दिवसाची सुरुवात आनंददायी होण्यासाठी प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा
झोपेतून उठल्यानंतर संपूर्ण दिवस आनंदात जावा यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले जातात. व्यायाम, योगासने आणि निसर्गाच्या सानिध्यात मॉर्निंग वॉक केल्यानंतर खूप आनंदी आणि प्रसन्न वाटते. याशिवाय अनेकांना सकाळी उठल्यानंतर पुस्तक वाचायला खूप जास्त आवडते. सकाळी वाचलेले विचार किंवा शब्द संपूर्ण दिवस आनंदात घालवण्यासाठी प्रेरणा देतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने दिलेल्या शुभेच्छा किंवा सुंदर मेसेज वाचून दिवसाची सुरुवात झाली तर मनाला सुद्धा प्रसन्न वाटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दिवसाची सुरुवात आनंददायी होण्यासाठी लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड संदेश सांगणार आहोत. हे नक्की वाचा.(फोटो सौजन्य – istock)
आपल्या प्रामाणिकतेसाठी ओळखलं जात भारतातील हे गाव, इथे घरांना ना कुलूप, ना चोरी होण्याची भीती
जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बँलन्स
पुरेसा असेल तर सुखाचा चेक
कधीच बाउंस होणार नाही.
शुभ सकाळ!
अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही,
पण पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो.
विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही,
पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो.
आपल्याला पंख पाहीजे म्हणून कधीच उडावे लागत नाही,
पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात.
काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही,
पण नाव कमावण्यासाठी मात्र काम करावेच लागते.
आपला दिवस आनंदात जावो.
शिकण्यासाठी आवश्यक आहे एकाग्रता, एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष,
लक्ष केंद्रित करून आपण इंद्रियावर संयम ठेऊन आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो
शुभ सकाळ
आयुष्याच्या चित्रपटाला
Once more नाही.
हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला
Download करता येत नाही.
नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला
Delete ही करता येत नाही .
कारण हा रोजचा तोच-तो असणारा
Reality show नाही.
म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण
Life हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. .
शुभ प्रभात
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
वडील देव आहेत आईची माया
धरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थान
आभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला
आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही
परंतु एक आई वडीलच असे आहेत की,
जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही
पुढे गेलेले पाहून आनंदी होतात
शुभ सकाळ
जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. !!
शुभ सकाळ
थंडी क्षणाची गारवा कायमचा
ओळख क्षणाची पण आपुलकी कायमची
भेट क्षणाची पण नाती आयुष्यभरची
सहवास क्षणाची पण ओढ कायमची हीच खरी नाती माणूसकीची
सकाळच्या सुंदर शुभेच्छा
लिहल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही
तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे मनही जुळत नाही.
”शुभ सकाळ ”
कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो.
”शुभ सकाळ ”
डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
|| शुभ सकाळ ||
आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा
धन-दौलत कोण कोणाला देत नसत
फक्त माणुसकी जपत रहा
प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा
तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन.
स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,
कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.
शुभ सकाळ
आपण जे देतो ते आपल्याकडे
परत येतं त्यामुळे चांगलं द्या,
चांगलच मिळेल.
शुभ सकाळ.
सोन्याचा साठा करुन मिळालेल्या
श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारखा सोन्याहून
मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत…
शुभ सकाळ
जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!
शुभ सकाळ!
भारताच्या या मंदिरात स्वयं प्रकट झाले होते भगवान गणेश; काय आहे उलट्या स्वस्तिकाची परंपरा, जाणून घ्या
सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत.
शुभ सकाळ!