Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तदाब प्रभावीपणे व्यवस्थापित करणार ‘रेनल डिनरव्हेशन’ उपचार पद्धती

Renal Denervation Treatment: अनियंत्रित हायपरटेन्शन व्यवस्थापित करणारी पहिली रेनल डिनरव्हेशन शस्त्रक्रिया नवी मुंबईत पार पडली. आता हायपरटेन्शची समस्या जास्त काळ राहू शकणार नाही. यासाठी तंत्रज्ञानात झालेल्या विकासाची मदत घेण्यात येणार आहे. रेनल डिनरव्हेशन शस्त्रक्रिया म्हणजे नेमके काय? जाणून घ्या.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 06, 2024 | 01:11 PM
‘रेनल डिनरव्हेशन’ उपचार पद्धती म्हणजे काय

‘रेनल डिनरव्हेशन’ उपचार पद्धती म्हणजे काय

Follow Us
Close
Follow Us:

जेव्हा ४२ वर्षीय रुग्णामध्ये धोकादायक पद्धतीने वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात नियमित उपचार अयशस्वी ठरली, तेव्हा डॉ. ब्रजेश कुमार कुंवर रेनल डिनर व्हेशन या एका अभिनव उपचाराकडे वळले. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. ब्रजेश कुंवर यांनी नवी मुंबईतील अशा प्रकारची पहिलीच तीव्रता कमीत कमी असलेली शस्त्रक्रिया केली. हे उपचार म्हणजे हायपरटेन्शन (HT) व्यवस्थापनामध्ये झालेली लक्षणीय प्रगती दर्शवतात. रायगड, उरण येथे राहणारे श्री.चेतन वाझेकर हे मनमुराद भटकंती करणारे आणि साहसी उत्साही पर्यटक. 

विविध प्रकारची अँटीहाइपरटेन्सिव्ह औषधे घेत असूनही अनियंत्रित राहत असलेल्या उच्च रक्तदाबाच्या विकाराचे म्हणजेच रेझिस्टंट हायपरटेन्शन (HT) विरुद्ध ते झुंज देत होते. सक्रिय, कार्यमग्न जीवनशैली असूनही त्यांचा रक्तदाब धोकादायकरित्या उच्चच राहिला होता. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढत होता. या गोष्टीचा त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकत होता.

काय होता रुग्णाचा अनुभव

श्चेतन वाझेकर, पेशंट, उच्च रक्तदाब विकारग्रस्त म्हणाले,“या उपचारांपूर्वी माझ्या उच्च रक्तदाबामुळे दैनंदिन कामे करणे देखील मला कठीण झाले होते. माझ्या तब्येतीची मला सदैव काळजी वाटत होती. डॉ. कुंवर आणि अपोलो हॉस्पिटलमधील टीमचे मी आभार मानतो. त्यांच्यामुळे मला नवजीवन मिळाल्यासारखेच वाटत आहे. माझा रक्तदाब नियंत्रणात आहे आणि आता सतत मला कधी काय होईल याची चिंता करत बसण्याऐवजी मला छान, स्वास्थ्यपूर्ण वाटत आहे. आता परत एकदा आयुष्याची घोडदौड सुरू करायला आणि स्वतःच्या तब्बेतीची काळजी करत न बसता नवनवीन शिखरांवर विजय मिळवण्यास मी खूप उत्सुक आहे.”

हेदेखील वाचा – उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘अशा’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी

काय आहे रेनल डीनर्व्हेशन 

उच्च रक्तदाबाच्या समस्येसाठी नवे तंत्रज्ञान

रेनल डीनर्व्हेशन ही एक नवीन तीव्रता कमी असलेली उपचार प्रक्रिया असून रेझिस्टंट (प्रतिरोधक) एचटी व्यवस्थापित करण्यासाठी वापरली जाते. रेझिस्टंट एचटी म्हणजे सर्वसाधारणपणे केल्या जाणाऱ्या उपचारांना चांगला प्रतिसाद न देणारा उच्च रक्तदाब. 

