श्लोका मेहताचा मेहंदी लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचे सोहळे गेले वर्षभर चालू आहेत आणि आता लग्नघटिका समीप आली आहे. अनंत – राधिकाच्या लग्नातील त्यांच्या स्वतःच्या लुकशिवाय अंबानी घराण्यातील सर्वांचेच लुक सध्या चर्चेत आहेत. मोठी जाऊबाई श्लोका मेहता अंबानीचे लुकही सध्या व्हायरल होत आहेत.
नुकताच राधिका आणि अनंतचा मेहंदी सोहळा संपन्न झाला. यावेळी नेहमीप्रमाणे पूर्ण बॉलीवूड, राजकारणी सर्वांची सोहळ्यात ‘अँटिलिया’ मध्ये उपस्थिती लागली होती. मात्र यावेळीदेखील श्लोकाने आपल्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पारंपरिक गोल्डन साडी आणि सोन्याच्या दागिन्यात श्लोकाचा लुक अत्यंत मनमोहक दिसला. पाहा श्लोकाचा हा क्लासी लुक (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
गोल्डन सिल्क साडी
श्लोका मेहताची गोल्डन साडी
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या मेहंदी समारंभासाठी श्लोका मेहताला तिची बहीण दिया मेहता जटियाने स्टाईल करत सजवले होते आणि आपल्या सोशल मीडियावर फोटोही पोस्ट केले. श्लोकाने यावेळी डिझाईनर मसाबा गुप्ताच्या ‘हाऊस ऑफ मसाबा’ या लेबलवरून बॉर्डरवर हृदयाच्या आकाराची जरी वर्क असलेली गोल्डन टोन्ड सिल्क साडी यावेळी नेसली होती.
ग्रीन टोन्ड दुपट्टा
श्लोकाचा मेहंदी सोहळ्यासाठी खास लुक
या गोल्डन सिल्क साडीसह श्लोकाने हाफ स्लीव्ह्ज गोल्डन ब्लाउज आणि पोपटी ग्रीन टोन्ड दुपट्ट्याने स्टाइल केले होते. एका बाजूला पोपटी गोल्डन जरी बॉर्डर असणारा हा दुपट्टा मेहंदी सोहळ्यासाठी परफेक्ट दिसून येत आहे. तर श्लोकाचे सौंदर्य या साडीमध्ये अधिक खुलून आले आहे.
आईच्या आईचे अर्थात आजीचे दागिने
श्लोकाने घातले आजीचे दागिने
ॲक्सेसरीजबद्दल बोलायचे झाले तर श्लोकाने तिच्या आजीचे सोन्याचे दागिने यावेळी निवडले होते. सुंदर मटार स्टाईल गोल्डन नेकपीस घातला होता ज्यासह मॅचिंग कानातले आणि मांग टिकादेखील तिने लावला होता. तिचे हे पारंपरिक कानातले या साडीसह परफेक्ट मॅच होत असून कोणत्याही लग्नासाठी तुम्ही असा लुक कॅरी करू शकता. यासह तिने मंगळसूत्रही कॅरी केले आहे.
वेव्ही कर्ल हेअर लुक
श्लोकाची हेअरस्टाईल
श्लोकाने यावेळी केसांना वेव्ही कर्ल लुक दिलाय. ब्राऊनिश हायलाईट असणारे श्लोकाचे केस यासह परफेक्ट मॅच करत आहेत. गोल्डन साडीसह तिचा हा वेव्ही हेअरस्टाईल लुक अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतोय. तर समोरून तिने केस स्ट्रेट ठेवले असून भांग पाडत त्यात मांगटिक सजवला आहे.
न्यूड मेकअप लुक
श्लोकाचा ओव्हरऑल मेहंदी सोहळ्यासाठी लुक
श्लोकाने यावेळी न्यूड ब्राऊनिश मेकअप लुक ठेवलाय. बेसिक फाऊंडेशन, आयलायनर, काजळ आणि मस्कारा लावत तिने त्यासह लहान आयलॅशेस जोडले आहेत. तर डोळ्यांना ब्राऊनिश शेडचे आयशॅडो लावले आहे. न्यूड ब्राऊन शेड लिपस्टिक ओठांना लावत तिने मेकअप पूर्ण केलाय. तर कपाळावर लहानशी टिकलीही तिने लावली आहे.