राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी अजून लग्नबंधनात अडकलेले नाहीत. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांच्या लग्नाचा बोलबाला सुरू आहे. गेल्यावर्षी साखरपुडा झाल्यानंतर, जामनगरमध्ये पहिले प्री-वेडिंग साजरे करण्यात आले आणि त्यानंतर मे-जूनमध्ये इटलीमध्ये दुसरे प्री-वेडिंग साजरे झाले. अंबानी कुटुंबाने दिलेले उत्सव, भव्यता, प्रभावी क्षण आणि सेलिब्रिटींसह रेड-कार्पेट यामुळे इंटरनेटवर आधीच धुमाकूळ घातला आहे.
इटलीमध्ये या जोडप्याच्या भव्य प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या फोटोंनी सोशल मीडियावर सध्या गाजावाज केलेला दिसून येत आहे. यामध्ये आता सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेय ते राधिका मर्चंटच्या मॅजेस्टिक लुकने. एखाद्या राजकन्येइतकी सुंदर राधिका दिसत आहे. एखाद्या गोंडस आणि क्लासी अशा राजकुमारीच्या वेशात आणि पुस्तकातील परीकथेतील परी अवतरावी अशा स्वरूपातील राधिकाचा हा लुक दिसून येतोय. पाहा तिचा हा क्लासी एलिगंट आणि डोळे दिपवणारा लुक (फोटो सौजन्य – Instagram)
राधिकाचा सॅटिन ड्रेस
राधिकाने यावेळी आयव्हरी सॅटीन गाऊन परिधान केला आहे. अत्यंत मखमली असा क्रेप गुंडाळलेला हा बॉडीफिट ऑफशोल्डर गाऊन घालून राधिका एखाद्या राजकुमारीपेक्षाही अधिक सुंदर दिसत आहे. या ड्रेसवर क्रिस्टल गुलाब जोडण्यात आले आहेत, ज्यामुळे तिच्या लुकला अधिक शोभा आली आहे.
क्रिस्टल रोझ हेडबँड
राधिकाने या ड्रेसला साजेसा असा क्रिस्टल रोझ हेडबँड डोक्याला लावला आहे. मोकळे केस आणि त्यावर लावलेला हा एलिगंट हेडबँड तिची वेगळी स्टायलिंग दर्शवत आहे. तिचा हा लुक पाहून इंटरनेटवर सध्या आग लागली आहे. सगळीकडे फक्त आणि फक्त राधिकाच्या लुकचीच चर्चा दिसून येतेय.
रिया कपूरचे स्टायलिंग
अनिल कपूरची मुलगी रिया कपूरने राधिका मर्चंटचे स्टायलिंग केले असून तिने हा लुक इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ‘खास दिवसासाठी सजली वधू राधिका मर्चंट. HAUTE COUTURE at its most glorious always with @tamararalph’ असे कॅप्शन तिने दिले आहे. डिझाईनर तमारा राल्फने या ड्रेसचे डिझाईन केले असून या ड्रेसमध्ये राधिकाचे सौंदर्य अधिक खुलून आल्याचे दिसून येत आहे.
राधिकाची ज्वेलरी
राधिकाने या ड्रेससह हिऱ्यांची अंगठी आणि आकर्षक ब्रेसलेट घातले आहे. अंबानीचे कोणतेही फंक्शन हिऱ्यांच्या दागिन्यांशिवाय पूर्ण होताना दिसत नाही. राधिकाच्या या लुकचीच सगळीकडे सध्या चर्चा असल्याचे दिसून येत आहे. राधिकाचा लुक हा एखाद्या ख्रिश्चन ब्राईडसारखा असला तरीही तिच्या सौंदर्याने त्याला एक वेगळेपणा दिलाय.
मिनिमल मेकअप लुक
राधिकाने या गाऊनसह केलेला मेकअप हा अत्यंत मिनिमल असून नैसर्गिक सौंदर्यावर अधिक भर दिली आहे. ग्लॅम लुकसाठी तिने डार्क भुवया, मस्कारा, विंग्ड आयलायनर, न्यूड लिप शेड, गालावर हायलायटर लावले आहे. तिचा हा लुक पाहातच राहण्यासारखा आहे.