
यंदाचा ख्रिसमस होईल आणखीनच स्पेशल! लाडक्या नातेवाईक आणि प्रियजनांना मराठीतून पाठवा नाताळच्या शुभेच्छा
दरवर्षी २५ डिसेंबर ला नाताळ सण साजरा केला जातो. यादिवशी घरात कंदील आणि तोरण लावून सजावट केली जाते. तसेच ख्रिसमस ट्री, तारे लावले जातात. प्रत्येक घरात केक आणि गोड पदार्थ बनवले जातात. नाताळ सणाला केक बनवण्याची प्रथा आहे. हल्लीच्या डिजटल युगात सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे व्हाटसप इत्यादी अनेक वेगवेगळ्या ऍप्सचा वापर केला जात आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा लाडक्या प्रियजनांना आणि नातेवाईकांना नाताळ सणांच्या मराठीतून शुभेच्छा पाठवू शकता. यामुळे नात्यांमधील आपुलकी वाढेल आणि सणवार आनंदाने साजरा होतील. तुम्ही पाठवलेल्या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं खूप जास्त आनंद होईल. (फोटो सौजन्य – istock)
Christmas 2025 : अंकांचा अनोखा योग! शतकातून एकदाच येणाऱ्या तारखेमुळे यंदाचा ख्रिसमस ठरतोय खास
“नाताळच्या पवित्र दिवशी
तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि प्रेम येवो.
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!”
“ख्रिसमसच्या या आनंदी क्षणी
कुटुंबाच्या सहवासात गोड क्षण लाभो,
घरात नेहमी हसू, समाधान आणि समृद्धी नांदो.
नाताळच्या खूप खूप शुभेच्छा!”
“मैत्रीच्या नात्यातला गोडवा
ख्रिसमसच्या केकसारखा कायम राहो,
आनंद, धमाल आणि आठवणींचा सण साजरा करूया.
मित्रा, ख्रिसमसच्या शुभेच्छा!”
“थंडीच्या या दिवसांत
तुझ्या प्रेमाची ऊब मिळो,
प्रत्येक क्षण आनंदाने उजळो.
नाताळच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
“थंडीच्या या दिवसांत
तुझ्या प्रेमाची ऊब मिळो,
प्रत्येक क्षण आनंदाने उजळो.
नाताळच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
सगळा आनंद, सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य हे आपल्याला मिळो दे…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रभू येशूचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहो,
सुख, शांती आणि प्रेमाने तुमचे जीवन भरून जावो.
मेरी ख्रिसमस आणि नाताळच्या शुभेच्छा!
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला
विनंती आमची येशूला,
सौख्य समृध्दी लाभो तुम्हाला !
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..
क्रिसमस ट्री प्रमाने तुमचे जीवन निरोगी आणि कायम बहरलेले असो हीच प्रार्थना..
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मदर मेरीच्या पोटी जन्मला येशू बाळ,
आनंद दिला जगाला, साजरा होतोय नाताळ
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा !
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार,
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हालाही आनंदाचा जावो हा ख्रिसमसचा सण वारंवार !
नाताळाचा सण,
सुखाची उधळण !
मेरी ख्रिसमस !
तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा !
आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा !
Christmas 2025 : पांढरी दाढी आणि लाल कपडे सांताक्लॉज असाच का असतो ? तुम्हाला याचं कारण माहितेय का ?
तुमच्या मनातील साऱ्या इच्छा
हातोहात पूर्ण व्हाव्यात !
सारी दुःख आणि वेदना
रातोरात सरून जाव्यात !
हिरवगारं असावं जीवन तुमचं
क्रिसमसच्या वृक्षा सारखं
चमकाव नशीब असं
आकाशातील ताऱ्यां सारखं !!
सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा