फोटो सौजन्य: iStock
आपल्या आवडीचे पदार्थ खाण्यास कोणाला नाही आवडत. कित्येक जणांच्या डोळ्यांसमोर त्यांचा आवडीचा पदार्थ असला की ते पोट भरेस्तोवर खात असतात. यामुळे पोट तर भरतेच मन त्याहूनही दुप्पट भरते. पण दुसरीकडे काही असे देखील लोक आहेत जे एकाच वेळी सगळे पदार्थ खात नाही तर थोड्या थोड्या वेळाने खात असतात.
तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी निरोगी अन्न खाणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच काम करण्याची ताकद मिळते. आजकालच्या या धावपळीच्या जीवनात लोकांना व्यवस्थित बसून जेवायलाही वेळ मिळत नाही. कामातून मोकळा वेळ नसल्याने काही जण तर घाईघाईत जेवतात आणि तसेच ऑफिसला किंवा अन्य ठिकाणी जातात.
‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी! कधीच उद्भवणार नाही केसांसंबधित समस्या, केसांची होईल झपाट्याने वाढ
काही लोक दिवसातून अनेक वेळा कमी प्रमाणात खातात, तर काहींना एकाच वेळी जास्त जेवण करायला आवडते. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की खाण्याची कोणती पद्धत अधिक आरोग्यदायी आहे. चला जाणून घेऊया, आहारतज्ञांचे यावर काय मत आहे.
कमी पण वारंवार खाल्ल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म नेहमीच सक्रिय राहते. वारंवार खाल्ल्याने शरीराला पचायला कमी वेळ मिळतो, त्यामुळे उर्जेची पातळी कायम राहते आणि मेटाबॉलिज्म देखील सक्रिय राहतो. यामुळे कॅलरीज चांगल्या प्रकारे बर्न होण्यास मदत होते आणि वजन कमी होते.
कमी खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखर अचानक वाढत नाही. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे.
थोड्या प्रमाणात वारंवार खाल्ल्याने शरीराच्या पचनसंस्थेला आराम मिळतो. तसेच शरीर अन्न चांगले पचवू शकतो. यामुळे मेटाबॉलिज्म देखील मजबूत राहतो आणि शरीर सक्रिय राहते.
पाण्यात एक चमचा हा पदार्थ मिसळून प्या, झोपेतही वितळेल चरबी; अंथरुणात जाताच येईल शांत झोप
थोड्या थोड्या प्रमाणात खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते. यामुळे अति खाणे टाळता येते आणि लठ्ठपणासारख्या समस्या उद्भवत नाहीत. जेव्हा आहारात फक्त निरोगी पदार्थांचा समावेश केला जातो तेव्हाच ही पद्धत फायदेशीर ठरते.
जे लोक पोटभर जेवण करतात ते दिवसातून दोन किंवा तीन वेळा खातात. दिवसभर काम करणारे लोक बहुतेकदा ही पद्धत अवलंबतात जेणेकरून त्यांच्या शरीराची ऊर्जा टिकून राहते आणि त्यांचा वेळ देखील वाचतो.
जे लोक एकाच वेळी जास्त खातात ते वारंवार जेवत नाहीत, यामुळे त्यांच्या पचनसंस्थेला अन्न पचवण्यासाठी जास्त वेळ मिळतो आणि त्यांचे पोटही निरोगी राहते.
१. एकाच वेळी जास्त अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येतो आणि त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
२. जास्त खाल्ल्यानंतर रक्तातील साखर अचानक वाढू शकते.
३. जास्त खाणाऱ्या लोकांचे वजन लवकर वाढते.
पोषणतज्ञ आणि आहारतज्ञांच्या मते, कमी पण वारंवार खाणे हा अधिक फायदेशीर दृष्टिकोन आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही थोडे थोडे जेवण करून भूक आणि कॅलरीज दोन्ही नियंत्रित करू शकता. लहान जेवणामुळे मेटाबॉलिज्म वाढते, ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते. म्हणूनच जे लोक अशा प्रकारे अन्न खातात ते अधिक निरोगी आणि तंदुरुस्त राहतात.