रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार
Ratan Tata death news live updates: जगातील मोठे उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन झाले आहे. भारतीय उद्योगजगताचा रत्न हरपल्यामुळे संपूर्ण भारतावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून रतन टाटा यांची प्रकृती चिंताजन असल्यामुळे त्यांना रग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांनी उद्योग क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्यांच्या विचारांनी अनेकांना प्रेरणा मिळते. त्यांनी त्यांच्या साधेपणा आणि दयाळू वृत्तीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. रतन टाटा यांसारखे महान व्यक्तिमत्व आज जरी आपल्यात नसेल तरी त्यांचे विचार कायमचे प्रेरणादायी आणि मह्तवपूर्ण ठरतील. चला तर जर जाणून घेऊया रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार.
लोखंडाचा नाश कोणीही करू शकत नाही, पण त्याचा स्वतःचा गंजही नष्ट करू शकतो! त्याचप्रमाणे, माणसाला कोणीही नष्ट करू शकत नाही, परंतु त्यांची स्वतःची मानसिकता करू शकते.” “लोक तुमच्यावर फेकलेले दगड घ्या आणि ते स्मारक बांधण्यासाठी वापरा.
विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल.
जीवनात पुढे जाण्यासाठी चढ उतार खूप महत्वाचे असतात.
पैसा माणसाला वर नेऊ शकतो, पण माणूस कधीही पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही.
तुमची चूक तुमची एकट्याची आहे, तुमचे अपयश एकट्याचे आहे, त्यासाठी कोणाला दोष देऊ नका. आपल्या चुकांमधून शिका आणि आयुष्यात पुढे जा.
हे देखील वाचा: Ratan Tata Passed Away: रतन टाटा यांचे निधन, भारतीय उद्योगजगताचा चेहरा हरपला…
तुमचे जीवन चढ-उतारांनी भरलेले आहे, त्याची सवय करा.
टीव्हीचे आयुष्य खरे नाही आणि टीव्ही मालिकेसारखे आयुष्यही नाही. वास्तविक जीवनात विश्रांती नाही, फक्त काम आहे.
जे लोक इतरांची कॉपी करतात ते थोड्या काळासाठी यश मिळवू शकतात, परंतु ते आयुष्यात फार प्रगती करू शकत नाहीत.
सांत्वनाची बक्षिसे फक्त शाळेतच दिसतात. काही शाळा तुम्हाला उत्तीर्ण होईपर्यंत परीक्षा देऊ देतात. पण बाहेरच्या जगाचे नियम वेगळे आहेत, तिथे हरणाऱ्याला दुसरी संधी मिळत नाही.
योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. मी निर्णय घेतो आणि मग ते योग्य सिद्ध करतो.
आपण माणसं आहोत, संगणक नाही, त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या, नेहमी गंभीर करू नका.
हे देखील वाचा: Ratan Tata: रतन टाटांचा जन्म, वय, शिक्षण, कुटुंब, उत्तराधिकारी, एकूण संपत्ती नेमकी किती?
चांगले अभ्यास करणाऱ्या आणि मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना कधीही चिडवू नका. एक वेळ अशी येईल की तुम्हालाही त्याच्या हाताखाली काम करावे लागेल.
जर लोकांनी तुमच्यावर दगडफेक केली तर त्या दगडांचा वापर तुमचा महाल बांधण्यासाठी करा.
तुम्हाला जे योग्य वाटतं त्यासाठी नेहमी उभे राहा आणि शक्य तितके निष्पक्ष राहा.