बदलत्या वातावरणानुसार आपल्या शरीराची विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे. आरोग्यावर दुर्लक्ष केल्यास अनेक आजरांचा सामना करावा लागू शकतो. चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे फार गरजेचे आहे, मात्र आजकाल अनेक लोक बाहेरचे फास्ट फूड खाऊन आपले स्वास्थ्य खराब करत असतात. आपल्या शरीराची काळजी घेणे हीदेखील एक आध्यत्मिक उपासनाच आहे. त्यामुळेच अनेक आध्यात्मिक लोकही सकस आहार घेत आपल्या शरीराची पुरेपूर काळजी घेते असतात.
आध्यात्मिक जगतातील लोकप्रिय गुरु जया किशोरी यांना तर सर्वचजण ओळखतात. तुम्ही जर त्यांना नीट पहिले तर दिसेल की त्या नेहमीच निरोगी राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज तुम्हाला दिसू लागेल. त्यांना हे सर्व शक्य होते, कारण त्या आपल्या शरीराची विशेष काळजी घेतात. नेहमी निरोगी राहण्यासाठी त्या आपले वजन नियंत्रणात ठेवण्यावर भर देतात. मात्र एकदा त्यांच्याकडून चूक झाली आणि या चुकीच्या परिणामाने त्यांचे बरेच वजन कमी झाले.
वजन कमी करण्याच्या त्यांच्या या फिटनेस जर्नीबद्दल आणि वेटलॉस बद्दल त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. तसेच एका युट्युब व्हिडिओत त्यांनी आपला वजन कमी करण्याचा अनुभव शेअर केला. ज्यामध्ये त्यांनी धक्कादायक गोष्टीचा उलगडा केला. त्यांनी सांगितले की, वजन कमी करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्यांचे कसे नुकसान होऊ लागले.
जया किशोरी यांनी सांगितले की, वजन कमी करण्यासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जीवनशैली! वजन कमी करण्यासाठी त्यांनी वापरलेल्या क्रॅश डाएट या पर्यायाचा त्यांना आजही पश्चाताप होतो. त्यावेळी त्यांना समजले की वजन कमी करणे हे आयुष्यभराचे काम आहे. फॅन्सी आणि क्रॅश डाएट केल्याने शरीराचे किती नुकसान होऊ शकते याचा धडा त्यांना मिळाला.
दरम्यान क्रॅश डाएटमध्ये जया किशोरीला मीठासोबतच अनेक गोष्टी खाण्यास बंदी केली होती. त्यामुळेच त्यांचे वजन झपाट्याने कमी झाले. मात्र याचा परिणाम असा झाला की, त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ लागली. जया किशोरींने सांगितले की, काही पदार्थ हे इमोशनल आणि एनर्जी फूड्ससारखे असतात त्यांना खाणे कधीही चांगले.