नागपंचमीला बनवा कोकणी पद्धतीमध्ये हळदीच्या पानातील पातोळ्या
नुकताच श्रावण महिना सुरु झाला आहे.श्रावण महिना सुरु झाल्यानंतर सणांची सुरुवात होते. श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. प्रत्येक मुलीला माहेरची आठवण करून देणारा हा नागपंचमी सण. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून गोडाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. यादिवशी गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ या पदार्थांचा वापर करून बनवलेले पुरणाचे दिंडे, हळदीच्या पानांमधील पातोळ्या हे पदार्थ बनवले जातात. कोकणात बनवले जाणारे पदार्थ नेहमीच खास असतात.
नागपंचमीच्या दिवशी कोकणात पारंपरिक खाद्य पदार्थ बनवण्याची संस्कृती आहे. नागपंचमीला कोकणात खास हळदीच्या पानातील पातोळ्या बनवल्या जातात. हळदीच्या पानाचा वापर करून बनवलेल्या पातोळ्या चवीला सुद्धा खूप सुंदर लागतात. श्रावण महिन्यात पानाफुलांना पालवी फुटते. त्यामुळे सगळीकडे पसणारा हळदीच्या पानाचा सुगंध सगळ्यांचं आवडतो. त्यामुळे यंदाच्या नागपंचमीला कोकणात बनवल्या जाणाऱ्या हळदीच्या पातोळ्या नक्की बनवून पहा. वाचा सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-instagram)
हे देखील वाचा: सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी गार्लिक ब्रेड