सतत बदलत चालेल्या वातावरणाचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. अपुरी झोप, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अवेळी जेवणे इत्यादी गोष्टींचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे अनेक आजार बळावण्याची शक्यता असते. आजार आजार वाढल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. त्यामुळे योग्य तो आहार घेऊन शरीराची काळजी घेतली पाहिजे. जगभरात अनेकजण उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीरसंबंधित समस्या वाढत जातात. त्यामुळे तुमचा रक्तदाब नेहमीच नियंत्रणात असला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या पद्धतीने आरोग्याची काळजी घ्यावी, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
उच्च रक्तदाबाची लक्षणे:
[read_also content=”त्वचेसाठी वरदान ठरेल मुलतानी माती, ‘अशा’ पद्धतीने वापर केल्यास पिंपल्स होतील दूर https://www.navarashtra.com/lifestyle/use-multani-mitti-in-this-way-545923.html”]
उच्च रक्तदाब वाढल्यानंतर आरोग्याची कशी काळजी घ्यावी:
मॅग्नेशियम युक्त पदार्थ खाणे:
उच्च रक्तदाबाची समस्या वाढल्यानंतर आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आहारात मॅग्नेशियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. मॅग्नेशियम युक्त आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, बिया, सोयाबीन, कडधान्य, गहू इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. त्यामुळे रोजच्या आहारात या पदार्थांचे सेवन केल्याने उच्च रक्तदाबापासून आराम मिळतो.
विटामिन डी:
आहारामध्ये विटामिन डी युक्त पदार्थांचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होईल. विटामिन डी युक्त पदार्थांमध्ये मासे, अंडी, चिकन, सोया, संत्र, तृणधान्ये, दही, तूप इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. तसेच रोज सकाळी उठल्यानंतर २० मिनिटं सूर्यप्रकाशामध्ये बसावे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहील.
[read_also content=”कोमट पाण्यात एक चमचा गाईचे तूप टाकून प्यायल्यास आरोग्याला होतील गुणकारी फायदे https://www.navarashtra.com/lifestyle/healthy-benefits-of-ghee-water-545906.html”]
पोटॅशियमयुक्त पदार्थ:
पोटॅशियम युक्त पदार्थांमध्ये केळी, पालक, बटाटा, इत्यादी खाद्यपदार्थांचा समावेश होतो. रोजच्या आहारात ४,७०० ग्रॅम पोटॅशियम घेणे आवश्यक आहे. पोटॅशियम युक्त पदार्थांचे आहारात सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.