'या' पद्धतीने घ्या केसांची काळजी:
लांबलचक सुंदर केसांसाठी सतत महिला काहींना काही उपाय करत असतात. पण मात्र नेहमी मेहुणी केसांच्या वाढीसाठी केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. खराब झालेले केस पुन्हा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. केसांच्या निरोगी वाढीसाठी केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. केसांच्या वाढीसाठी केसांना वरून पोषण देण्याऐवजी केसांना आतून पोषण देणे आवश्यक आहे. केसांच्या वाढीसाठी केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा केस गळून पातळ होतात. आज आम्ही तुम्हाला लांबलचक आणि निरोगी केसांसाठी कशा प्रकारे केसांची काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
मागील अनेक वर्षांपासून केसांच्या निरोगी वाढीसाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर केला जात आहे. खोबऱ्याचे तेल केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. आवळ्याच्या तेलात विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे केसांची वाढ भरभर होते. रात्री झोपताना वाटीमध्ये २ चमचा खोबऱ्याचे तेल घेऊन त्यात आवळ्याचे तेल टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले तेल केसांच्या मुळांना लावून हलक्या हातांने मसाज करून घ्या. मसाज करून झाल्यानंतर केस तसेच ठेवून नंतर सकाळी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
शरीरात विटामिन ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात विटामिन युक्त पदार्थांचे सेवन करावे. तसेच हल्ली बाजारात अनेक प्रोटीन ट्रीटमेंट उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे केसांना प्रोटीन मिळून केसांची वाढ चांगली होते. केसांच्या वाढीसाठी तुम्ही बायोटीन सप्लिमेंट्स घेऊ शकता. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतील. यासाठी आहारात सुका मेवा, पालेभाज्या इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
केसांच्या वाढीसाठी ३ महिन्यातून एकदा केस ट्रिम करणे आवश्यक आहे. केस ट्रिम केल्यामुळे केसांचे फाटे निघून जातात आणि केसांची वाढ होते. केसांना फाटे फुटल्यानंतर केसांची वाढ थांबते. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी केस ट्रिम करून घ्यावी. 6 ते 8 आठवड्यांनी केस ट्रिम करत राहणे केसांच्या वाढीसाठी अतिशय चांगले आहे.
केसांच्या वाढीसाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी कांद्याच्या रसाचा वापर करावा. यामुळे केसांची मूळ स्वच्छ होतात. खोबरेल तेलात कांद्याचा रस मिक्स करून लावल्यास केसांना अनेक फायदे होतील आणि केस वाढण्यास मदत होईल. कांद्याच्या रसात असलेले प्रोटीन केसांसाठी आवश्यक आहेत.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
निरोगी आरोग्य जगण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. यामुळे केसांची वाढ होते. केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही उपाय करतात. मात्र आहाराकडे योग्य लक्ष दिले जात नाही. असे न करता आहाराकडे योग्य लक्ष देऊन आहारात हिरव्या पालेभाज्या, विटामिन ए, सी, ई, आणि आयर्नयुक्त पदार्थांचे सेवन करावे.