फोटो सौैजन्य - Social Media
दारूचं सेवन आरोग्यास हानिकारक आहे, हे तर आपण सगळेच जाणतो. पण हे हानिकारकतेचं प्रमाण आणखीनच वाढतं, जेव्हा दारू चुकीच्या ग्लासमध्ये प्यायली जाते. सध्या विविध समारंभ, पार्ट्यांमध्ये किंवा बाहेरच्या कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या ग्लास वापरण्याची प्रथा वाढली आहे. तर काहीजण घरी असताना स्टीलच्या ग्लासमध्ये दारू घेतात. पण या दोघांमध्ये कोणता पर्याय आरोग्यासाठी योग्य आहे? चला समजून घेऊया.
प्लास्टिकच्या ग्लासमधून दारू पिणं का धोकादायक आहे?
बहुतेक प्लास्टिकचे ग्लास एकदाच वापरण्यासाठी बनवलेले असतात. विशेषतः स्वस्त आणि कमी दर्जाच्या प्लास्टिकमध्ये BPA (Bisphenol A), फ्थैलेट्स यांसारखे रसायने असतात. हे रसायने दारूमध्ये असणाऱ्या अल्कोहोलच्या संपर्कात आल्यावर प्लास्टिकमधून बाहेर पडून द्रवामध्ये मिसळतात.
दारू एक प्रकारचा सॉल्व्हेंट (विलायक) असल्यामुळे हे विषारी घटक शरीरात सहज पोहोचतात. यामुळे हार्मोनल असंतुलन, प्रजनन क्षमता कमी होते, यकृताचे (लिव्हरचे) नुकसान, कॅन्सरचा धोका वाढतो तसेच अन्य दीर्घकालीन आजार होण्याचे शक्यता वाढतात. शिवाय प्लास्टिकमधून सुटणारे मायक्रोप्लास्टिक पार्टिकल्स शरीरात साठू शकतात, जे पचनसंस्थेपासून ते मस्तिष्कापर्यंत नकारात्मक परिणाम करू शकतात.
स्टीलच्या ग्लासमधून दारू पिणं सुरक्षित असतं का?
स्टेनलेस स्टील ही एक नॉन-रिऍक्टिव्ह धातू आहे. म्हणजे ती दारू किंवा इतर अॅसिडिक पदार्थांशी रासायनिक प्रतिक्रिया करत नाही. त्यामुळे स्टीलच्या ग्लासमधून दारू पिल्यास कोणतेही विषारी घटक मिसळत नाहीत.
हो, काही लोकांना स्टीलमध्ये दारू घेतल्यावर थोडासा चव बदलल्यासारखा वाटू शकतो. पण तो फक्त चवचा विषय आहे, आरोग्याचा नाही. स्वच्छ आणि गंज न लागलेला स्टील ग्लास वापरल्यास तो पर्यावरणासाठीही फायदेशीर ठरतो, कारण तो पुन्हा पुन्हा वापरता येतो. आरोग्याच्या दृष्टीने स्टीलचा ग्लास हा प्लास्टिकच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे. प्लास्टिकमध्ये दारू घेतल्यास रासायनिक घटक मिसळण्याची शक्यता असते. तर स्टीलमध्ये ती शक्यता जवळपास नाहीच.