रश्मिका मंदानाने नेसली कुर्गी स्टाइल पारंपारीक पद्धतीने साडी
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमीच चर्चेत असते. आपल्या अभिनय कौशल्याने आता तिने बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीचे बॅक टू बॅक चित्रपट येत असून चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही कमाल केली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्री सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिच्या चाहत्यांसाठी तिच्या आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असते. नुकतेच रश्मिकाने तिच्या बालपणीच्या मैत्रीणींसोबतचे काही फोटो तिच्या इन्स्टावर शेअर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. एका वेगळ्याच स्टाईलमध्ये यावेळी तिने साडी नेसली आहे. ज्यात तिने कुर्गी स्टाईलमध्ये साडी ड्रेपिंग केली आहे.
रश्मिकाने आपल्या इंस्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री निळ्या रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे. फोटोतील अभिनेत्रीच्या स्माइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रश्मिका मंदाना तिच्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत पोज देताना दिसत आहे. यावेळी तिची मैत्रीण गुलाबी साडीत खूप सुंदर दिसत आहे. रश्मिका मंदानाने शेअर केलेल्या आणखी एका फोटोमध्ये ती तिच्या मैत्रिणींच्या ग्रुपसोबत पोज देताना दिसत आहे. हा फोटो बघून रश्मिका मंदानाच्या मैत्रिणीही तिच्यासारख्या अतिशय साध्या आणि गोंडस दिसत आहेत.
हे फोटो शेअर करताना रश्मिका मंदानाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ‘मी या मित्रांसोबत मोठी झाली आहे.’ याशिवाय रश्मिकाने ‘कोदगू कुठे आहे, माझे हृदय माझा इतिहास आहे’ असेही लिहिले आहे. रश्मिका मंदानाचे मैत्रीणींसोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कुर्गी साडी कुठे नेसली जाते?
रश्मिकाने जी कुर्गी ड्रेप साडी परिधान केली आहे याला कोडागु स्टाइल ड्रेपिंग असेही म्हणतात. कुर्गी साडी ही कर्नाटक राज्यातील पारंपारिक साडी आहे. तिच्या अनोख्या ड्रेपिंग शैलीसाठी ही साडी जगभरात लोकप्रिय आहे. या साडीचे प्लीट्स, कंबरेच्या मागील बाजूस टकलेले असतात. साडीचा पल्लू खांद्यावर सुबकपणे गुंडाळलेला असतो. सिल्क, सॅटिन किंवा कॉटनचे कापड या साडीसाठी वापरला जाते. कुर्गी साडीचा संबंध महान ऋषी अगस्त्य आणि त्यांची पत्नी कावेरी यांच्या पौराणिक कथेशी आहे.
या चित्रपटांमध्ये झळकणार रश्मिका मंदाना
रश्मिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर रश्मिका ‘पुष्पा 2: द रुल’ या ॲक्शन ड्रामा मध्ये झळकणार आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात अभिनेत्रीने पुन्हा एकदा ‘श्रीवल्ली’ची भूमिका साकारणार आहे. पुष्पाशिवाय रश्मिका ‘रेनबो’, ‘द गर्लफ्रेंड’ आणि ‘छावा’ या चित्रपटातही दिसणार आहे. रश्मिका मंदाना सलमान खानच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटातही दिसणार आहे.