तुमचे दात काही कारणाने पिवळे पडू लागले असतील तर आता काळजी करण्याची गरज नाही. दातांची ट्रिटमेंट हीदेखील महाग असते. त्यामुळे सारखं सारखं यासाठी पैसे देणं नक्कीच खिशाला परवडण्यासारखं नाही. दात हा आपल्या सौंदर्याचा एक भाग आहे आणि त्यावर पिवळे थर जमू लागले तर नक्कीच लाजिवरणी अवस्था होते.
पिवळे दात हे केवळ दिसण्यावरच परिणाम करत नाहीत तर तोंडाच्या आरोग्याच्या समस्यादेखील यामुळे होऊ शकतात. मात्र दातांवरील हा पिवळसर थर काढून टाकण्यासाठी 3 सोप्या गोष्टींचा तुम्ही वापर करून घेऊ शकता. दंतचिकित्सक डॉ. हरिश तन्ना यांनी हे घरगुती उपाय सांगितले आहेत. (फोटो सौजन्य – iStock)
दातांवर पिवळा थर का जमतो?
दातांवरील पिवळा थर हा जीवाणूंचा एक चिकट थर आहे जो सामान्यत: दात आणि हिरड्यांवर जमा होतो, ज्यामुळे पिवळसरपणा, टार्टर तयार होणे, दात किडणे, हिरड्यांचे रोग आणि इतर तोंडाच्या आरोग्य समस्या उद्भवतात. अनेकदा दोन वेळा दात घासूनही या समस्या दिसून येतात. त्याची कारणेही अनेक आहे. मात्र त्यावर तीन सोपे उपाय आपल्याला करता येतील.
[read_also content=”दात पिवळे पडलेत करून पाहा हे उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/are-your-teeth-turning-yellow-try-this-home-remedy-your-teeth-will-shine-like-pearls-533539.html”]
बेकिंग सोडा
हेल्थलाइनच्या अहवालानुसार, बेकिंग सोडा दात पांढरे करण्याच्या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. NCBI च्या अभ्यासानुसार, बेकिंग सोडा प्रभावीपणे दातांमधील हट्टी टार्टर काढून टाकू शकतो आणि त्यांची नैसर्गिक चमक परत देण्यात यशस्वी ठरतो. दातांवर बेकिंग सोडा लावल्याने आठवडाभरातच तुम्हाला योग्य रिझल्ट मिळाल्याचे दिसून येईल.
खोबरेल तेल
पिवळ्या दातांवरील थर काढण्यासाठी आणि दुर्गंधीचा सामना करण्यासाठी खोबरेल तेलदेखील एक चांगला उपाय आहे. दात आणि हिरड्यांवर खोबरेल तेल लावा, हलक्या हाताने मसाज करा आणि पाण्याने चांगले धुवा. नारळाच्या तेलामध्ये असलेले लॉरिक अॅसिड प्लाक निर्माण करणारे बॅक्टेरिया काढून दात पांढरे करण्यास मदत करते.
दात पांढरे करण्यासाठी संत्र्याची साल
संत्र्याची साल प्रभावीपणे दात स्वच्छ करण्यासाठी वापरली जाऊ शकते. संत्र्याची साल उन्हात वाळवा, बारीक चिरून पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. दात घासण्यासाठी या पेस्टचा वापर करून प्लेक काढून टाका आणि दात पांढरे करा. यामुळे तुमच्या श्वासालाही दुर्गंधी येणार नाही आणि दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल.
पुरेसे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी
शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची पुरेशी पातळी राखणे दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. दात मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे, तर विटामिन डी त्याच्या पोषणासाठी मदत करते. दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ आणि विटामिन डी-फोर्टिफाइड पदार्थांचा समावेश करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.