फोटो सौजन्य - Social Media
नवरात्री हा आता जल्लोषाचा उत्सव झाला आहे. तरुण जमतात, गरबा रमतात आणि उत्साह रंगतो. पण तुम्हाला माहिती आहे का? नवरात्री हा सण, वीरतेचे प्रतीक आहे. पुराणांनुसार, या दिवसांत असा राक्षस मारला गेला, ज्याला फार मोठा वर प्राप्त होता. त्याचा वध ना देव करू शकत होते, ना मानव आणि ना कुणी राक्षस कुळातील असुर! त्याला हरवणे फार कठीण होते.
या राक्षसाचे नाव ‘महिषासुर’ आहे. देवी दुर्गेने अवतार घेऊन त्याचा वध केला. त्याला मारला. पण हा संघर्ष लहान नव्हता. तब्बल नऊ रात्रीचा हा संघर्ष होता. तेव्हा जाऊन दहाव्या दिवशी म्हणजेच आज जेव्हा आपण दसरा साजरा करतो, तेव्हा महिषासुर मरण पावला. महिषासुराला त्याच्या वरदानाचा आणि शक्तीचा इतका अहंकार होता की त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण केले होते. त्याच्या शक्तीसमोर कुणाचाही टिकाव झाला नाही. प्रत्येक देव युद्ध पुकारून हार मानत होते. तेव्हा विष्णू, शिव, ब्रह्मा व इतर देवांनी आपली शक्ती दिली आणि त्या सर्व शक्तींपासून देवी दुर्गेचं तेजस्वी रूप प्रकट झालं.
या आदिशक्तीच्या नऊ दिवसांचा संघर्ष करत, या महिषासुराला धारातीर्थी केले. त्याचा वध झाला. त्यामुळे आई दुर्गेला महिषासुरमर्दिनी असेही संबोधले जाते. अशा प्रकारे आदिशक्ती , आई दुर्गेने महिषासुराचा पराभव केला आणि धरतीवर पुन्हा धर्माची स्थापना केली. या संघर्षात नऊ दिवस आणि रात्री देवीने युद्ध केले, प्रत्येक दिवशी महिषासुराच्या विविध रूपांशी सामना करीत तिने त्याची शक्ती कमी केली. या युद्धादरम्यान देवीने आपले विविध अस्त्र आणि शस्त्र वापरले, जे देवतांनी तिला दिले होते, ज्यामुळे ती अत्यंत समर्थ बनली.
रामायणातही नवरात्रीचा उल्लेख आहे. असे म्हंटले जाते की रामाने युद्धाआधी दसऱ्याच्या दिवशी चंडीपूजा केली होती आणि नवरात्रीचा उपवासही धरला होता. तेव्हा त्याला विजय प्राप्त झाले. म्हणून या दिवसाला “विजयादशमी” असे म्हणतात.