stomach infection
उन्हाळा(Summer) आला की वेगवेगळे आजार सुरु होतात. लोकांना एकाच समस्येसाठी अनेक वेळा हॉस्पिटलला जावं लागतं. खाण्यापिण्यात थोडीशी गडबड झाली तर त्रास वाढू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात आपण आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.(Summer Problem)
खरंतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमीत कमी तेलकट आणि मसालेदार जेवण जेवायला हवं. कारण हेच स्टमक इन्फेक्शनचं सगळ्यात मोठं कारण आहे. उन्हाळ्यात पोटाच्या समस्यांपासून कशी सुटका करावी आणि पोट नीट राहण्यासाठी काय उपाय करता येतील, ते आपण जाणून घेऊयात.(Stomach Infection In Summer)
स्टमक इन्फेक्शन म्हणजे काय?
हेल्थ एक्स्पर्टच्या मते हा एक व्हायरसमुळे होणारा आजार आहे. याला वैद्यकीय भाषेत व्हायरल गेस्ट्रोएंट्रायटिससुद्धा म्हटलं जातं. या आजारामध्ये आतड्यांची सूज आणि जळजळ निर्माण होते. याच्यामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो. पचनशक्ती इतकी बिघडते की पाणीदेखील पचत नाही.
या समस्येची कारणं काय आहेत?
– गरजेपेक्षा जास्त प्रमाणात जेवण जेवल्याने ही समस्या निर्माण होते.
– अनहायजिनिक जेवणामुळे ही समस्या वाढते.
– चुकीच्या वेळी जेवल्यामुळे ही समस्या वाढते.
– खराब पाण्यामुळेही पोटाची समस्या वाढते.
-खराब किंवा शिळ्या अन्नाचं सेवन हे यामागचं महत्वाचं कारण आहे.
लक्षणं
स्टमक इन्फेक्शनचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे तुमच्या पोटाच्या आतड्यांमध्ये सूज येते. तुम्हाला उलटी, जुलाब आणि पोट ताणल्यासारखं वाटू लागतं. डोकेदुखी, चक्कर येणं इत्यादी समस्याही पाहायला मिळतात. जेव्हा तुम्हाला अशी लक्षणं दिसतील तेव्हा लवकरात लवकर डॉक्टरांना संपर्क करा.