फोटो सौजन्य - Social Media
शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले कि शरीराला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मुख्यतः सांधे दुखू लागतात. कधी कधी तर या त्रासाने उठणे बसनेही कठीण होते. या समस्यांपासून वाचण्यासाठी आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावे लागते. जर तुम्ही आधीच या समस्यांना बळी पडले आहात तर आपण आहारात कोणकोणते पदार्थ खातो? या गोष्टीवर लक्ष ठेवणे आवश्यक बनते. विशेषतः आहारात काही डाळींचे समावेश असणे, आरोग्यात युरिक ऍसिडविषयक आणखीन समस्या तयार करतात.
जेव्हा आहारामध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते तेव्हा युरिक ऍसिडच्या वाढण्याची शक्यताही खूप असते. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि प्युरीन असतात. फक्त डाळीचं नव्हे तर आणखीन असे काही कडधान्य आहेत ज्यांच्या सेवनाने युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते. यूरिक ऍसिड वाढल्यावर नक्की कोणत्या डाळी खाऊ नयेत? चला जाणून घेऊ.
मसूर डाळीमध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते. तसेच यात प्रथिने आणि पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. युरिक ऍसिडचा त्रास असलेल्या लोकांनी शक्यतो आहारात मसूर टाळावे. त्याचबरोबर हरभरा डाळ, राजमा आणि मूग खाणे शक्यतो टाळावे, कारण यामुळे युरिक ऍसिडचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकते.
काळ्या उडदाच्या डाळीमध्ये प्रथिने आणि प्युरीन मुबलक प्रमाणात असतात, जे युरिक ऍसिडच्या रुग्णांसाठी फायदेशीर नसते. याचे सेवन केल्यास युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जर तुम्हाला युरिक ॲसिडचा त्रास होत असेल तर काळ्या उडदाची डाळ खाऊ नका. तसेच इडली किंवा डोसा खात असाल तर खाऊ नका कारण त्यात काळे उडीद देखील वापरले जाते. त्याचबरोबर सोयाबीन खाणे देखील शक्यतो टाळावे. ज्या लोकांच्या शरीरात युरिक ऍसिड वाढले आहे त्यांनी चवळी खाणे टाळावे, कारण त्यात प्युरीन मुबलक प्रमाणात असते आणि ते खाल्ल्याने युरिक ॲसिड वाढते.