तणावामुळे पित्त वाढणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, दमा, रक्तदाब, मधुमेह इ. विकार होऊ शकतात. तसेच अति राग येणे, निरुत्साह, उदासीनता, निद्रानाश, विस्मरण, कशातच रस न वाटणे, सतत दु:खी रहाणे असे मानसिक त्रास होऊ शकतात. तणावग्रस्त व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते. ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही, स्वत: आनंदी राहू शकत नाही व इतरांनाही आनंद देऊ शकत नाही.
तणावाच्या दुष्परिणामांची दोन गटात विभागणी करता येते.
पित्ताचा विकार, भूक न लागणे, वजन कमी होणे, हृदयरोग, दमा, रक्तदाब, मधुमेह, यकृत / मूत्रपिंड आदींचे विकार, इ.
लगेच दमणे, अतिरिक्त राग येणे, विकृत व्यक्तीमत्त्व, निरुत्साह, उदासीनता, निद्रानाश, विस्मरण, भावनाविवशता, इ.
परिस्थिती कधीही बदलत नसते. त्यामुळे काही बदल आपल्याला स्वतःमध्ये घडवून आणावे लागतात. त्याची मानसिक तयारी करायला हवी.
ताण, सहन करण्यासाठी परिस्तिथी शी जुळवून घेणे गरजेचे असते.
ताणावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग, प्राणायम, मेडीटेशन अशा गोष्टींचा आधार घेणे गरजेचे आहे.
ताणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सभोवतालचे वातावरण बदलही खूप गरजेचे आहे. त्यासाठी आवडीच्या ठिकाणी फिरायला जाणे, काही दिवस राहणे आवश्यक आहे.