Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan 2025 : व्रतासाठी परिपूर्ण कॉम्बिनेशन; यंदाच्या उपवासाला बनवा राजगिऱ्याची पुरी अन् बटाट्याची उसळ

उपवासातही स्वादाचा विसर नको! श्रावण लवकरच सुरु होणार आहे अशात तुम्हीही श्रावणी सोमवारा उपवास करण्याचा विचार केला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 15, 2025 | 10:29 AM
Shravan 2025 : व्रतासाठी परिपूर्ण कॉम्बिनेशन; यंदाच्या उपवासाला बनवा राजगिऱ्याची पुरी अन् बटाट्याची उसळ

Shravan 2025 : व्रतासाठी परिपूर्ण कॉम्बिनेशन; यंदाच्या उपवासाला बनवा राजगिऱ्याची पुरी अन् बटाट्याची उसळ

Follow Us
Follow Us:

श्रावण महिना हा हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना, हा महिना पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित केला जातो. यातही श्रावणी सोमवाराला जरा जास्त महत्त्व! या दिवशी अनेकांचा उपवास असतो. श्रावण हा महिना एकंदरीतच उपवास, पूजा आणि धार्मिक कार्यांसाठी खास मानला जातो. अशात आज आम्ही तुमच्यासाठी उपवासाची एक खास आणि चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत जी पोटासोबतच तुमचं मनही भरेल.

नाश्त्यात हवा आहे हेल्दी पदार्थ! सोप्या पद्धतीमध्ये बनवा क्रिमी पालक स्मूदी, नोट करा रेसिपी

उपवासाच्या दिवशी काहीतरी चविष्ट, पोटभरणारं आणि झटपट बनणारं खाणं हवं असतं. अशा वेळी राजगिराची पुरी आणि बटाट्याची उसळ हे परिपूर्ण कॉम्बिनेशन आहे. राजगिरा हे पचायला हलकं आणि उपवासासाठी परिपूर्ण पीठ आहे. त्यात बनवलेल्या पुऱ्या कुरकुरीत आणि चविष्ट लागतात. त्यासोबत गरमागरम बटाट्याची उसळ ही खरी मेजवानी वाटते. चला तर मग पाहुया ही उपवासासाठी योग्य अशी पारंपरिक मराठी रेसिपी.

राजगिऱ्याच्या पुरीचे साहित्य

  • राजगिरा पीठ – १ कप
  • मीठ – चवीनुसार
  • गूळ
  • तळण्यासाठी तेल
  • दूध – १/२ कप
कृती
  • राजगिऱ्याची पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका परातीत राजगिऱ्याचे पीठ घ्या
  • त्यांनतर यात चिमूटभर मीठ, गुळाचे बारीक तुकडे करून घाला आणि अर्धा कप दूध दूध घालून हे पीठ मळून घ्या, आवश्यक असल्यास तुम्ही हे पीठ मळताना पाण्याचा वापर करू शकता
  • पीठ हे जरा घट्टसर बनवावं म्हणजे पुऱ्या छान बनतात
  • आता तयार पीठ १० मिनिटं झाकून ठेवा आणि मग याचे लहान गोळे करा
  • लक्षात घ्या ही पुरी लाटायची नाही तर थापायची आहे अशात एक प्लास्टिक पेपर घ्या आणि त्याच्या एका बाजूस तेल लावा
  • मग यावर पिठाचा गोळा ठेवून पुन्हा वरून आणखीन एक प्लास्टिक पेपर ठेवा आणि हाताने अथवा लाटण्याने पुरी लाटून किंवा थापून घ्या
  • तयार पुरी गरम तेलात मध्यम आचेवर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या
श्रावणातील पहिल्या सोमवारी नैवेद्यासाठी झटपट बनवा साबुदाणा रबडी, दिवसभराचा थकवा होईल दूर

बटाट्याची उपवासाची उसळ साहित्य

  • उकडलेले बटाटे – २ मध्यम, चिरलेले
  • हिरवी मिरची पेस्ट – १ टीस्पून
  • शेंगदाणा कूट – २ टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • लिंबाचा रस – १ टीस्पून
  • साजूक तूप / तेल – १ टेबलस्पून
कृती
  • बटाट्याची उसळ बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात मिरची पेस्ट घाला.
  • मिरची पेस्ट छान परतून झाली की मग त्यात उकडलेले बटाटे बारीक कापून घाला.
  • वरून झाकण ठेवा आणि हे बटाटे २–३ मिनिटं मंद आचेवर शिजू द्यावे.
  • यांनतर यात शेंगदाण्याचा कूट घाला आणि पुन्हा झाकण ठेवून २–३ मिनिटं मंद आचेवर शिजू द्या.
  • शेवटी लिंबाचा रस टाकून मिक्स करा आणि तयार उसळ खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • राजगिरा पुरी आणि बटाट्याची उसळ गरम गरम सर्व्ह करा. त्यासोबत साखर, लिंबू किंवा दही दिल्यास चव आणखीनच वाढते.
  • ही रेसिपी उपवासात पोटभर आणि मन भरून तृप्त करणारी आहे!

Web Title: Shravan 2025 shravan 2025 perfect combination for fasting make cripsy rajgira puri and batatyachi usal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 10:29 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Shravan 2025
  • upvas food

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.