राधान्यांचा विचार करून माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी त्यांचे डॉक्टरांबरोबर प्रोस्टेट कॅन्सर तपासणीविषयी चर्चा केली पाहिजे. वय, कौटुंबिक इतिहास, वंश (आफ्रिकन अमेरिकन पुरुषांना जास्त धोका असतो) आणि एकूण आरोग्य याबाबत विचार करावा.
स्क्रिनिंगमधील प्रगती
नवीन बायोमार्कर्सचा विकास आणि सुधारित इमेजिंग तंत्र यामुळे झालेल्या स्क्रिनिंगमधील प्रगतीमुळे निदानातील अचूकता वाढली आहे आणि प्रोस्टेट कर्करोगाच्या तपासणीशी संबंधित धोके कमी झाले आहेत. आक्रमक आणि असह्य कर्करोगांमधील फरक अधिक प्रभावीपणे ओळखून उपचारांचे अधिक योग्य निर्णयघेण्यास मदत हे या प्रगतीचे उद्दिष्ट आहे.
स्क्रिनिंगचे महत्त्व समजून घेऊन नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती ठेवणे म्हणजे प्रोस्टेटची योग्य काळजी घेणे नियमित तपासणी आणि डॉक्टरांशी चर्चा करून पुरुष त्यांच्या प्रोस्टेट आरोग्याची काळजी घेऊ शकतात, ज्यामुळे वेळीच निदान झाल्याने परिणामकारक उपाय करता येतात आणि जीवनमान सुधारू शकते.






