(फोटो सौजन्य – skillastro)
Christmas 2025 : ख्रिसमसला असं काय गिफ्ट करावं ज्याला पाहताच मन …
२५/१२/२५ ही तारीख विशेष का?
२५ डिसेंबरला येशु ख्रिस्तांचा वाढदिवस जगभर साजरा केला जातो. यंदाही सगळीकडे खिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र नेहमीप्रमाणे ख्रिसमसच्या परंपरा, सणाचा उत्साह, कुटुंबियांची भेट आणि सजावट हे सर्व जसंच्या तसं असलं तरी, बंदा अंकांचा खेळ लोकांना वेगळाच वाटतोय, यंदा ख्रिसमसची तारीख २५/१२/२५/असून दिवस, महिना आणि वर्ष या तिन्ही ठिकाणी २५ हा अंक दिसत असल्यामुळे या दिवसाला एक अनोखी ओळख मिळाली आहे. कारण अशी नंबर्सची अलाईनमेंट १०० वर्षांत एकदाच पाहायला मिळते, याआधी ही तारिख १९२५ मध्ये आली होती आणि त्यानंतरची तारिख २१२५ पर्यंत दिसणार नाही. म्हणूनच २५/१२/२५ ही तारिख शतकात एकदाच येणारी’ मानली जाते. सोशल मीडियावर याची चर्चा वाढली असून अनेकजण या तारखेची नोंद खास पद्धतींने करत आहेत.
ऐतिहासिक दृष्टीने ‘विशेष तारखा’
याआधी सुद्धा अशा पद्धतीच्या तारखा होऊन गेल्या आहेत. ११/११/११ किवा ०२/०२/२०२२ अशा तारखांच्या दिवशी काही खास आणि विशेष नसलं तरी त्या तारखांचा नंबर्सचा वेगळेपण लक्षात राहण्यासारखं आहे. तशीच २५/१२/२५ ही तारिखदेखील असाच एक कैलेंडर ट्रिव्हिया आहे, जो शंभर वर्षात एकदाच आपल्या वाट्याला येतो.
Christmas 2025 : पांढरी दाढी आणि लाल कपडे सांताक्लॉज असाच का असतो …
अंकशास्त्र आणि सांस्कृतिक दृष्टिकोन
अनेक संस्कृतीमध्ये पुन्हा पुन्हा येत असलेल्या तारखा ‘लकी’ किंवा ‘विशिष्ट अर्थ असलेल्या मानल्या जातात. ख्रिसमस हा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस असल्यामुळे अंकांच्या या योगायोगाला आणखी थोडंसे महत्त्व प्राप्त झाले आहे. काहींसाठी हा सममितीचा आनंद आहे तर काहींसाठी एक लक्षात राहणारा दिवस आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






