राज ठाकरे हे नाव घेतलं तरीही समोर येतो तो म्हणजे करारी चेहरा आणि शब्दातून केलेले वार. राज ठाकरेंचा १४ जून रोजी वाढदिवस असतो. राज ठाकरेंचा एक औरा आहे. अनेक जण त्यांना घाबरतात पण खऱ्या आयुष्यात प्रेमळ असणाऱ्या राज ठाकरेंचा प्रेमविवाह अर्थात लव्ह मॅरेज झाले आहे. प्रसिद्ध मोहन वाघ यांची मुलगी शर्मिला वाघशी राज ठाकरे यांनी प्रेमविवाह केला. मात्र हे सूत कुठे आणि कधी जुळले तुम्हाला माहीत आहे का?
शर्मिला ठाकरे यांचे राजच्या घरी येणेजाणे होते. मात्र खरी प्रेमकहाणी सुरू झाली ती रूपारेलच्या कॉलेज कट्ट्यावर. आता ही कहाणी नेमकी कशी सुरू झाली याची तुम्हालाही नक्कीच उत्सुकता असेल ना? आम्ही तुम्हाला या लेखातून राज ठाकरे आणि शर्मिला वाघ ठाकरे यांच्या या क्यूटशा लव्हस्टोरीबाबत सांगतोय. लग्नाला ३४ वर्ष झाल्यानंतरही या दोघांची जोडी आदर्श जोडी म्हणून पाहिली जाते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
पहिली भेट कशी झाली?
ABP माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली पहिली भेट कशी झाली आणि राजने शर्मिला यांना कसे इंप्रेस केले याबाबत खुद्द राज आणि शर्मिला यांनी खुलासा केला होता. शर्मिला यांनी सांगितले की, ‘रूपारेल कॉलेजच्या कट्ट्यावर आम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटलो. नुकतीच नोकरी करायला लागले होते आणि मित्रमैत्रिणींना भेटायला कट्ट्यावर गेले. तेव्हा शिरीष पारकर या कॉमन मित्राद्वारे राजशी पहिली भेट झाली आणि तेव्हापासूनच राज आपल्या मागे लागला.’ असा खुलासा त्यांनी केला.
[read_also content=”जोडीदाराचे आहेत विवावबाह्य संबंध, कसे ओळखतात महिला, अभ्यासातून आला खुलासा समोर https://www.navarashtra.com/lifestyle/study-claimed-women-can-tell-man-is-cheating-in-relationship-or-extra-marital-affair-by-just-reading-his-face-547330.html”]
कोणी केले प्रपोज?
इतकंच नाही तर सर्वांसमोर शर्मिला यांनी राज ठाकरेंची फिरकी घेतली होती आणि सांगितले की, राज आता अजिबात मान्य करणार नाही की तोच माझ्या मागे लागला होता. तर लग्नासाठी मागणीही त्यानेच घातली होती. त्यावेळी लँडलाईनवर राज फोन करायचा आणि मग आमचं बोलणं व्हायचं. तर फारच लहान वयात आमचं लग्न झालं आणि लगेचेच अमितचा जन्म झाला. यावेळी राज फारच लहान दिसत होता असंही गमतीने शर्मिला यांनी सांगितलं होतं.
वयात २ वर्षांचं अंतर
शर्मिला या राज ठाकरे यांच्यापेक्षा २ वर्षाने मोठ्या आहेत. त्यावेळी वयातील अंतर असणं हा एक वेगळाच मुद्दा होता. मात्र मोहन वाघ यांचे ठाकरे घराण्याशी असणारे चांगले संबंध आणि राज ठाकरे यांचा स्वभाव या सगळ्यामुळे गोष्टी जुळून आल्या आणि या दोघांनी ११ डिसेंबर, १९९० मध्ये लग्नगाठ बांधली. गेले ३४ वर्ष एकमेकांबरोबर दोघेही सुखाचा संसार करत आहेत.
चढउतारात कायम साथ
राज ठाकरे यांच्या प्रत्येक गोष्टीत पत्नी शर्मिला यांनी खांद्याला खांद्या लाऊन काम केले आणि साथ दिली. राजच्या प्रत्येक निर्णयात शर्मिला यांनी खंबीरपणाने साथ देत आता त्यांच्या संसाराला ३४ वर्ष पूर्ण झाली आहेत. तर मुलगा अमित, सून मिताली बोराडे आणि गोंडस नातू कियान आणि मुलगी उर्वशी असा सुखी परिवार असून अजूनही दोघे कायम एकमेकांसह दिसून येतात.