सोशल मीडियामुळे जगभरातील अनेक घटना आपल्या पर्यंत सहज पोहोचतात. असं एक आश्चर्य आहे ते जगातील एका सर्वात लहान देशाचं.असा एक देश ज्याचं क्षेत्रफळ केवळ ५ चौरस आहे. या देशात केवळ ११ नागरिक आहेत. या देशाचा इतिहास देखील तितकाच रंजक असून सर्वत देशांना या देशाची उत्सुकता असते. चला तर मग जाणून घेऊयात या आगळ्या वेगळ्या देशाबाबत.
इंग्लंडमधील सफोल्क समुद्र किनाऱ्यापासून १० किमी अंतरावर आणि फक्त दोन पिलर्सवर हा देश उभा आहे. असा हा सर्वात छोटा देश म्हणजे सीलॅंड. या देशाचं हे आगळंवेगळं रुप अनेकांना आश्चर्यतकित करतं. एवढंच नाही तर या देशाला राष्ट्रपती आणि पंतप्रधान देखील आहेत. केवळ ११ नागरिकांचा असलेला हा देश समुद्राच्या मध्यावर आहे.
या देशाचा इतिहास पाहायला गेला तर, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अँटीएअरक्राफ्ट प्लॅटफॉर्म होता. 1942 मध्ये तो तयार करण्यात आला होता आणि त्यावेळेस त्याचं नाव एचएम फोर्ट रफ्स असं ठेवण्यात आलं होतं.
१९६७ साली पॅडी रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीने या चौकीवर ताबा घेतला आणि या ठिकाणाला “प्रिन्सिपॅलिटी ऑफ सीलॅंड” असं नाव दिलं. त्याने स्वतःला “प्रिन्स रॉय” असं घोषित केलं आणि सीलॅंडला स्वतंत्र देशाचा दर्जा दिला. या घोषणेनंतर त्यांनी सीलॅंडचा स्वतःचा ध्वज, राष्ट्रगीत, चलन (Sealand Dollar), पासपोर्ट, आणि नाइटहूड तयार केले. फक्त ११ नागरिकांचा मिळून तयार झालेला हा प्रदेश आहे. त्यामुळे सीलॅंडला आजतागायत कोणत्याही अधिकृत देशाने मान्यता दिलेली नाही, त्यामुळे ती एक मायक्रोनेशन (Micronation) म्हणून ओळखली जाते. येथे कायमस्वरूपी फारच थोडे लोक राहतात (२ ते ५ जण). आजही बेट्स कुटुंब सीलॅंडचा ताबा सांभाळत आहे. ज्या थोड्याशा प्रदेशात असलेल्या देशाने अख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं त्या सीलँडचे मुख्य बेट्स कुटुंब आहे. या कुटुंबानेच नेव्हीच्या चौकी असलेल्या छोट्याशा जागेला राष्ट्र म्हणूून घोषित केलं.
पॅडी रॉय बेट्स हे ब्रिटनमधील माजी लष्करी अधिकारी होते. त्यांनी १९६७ साली उत्तर समुद्रातील HM Fort Roughs या समुद्री चौकीवर ताबा घेतला.
१९७८ साली काही जर्मन नागरिकांनी सीलॅंड बळकवण्याचा प्रयत्न केला होता. जर्मनीच्या नागरिकांचं असं म्हणणं होतं की, एवढा छोटासा प्रदेश सहज जिंकता येईल. मात्र तसं झालं नाही, जर्मनीने मायकेल बेट्स यांना बंदी बनवलं. मात्र मायकेलने केलेल्या प्रतिकारपुढे जर्मनी नमली आणि पुन्हा ताबा मिळवल, असं सांगितलं जातं.