रिनल म्हणजे मूत्रपिंड साठीच्या धमन्यांच्या सभोवतालच्या मज्जातंतूला रेडिओ फ्रिक्वेंसी पृथक्करण वितरीत करण्यासाठी कॅथेटर वापरल्याने, उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरणाऱ्या नसा विस्कळीत होतात. मज्जासंस्थेच्या क्रियांमधील ही घट रक्तदाब कमी करण्यास मदत करते आणि बहुविध औषधांची आवश्यकता कमी करू शकते.

उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी वरदान

डॉ. ब्रजेश कुमार कुंवर, वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी सांगितले,“उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये रेझिस्टंट एचटीचे प्रमाण 10% ते 20% पर्यंत असते. अवघे ४२ वर्षांच्या तरुण वयात अनियंत्रित एचटीचे निदान झालेल्या रुग्णावर या स्थितीचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हा रुग्ण सक्रिय जीवनशैली असलेला आणि खूप उत्साही आहे. अशा व्यक्तीला आपण जर वेळेवर वैद्यकीय उपचार मदत करू शकलो नाही तर ते फारच दुःखद ठरू शकते. रक्तदाब प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि दीर्घकाळ औषधावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रेनल डीनर्व्हेशन ही एक आश्वासक उपचार पद्धती ठरली.”

हेदेखील वाचा – रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी घ्या परिपूर्ण आहार; ‘या’ 4 पदार्थांचा करा अवश्य समावेश

नवीन तंत्रज्ञान

उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास काय करावे

अरुणेश पुणेथा, मुख्य कार्यकारी अधिकारी- प्रादेशिक पश्चिम क्षेत्र, अपोलो हॉस्पिटल म्हणाले,“डॉ. ब्रजेश कंवर यांनी केलेली रेनल डीनर्व्हेशन प्रक्रिया ही आमच्या डॉक्टरांच्या उत्कृष्ट वैद्यकीय कौशल्याची आणि क्षमतेची पावती आहे. अपोलो हॉस्पिटल मधील कार्डिओलॉजिस्ट (हृदयरोग तज्ज्ञ) संपूर्ण स्तरावर कार्डियाक केअर म्हणजेच हृदयाची काळजी घेतात. त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण वैयक्तिकृत प्रोहेल्थ हृदय तपासणी पासून ते जटिल, गुंतागुंतीच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या, स्ट्रक्चरल अशा हृदय शस्त्रक्रिया, अररीदमिय डिसऑर्डर आणि हॉर्ट फेल पर्यंत विकार व्यवस्थापित करण्यासाठी प्रगत उपचारपद्धती समाविष्ट असतात. ही नवीन इंटरव्हेंशनल प्रक्रिया आणखी एक महत्वपूर्ण पाऊल असून आमच्या रूग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि वैद्यकीय कौशल्य पुरवण्याच्या आमच्या बांधिलकीवर प्रकाश टाकते.”

Web Title: Renal denervation treatment will effectively manage blood pressure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 01:11 PM

Topics:  

  • health issues

संबंधित बातम्या

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी मखाणा ठरेल धोक्याचे, शरीराला फायदे होण्याऐवजी उद्भवतील आरोग्यासंबंधित समस्या
1

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी मखाणा ठरेल धोक्याचे, शरीराला फायदे होण्याऐवजी उद्भवतील आरोग्यासंबंधित समस्या

स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांमुळे शरीराला पोहचते हानी, दैनंदिन आहारात चुकूनही करू नका सेवन
2

स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांमुळे शरीराला पोहचते हानी, दैनंदिन आहारात चुकूनही करू नका सेवन

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी टोमॅटो ठरेल विषासमान! रोजच्या आहारात चुकूनही करू नका,शरीरात होतील मोठे बदल
3

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी टोमॅटो ठरेल विषासमान! रोजच्या आहारात चुकूनही करू नका,शरीरात होतील मोठे बदल

वारंवार नखं चावून खात असाल तर थांबा! आरोग्यासंबंधित उद्भवतील ‘हे’ गंभीर आजार, वाईट सवयींपासून राहा लांब
4

वारंवार नखं चावून खात असाल तर थांबा! आरोग्यासंबंधित उद्भवतील ‘हे’ गंभीर आजार, वाईट सवयींपासून राहा लांब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.