Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माहेश्वरी साड्यांची पारंपरिक हातमागावरील कलाकुसर आणि अप्रतिम बोहो शैलीतील ठशाची छपाई

Traditional Handloom Sarees: हातमागावर विणलेल्या माहेश्वरी साड्यांची ही उत्कृष्ट श्रेणी म्हणजे सर्जनशीलता, हातमाग नवकल्पना आणि प्रायोगिक अभिव्यक्तीचा उत्सव आहे. अशीच काही डिझाईन्स आपल्या वॉर्डरोबमध्ये हवी असतील तर नक्की वाचा.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 16, 2024 | 10:49 AM
माहेश्वरी साड्यांची पारंपरिक हातमागावरील कलाकुसर आणि अप्रतिम बोहो शैलीतील ठशाची छपाई
Follow Us
Close
Follow Us:

शाश्वत आणि नैतिक पद्धतींवर भर देताना पारंपरिक भारतीय हातमाग हस्तकलांना प्रोत्साहन देणारा ब्रॅंड Mrida च्या वतीने Bulbul Collection for Summer-Spring 2024 चे अनावरण करण्यात आले. जी निसर्ग आणि कापड तसेच हस्तकलेच्या कारागीर पद्धतींपासून प्रेरणा घेते आणि त्याद्वारे भारताच्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वस्त्राचा आदर जपते. 

भारतीय नारी आणि साडीची आवड नाही असं होऊच शकत नाही. आपल्या कपाटामध्ये भरभरून साड्या असतात आणि तुम्हाला जर पारंपरिक आणि आधुनिकतेचे मेळ हवा असेल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. या साड्यांचे कलेक्शन नक्की कसे आहे ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत.

साड्या ज्या वॉर्डरोबमध्ये असाव्या 

उत्कृष्ट प्रतीच्या सुती रेशमाने तयार केलेली, अतिशय तलम, वजनला हलकी, त्वचेसाठी अनुकूल अशी अनुभूती देणारी ही साडी तुम्हाला अधिक स्टायलिश बनवते आणि याशिवाय तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर घालते. ताजे आणि मातीशी मिळते-जुळते रंग, फिकट रंगसंगती आणि आकर्षक रंगछटांनी प्रेरणा घेऊन हे कलेक्शन बनविण्यात आले आहे. 

हेदेखील वाचा – राधिका मर्चंटचा मॅजेस्टिक प्रिन्सेस लुक, इंटरनेटवर व्हायरल फोटोजचा धुमाकूळ

ब्लॉक प्रिंट डिझाईन्स 

हाताने तयार केलेल्या ब्लॉक प्रिंटच्या स्वरूपात या साड्या नक्कीच तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी अथवा एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी आणि अगदी ऑफिसमधील मीटिंग्जसाठीही उपयुक्त ठरू शकतात. या जरी समर – स्प्रिंगसाठी तयारा करण्यात आल्या असल्या तरीही तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये याचा वापर नक्कीच करू शकता.  भारतीय हातमागाचा वारसा जतन करणे हाच याचा उद्देश आहे आणि अनोख्या शैलीने या साड्या तयार करण्यात आल्यामुळे तुम्हाला या नक्कीच आवडतील. 

पर्यावरणाला पूरक साडी 

या साड्या पर्यावरणाला पूरक अशा आहे. तर पर्यावरणाशी संबंधित डिझाईन या साड्यांचे करण्यात आले आहे. तसंच दिसायला अत्यंत क्लासी आणि एलिगंट अशा या साड्या नक्कीच तुम्हाला आवडतील. या साड्यांचे रंग अत्यंत सुखद असून त्याला क्लासी टच देण्यात आला आहे. Mrida Sarees च्या सह-संस्थापिका श्रिया नागी यांनी सांगितले की, हे नाव वडिलांनी दिले असून आपले टोपणनाव आहे आणि हे कलेक्शन बालपणीच्या प्रेमळ आठवणींना जपण्यासाठी काढण्यात आले आहे. 

हेदेखील वाचा – नीता, ईशा अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग लुक झाले व्हायरल, डोळे दिपवणारे सौंदर्य

ट्रेंडी कलर्स 

या साड्यांचे रंग अत्यंत ट्रेंडी आणि ऑन गो असून कोणत्याही कार्यक्रमासाठी परफेक्ट सूट असणारे आहेत. तसंच आजच्या पिढीला परफेक्ट स्टाईल आणि फॅशनचे कॉम्बिनेशन म्हणून ही साडी आपल्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करून घेता येईल. पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीचा उत्तम मेळ तुम्ही शोधत असाल तर ही स्टाईल नक्कीच तुमच्यासाठी आहे. 

Web Title: Summer spring collection of maheshwari sarees traditional handloom and boho style will make your style more fashionable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • Cotton Saree

संबंधित बातम्या

सर्वच ऋतूंमध्ये कम्फर्टेबल वाटतील कॉटन साडीचे ‘हे’ प्रकार, नेसल्यावर दिसेल स्टायलिश लुक
1

सर्वच ऋतूंमध्ये कम्फर्टेबल वाटतील कॉटन साडीचे ‘हे’ प्रकार, नेसल्यावर दिसेल स्टायलिश लुक

उन्हाळ्यात कॉटनची साडी नेसताना गोळा होतो? ‘या’ टिप्स फॉलो करून नेसा चापूनचोपून साडी, साडी दिसेल सुंदर
2

उन्हाळ्यात कॉटनची साडी नेसताना गोळा होतो? ‘या’ टिप्स फॉलो करून नेसा चापूनचोपून साडी, साडी दिसेल सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.