Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश

Heart Shape Cookies Recipe : नेहमी नेहमी विकतच्या भेटवस्तू कशाला? यंदा आपल्या पार्टनरला व्हॅलेंटाईन निमित्त गिफ्ट करा घरी बनवलेले टेस्टी, खुशखुशीत कुकीज. आपल्या हातांनी बनवलेली ही डिश तुमच्या जोडीदाराला नक्कीच आवडेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 14, 2026 | 09:35 AM
Valentine’s Day 2026 : 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा 'हार्ट शेप कुकीज', पाहूनच होईल खुश

Valentine’s Day 2026 : 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा 'हार्ट शेप कुकीज', पाहूनच होईल खुश

Follow Us
Follow Us:
  • १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.
  • या दिवसानिमित्त कपल्स आपल्या पार्टनरला सुंदर भेटवस्तू गिफ्ट करतात.
  • तुम्हाला काही हटके गिफ्ट आपल्या जोडीदाराला द्यायचे असेल तर घरीच त्याच्यासाठी कुकीज बनवा.
व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम, आपुलकी आणि छोट्या-छोट्या गोड सरप्राइजेसचा दिवस. या दिवशी महागडी गिफ्ट्स देण्यापेक्षा स्वतःच्या हाताने काहीतरी खास बनवून देणं जास्त मनाला भिडणारं असतं. घरच्या घरी तयार केलेल्या मिनी हार्ट शेप कुकीज केवळ दिसायला सुंदर नसतात, तर त्यात आपली भावना आणि प्रेमही मिसळलेलं असतं.
या कुकीज खास बनतात कारण त्यांचा आकार हृदयासारखा असतो आणि त्यांची चव खमंग, बटरयुक्त आणि हलकीशी कुरकुरीत असते.

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

चहा, कॉफी किंवा गरम दुधासोबत या कुकीज खूप छान लागतात. तुम्ही या कुकीजवर हलकी आयसिंग, चॉकलेट ड्रिझल किंवा रंगीत स्प्रिंकल्स घालून त्यांना अजून आकर्षक बनवू शकता. विशेष म्हणजे ही रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये तयार होते. जर तुम्हाला आपल्या जोडीदारासाठी, मित्र-मैत्रिणीसाठी किंवा कुटुंबासाठी काहीतरी गोड आणि खास बनवायचं असेल, तर ही मिनी हार्ट शेप कुकीज उत्तम पर्याय आहे. चला तर मग पाहूया ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी.

साहित्य

  • १ कप मैदा
  • १/२ कप पिठीसाखर
  • १/२ कप बटर
  • १/२ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • १-२ टेबलस्पून दूध
  • चिमूटभर मीठ
1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात बटर आणि पिठीसाखर एकत्र घेऊन हलक्या हाताने फेटून घ्या, जोपर्यंत मिश्रण हलकं आणि क्रीमी होत नाही.
  • त्यात व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा एकदा नीट मिसळा.
  • आता मैदा आणि चिमूटभर मीठ चाळून या मिश्रणात घाला आणि हलक्या हाताने एकत्र करा.
  • आवश्यक असल्यास १-२ टेबलस्पून दूध घालून मऊसर पीठ तयार करा.
  • तयार पीठ १५-२० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून सेट होऊ द्या.
  • नंतर पीठ लाटून हार्ट शेप कटरने लहान हार्टच्या आकाराच्या कुकीज कापून घ्या.
  • बेकिंग ट्रेवर बटर पेपर ठेवून त्यावर या कुकीज ठेवा.
  • आधीच १८०°C वर प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये १०-१२ मिनिटे किंवा कडा हलक्या सोनेरी होईपर्यंत बेक करा.
  • कुकीज थंड झाल्यावर हवे असल्यास त्यावर चॉकलेट किंवा आयसिंगने सजावट करा.
  • गरमागरम आणि कुरकुरीत मिनी हार्ट शेप कुकीज तयार आहेत.
  • या गोड कुकीजने तुमचा व्हॅलेंटाईन डे नक्कीच अधिक खास आणि संस्मरणीय बनेल.
 

Web Title: Valentines day 2026 make heart shaped cookies at home for your partner recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Valentine Day
  • valentine day gift

संबंधित बातम्या

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा
1

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
2

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर
3

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा
4

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.