Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Relationship Tips: परफेक्ट बायको होण्यासाठी सोप्या टिप्स; देवी पार्वतीकडून शिका 5 गोष्टी, व्हाल बेस्ट पार्टनर

भारतीय संस्कृतीत देवी पार्वतीला स्त्रीत्व, शक्ती, सौम्यता आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. ती केवळ भगवान शिवाची अर्धांगिनीच नाही तर एक आदर्श पत्नी म्हणून तिची भूमिका प्रत्येक युगातील महिलांना प्रेरणा देते.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 18, 2025 | 12:45 PM
पार्वतीचे कोणते गुण अंगिकारल्यास टिकेल संसार (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

पार्वतीचे कोणते गुण अंगिकारल्यास टिकेल संसार (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू पंचांगानुसार आता लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. हा महिना देवांचा देव महादेव यांना समर्पित मानला जातो. देवी पार्वतीचा उल्लेख नसल्यास महादेवाचा उल्लेख अपूर्ण मानला जातो. भारतीय संस्कृतीत देवी पार्वतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि पार्वती देवी ही स्त्रीत्व, शक्ती, सौम्यता आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. देवी पार्वती ही सर्वच महिलांना प्रेरणा देते आणि नात्यासाठीही ती अपवाद नाही. 

सध्या नात्यांमध्ये अनेकदा इतका दुरावा दिसून येतो. पण देवी पार्वतीचे गुण आपल्या अंगी बाणवल्यास तुम्हीही एक उत्तम बायको म्हणून नातं टिकवू शकता. इतकंच नाही तर एक चांगला जीवनसाथी बनण्यासाठी आपण देवी पार्वतीकडून कोणते गुण शिकू शकतो ते जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Google Gemini AI) 

समर्पण

देवी पार्वतीचे शिवाप्रती असलेले समर्पण अढळ होते. शंकराचे प्रेम मिळविण्यासाठी देवी पार्वतीने वर्षानुवर्षे तपस्या केली आणि शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त केले. यातून आपल्याला हीच शिकवण मिळते की नात्यात खऱ्या समर्पणाने आणि निष्ठेने कोणताही अडथळा दूर करता येतो. आपलं प्रेम अढळ असेल आणि श्रद्धा असेल तर नात्यात कायम ते टिकून राहते आणि प्राप्त होते. आपल्या प्रेम करणाऱ्या माणसावर आपण नेहमीच समर्पित असावे

Banksying: नात्यातील सुखशांती उद्ध्वस्त करतोय बँक्सिंग रिलेशनशिप ट्रेंड, तुमच्याबरोबर ‘हे’ घडतंय का?

संयम

भगवान शिव ध्यानात कायम मग्न असतात असे म्हटले जाते. इतकंच नाही तर लग्न होण्याआधीही शिवशंकर अघोरी जीवन जगायचे पण पार्वतीने याबाबत कधीही तक्रार केली नाही. तिने संयमाने नातेसंबंध हाताळले. नात्यांमध्ये संयम हा सर्वात मोठा गुण आहे. संयमाने गोष्टी हाताळल्यास आपलं नातं दीर्घकाळासाठी टिकून राहते. आपला जोडीदार कसा आहे आणि काय करत आहे याबाबत संयमाने निर्णय घ्यावा लागतो आणि त्याप्रमाणे वागावे लागते. 

स्वाभिमान

पार्वती समर्पित होती पण तिचा स्वाभिमान कधीही विसरली नाही. जेव्हा शिवाने तिचा अपमान केला तेव्हा तिने तिच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी अग्नीत प्रवेश केला. स्त्री म्हणून स्वतःचा स्वाभिमान जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एखाद्यावर प्रेम आहे म्हणून आपला स्वाभिमान गहाण ठेऊन त्या व्यक्तीबरोबर राहू नये. तर आपला स्वाभिमानही तितकाच महत्त्वाचा आहे हे आपल्या वागण्यातून दर्शवावे. यातून आपण शिकू शकतो पत्नी असणे समर्पित असते परंतु स्वाभिमानाने राहणेही गरजेचे आहे. 

नात्याला झाली अनेक वर्ष, पण गायब झालाय रोमान्स; त्वरीत करा 5 काम भांडणाला उरणार नाही वाव

संतुलन 

शिवाच्या उग्रतेसमोर पार्वतीची सौम्यता नात्यात संतुलन निर्माण करते. चांगल्या नात्यात संतुलन महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमचा जोडीदार रागात असेल तेव्हा तुम्हीही रागात असून चालत नाही. हे नातं अधिक दुरावा निर्माण करते. त्यापेक्षा रागावर नियंत्रण ठेऊन आणि संतुलन राखून तुम्ही नात्यात अधिक काळ एकत्र राहू शकता. 

सहचारिणी

देवी पार्वती केवळ पत्नीची भूमिकाच बजावत नाही तर भगवान शिवासाठी मार्गदर्शक आणि मित्रदेखील आहे. ज्या नात्यात मैत्री नसेल, आदर नसेल ते नातं टिकू शकत नाही. सहचारिणी अर्थात आपल्या जोडीदाराला प्रत्येक गोष्टीत साथ देणारी अशी पार्वती. त्यामुळेच संसार टिकून रहायला मदत मिळते आणि नातंही टिकून राहतं. 

आदर्श पत्नीसाठी हे गुण खूप महत्वाचे आहेत. भोलेनाथची पत्नी म्हणून देवी पार्वतीचे हे गुण स्वीकारून, कोणतीही स्त्री आदर्श पत्नी बनण्याच्या दिशेने एक पाऊल टाकू शकते.

Web Title: Relationship lessons from goddess parvati 5 things to learn from lord shiva wife to become best wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • Lord Shiva
  • Relationship Tips
  • Shravan 2025

संबंधित बातम्या

आई शप्पथ! नवऱ्याचं ऑफिसमध्ये लफडं; बायकोने कसं ओळखावं, कोणालाही विचारायची भासणार नाही गरज, 5 संकेत देतील उत्तर
1

आई शप्पथ! नवऱ्याचं ऑफिसमध्ये लफडं; बायकोने कसं ओळखावं, कोणालाही विचारायची भासणार नाही गरज, 5 संकेत देतील उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.