Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते. भगवा

Sabudana kheer Recipe : भगवान शंकराला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ फार प्रिय आहेत. त्याच्या पूजेत खिरीचा प्रामुख्याने समावेश केला जातो. अशात यंदाच्या शिवरात्रीनिमित्त घरी नक्की बनवा उपवासाची साबुदाणा खीर.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 15, 2026 | 09:31 AM
Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची 'ही' आवडीची डिश बनवायला विसरू नका

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची 'ही' आवडीची डिश बनवायला विसरू नका

Follow Us
Follow Us:
  • साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते.
  • भगवान शिवाला खीर फार आवडते.
  • अशात शिवरात्रीच्या उपवासात तुम्ही घरी ही खीर बनवू शकता.
हिंदू धर्मात भगवान शंकर यांना अत्यंत साधेपणा आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. त्यांना बेलपत्र, धतूरा, दूध आणि साधे सात्त्विक नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. विशेषतः महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात आणि भगवान शंकरांची भक्तीभावाने पूजा करतात. या दिवशी उपवासातील पदार्थांमध्ये साबुदाण्याला विशेष स्थान आहे.

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’

साबुदाणा हा हलका, पचायला सोपा आणि ऊर्जा देणारा असल्यामुळे उपवासासाठी योग्य मानला जातो. त्यापासून बनवलेली खीर म्हणजे गोड, मऊसर आणि समाधान देणारा प्रसाद. दूध, साखर आणि वेलचीच्या सुगंधाने तयार होणारी ही खीर नैवेद्य म्हणून अर्पण केल्यानंतर घरातील सर्वांना प्रसाद म्हणून दिली जाते. साध्या साहित्यांतून तयार होणारी ही साबुदाणा खीर भक्ती आणि चवीचा सुंदर संगम आहे. चला तर मग शिवरात्रीनिमित्त घरी साबुदाण्याची खीर कशी बनवायची ते जाणून घेऊया.

साहित्य

  • १/२ कप साबुदाणा
  • १ लिटर दूध
  • १/२ कप साखर (चवीनुसार)
  • १/४ टीस्पून वेलची पूड
  • ८-१० काजू (चिरलेले)
  • ८-१० बदाम (चिरलेले)
  • १ टेबलस्पून तूप
  • काही केशर काड्या (ऑप्शनल)
उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम  साबुदाणा स्वच्छ धुवून ३-४ तास पाण्यात भिजत ठेवा. तो फुलून मऊ झाल्यावर अतिरिक्त पाणी काढून टाका.
  • जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवा. मंद आचेवर ते हलवत राहा, जेणेकरून दूध तळाला लागू नये.
  • उकळत्या दुधात भिजवलेला साबुदाणा घाला. मध्यम आचेवर सतत हलवत शिजवा. साबुदाणा पारदर्शक दिसू लागला की तो शिजला आहे
  • आता त्यात साखर घाला आणि चांगले मिसळा. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत खीर हलवत राहा.
  • वेलची पूड आणि केशर घालून खीरला सुगंध द्या.
  • लहान कढईत तूप गरम करून काजू-बदाम हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या आणि खिरीत मिसळा.
  • खीर थोडी घट्टसर झाली की गॅस बंद करा. गरम किंवा कोमट अवस्थेत भगवान शंकरांना नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि नंतर प्रसाद म्हणून सर्वांना वाटा.
  • ही साबुदाणा खीर केवळ उपवासासाठीच नव्हे, तर कोणत्याही शुभ प्रसंगी बनवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. साधी,
  • सात्त्विक आणि स्वादिष्ट अशी ही खीर भक्तीभाव अधिक गोड करते.
 

Web Title: Mahashivratri 2026 know how to make sabudana kheer at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • Mahashivratri
  • marathi recipe
  • upvas food

संबंधित बातम्या

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
1

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
3

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
4

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.