अध्यात्मिक गुरू रवीशंकर यांचे प्रेमाबाबत कोट्स (फोटो सौजन्य - iStock/Instagram)
सध्याच्या काळात प्रेम आणि जीवनाचा अर्थ बदलत आहे, ज्यामुळे वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंधांचे व्यवस्थापन करणे कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत भावनिक बिघाड तसंच त्यामुळे येणारी निराशा आणि ताण ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी अशा १० गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुमच्या जीवनासाठी आणि प्रेमासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला प्रेम आणि आयुष्य यामध्ये संतुलन साधायचे असेल तर नक्की काय करायला हवे यासाठी तुम्ही हा लेख नक्कीच वाचायला हवा (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
Interesting Facts: जोडप्यांमध्ये वाढतेय DADT, ना प्रश्न ना उत्तर; या नात्यात का नाही संशय आणि भांडणं
श्री श्री रवीशंकर यांचे कोट्स
१. “प्रेम म्हणजे अपूर्णतेत परिपूर्णता पाहणे.”
खरे प्रेम अपूर्णता स्वीकारते आणि त्यांच्यामागील आत्म्याचा आदर करते. प्रेमामध्ये सगळं आपल्याला हवंय असं चालत नाही. तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचाही विचार करावा लागतो. अपूर्ण गोष्टीतही परिपूर्णता पहावी लागते.
२. “जीवन एक उत्सव आहे. तुमच्या अडचणींना तुमच्या आनंदावर सावली पडू देऊ नका.”
कठीण काळातही, तक्रारी आणि भीतीपेक्षा प्रेम आणि कृतज्ञता निवडा. भीती आणि तक्रारींमुळे तुमच्या प्रेमात दुरावा येऊ शकतो. मात्र विश्वास दाखवला आणि प्रेम दाखवले तर तुम्ही एकमेकांना सांभाळून घेऊ शकता
३. “क्षमा ही शहाण्या माणसाची मौल्यवान गोष्ट आहे.”
राग बाळगल्याने प्रेम विषारी बनते. क्षमा तुम्हाला सांत्वन आणि संबंध पुनर्संचयित करते. आपल्या जोडीदाराने चुका केल्यास त्याच उगाळत बसू नका. त्यांना माफ करा. मात्र अक्षम्य गुन्हा असेल आणि पुन्हा पुन्हा चूक होत असेल तर नक्कीच विचार करा
४. “तुम्हाला आव्हान देणाऱ्यांबद्दल कृतज्ञ रहा – ते तुम्हाला प्रगती करण्यासाठी मदत करतात.”
जाणीवपूर्वक पाहिले तर कठीण नातेसंबंध उत्तम आध्यात्मिक शिक्षक असू शकतात. अनेकदा आपल्या नात्यात येणारे चढउतार हे आव्हांनांचा सामना करतात आणि यातूनच आपण किती एकत्र राहू शकतो हे कळतं आणि नात्यात प्रगती होऊ शकते
५. “नात्याचे रहस्य म्हणजे जागा आणि स्वातंत्र्य देणे.”
निरोगी प्रेम दडपण आणत नाही, ते दोन्ही जोडीदारांना मुक्तपणे वाढू देते. एकमेकांना स्पेस द्या. मुक्तपणे जगू द्या. एकमेकांवर रोख जमवू नका, जेणेकरून नात्यात दुरावा येईल. स्वतंत्रपणे जगलात तर नातं अधिक चांगलं राहतं
६. “प्रेम ही भावना नाही; ते तुमचे स्वतःचे अस्तित्व आहे.”
खरे प्रेम क्षणिक भावनेपुरते मर्यादित नाही; ते तुम्ही कोण आहात याचे प्रतिबिंब आहे. प्रेमात तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचे आहे. आपल्याला जोडीदाराच्या ठिकाणी ठेऊन नेहमी विचार करा. भांडणं होणार नाहीत
७. “इतर लोकांच्या मतांसाठी फुटबॉल बनू नका.”
प्रेम आणि जीवनात, केंद्रित रहा. बाह्य आवाजांना तुमची आंतरिक शांती हिरावून घेऊ देऊ नका. लोकांचं न ऐकता आपलं मन काय सांगत आहे याची पर्वा करा आणि आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा
८. “आयुष्यात, खूप गंभीर होऊ नका. ते हलकेफुलके घ्या. अधिक हसा.”
हसऱ्या मनाचा दृष्टिकोन नातेसंबंधांमधील अनेक तणाव आणि गैरसमज दूर करू शकतो. नेहमी हसत रहा. सतत गंभीर राहण्याने नात्यात फूट पडू शकते. जितके आनंदी रहाल नातं अधिक टिकेल
९. “तुम्ही जितके जास्त प्रेम द्याल तितके ते तुमच्यात वाढते.”
प्रेम हे मर्यादित साधन नाही, ते एक स्नायू आहे जे वापराने मजबूत होते. तुम्ही तुमच्या जोडीदारावर जितके प्रेम कराल तितके ते तुम्हाला परत मिळेल हे लक्षात ठेवा. एकमेकांना जपा
१०. “तुमच्या जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न करू नका. बदल प्रतिकार आणतो. प्रेम परिवर्तन आणते.”
नातेसंबंधात खरा बदल नियंत्रणातून नव्हे तर करुणा आणि स्वीकृतीतून येतो. त्यामुळे तू असंच कर, तसंच कर या अपेक्षा न करता आपण आपल्या जोडीदाराच्या दृष्टीकोनातूनही विचार करावा.
श्री श्री रविशंकरांचा चमत्कारी मंत्र, तोंड न धुता करा 2 पदार्थांचे सेवन सगळे आजार होतील छुमंतर